लातूर, दि.17(विमाका):- विभागीय माहिती कार्यालय, लातूर येथील वृत्तपत्रांची रद्दी विक्रीसाठी काढण्यात आली आहे. ज्यांना रद्दी घ्यावयाची असेल त्यांना कार्यालयीन वेळेत रद्दी पाहावयास मिळेल. ज्यांना रद्दी विकत घ्यावयाची आहे, त्यांनी त्यांचे लिफाफाबंद दरपत्रक मा. उपसंचालक (माहिती), विभागीय माहिती कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तळमजला, उत्तर बाजू, लातूर या पत्यावर दि. 25 जानेवारी 2023 सायंकाळी 5 वाजेपर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दाखल करावीत. या संदर्भातील अटी व शर्ती कार्यालयीन वेळेत कार्यालयीन कामाच्या दिवशी पाहता येतील .
रद्दी विक्रीचे दरपत्रक मंजूर करणे अथवा रद्द करणे हे सर्व अधिकार उपसंचालक (माहिती), विभागीय माहिती कार्यालय, लातूर यांना राहतील .
***
No comments:
Post a Comment