Wednesday, May 10, 2023

मराठा उद्योजक घडविण्यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळाचा बँक ऑफ इंडियाशी सामंजस्य करार

 मराठा उद्योजक घडविण्यासाठी 

अण्णासाहेब पाटील महामंडळाचा बँक ऑफ इंडियाशी सामंजस्य करार

 

नांदेड (जिमाका) दि. 10 :- अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांच्या अंतर्गत राज्यामध्ये जास्तीत जास्त मराठा उद्योजक घडविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याला चालना देण्यासाठी बँक ऑफ इंडिया व अण्णासाहेब पाटील महामंडळ यांच्या दरम्यान मे, 2023 रोजी पुणे येथे सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील, बँक ऑफ इंडियाचे जनरल मॅनेजर राधाकांत, डेप्युटी जनरल मॅनेजर रविंद्र बोगाडेप्युटी जनरल मॅनेजर लगणजीत दासचीफ मॅनेजर समीर देशपांडे हे उपस्थित होते. 

राज्यातील सर्व बँक ऑफ इंडियाच्या शाखांना पत्रकाद्वारे कराराची माहिती देण्यात येणार आहे. त्याच्या माध्यमातून महामंडळाच्या लाभार्थ्यांना सीजीटीएमएसई (CGTMSE) व सीजीएफएमयू (CGFMU) या दोन क्रिएट गॅरंटी देण्यात येणार आहेत. जे तरुण क्रेडिट गॅरंटीच्या माध्यमातून कर्ज मागणी करतील त्यांना याचा लाभ देण्यात येईल. जास्तीत जास्त महामंडळाच्या योजनांचा लाभ घेऊन राज्यात उद्योजक होतील यादृष्टीने शासन आणि महामंडळ प्रयत्नशील आहे. 

 

हा सामंजस्य करार पुणेकोल्हापूरसोलापूरनाशिकरत्नागिरीनागपूर संपूर्ण विदर्भ या भागासाठी करण्यात आला आहे. याबाबतचे अधिकृत पत्रक बँक ऑफ इंडिया पुढील कालावधीत प्रसिध्द करणार असून त्यानंतर या कराराची अंमलबजावणी सुरु होईल. या झालेल्या सामंजस्य कराराप्रमाणेच या अगोदर देखील मुंबईमुंबई उपनगररायगडठाणेकोकण विभागासाठी या प्रकारचा करार करण्यात आला आहे. यापूर्वीच्या कराराचा लाभ या विभागातील लाभार्थ्यांना झालेला आहे. 

 

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात एक लाख मराठा उद्योजक होण्याच्या दृष्टीने या करारामुळे लाभ होणार असल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष नरेंद पाटील यांनी दिली आहे.

0000

आपली आवड ओळखून त्याला कष्टाची जोड आवश्यक- जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे

 आपली आवड ओळखून त्याला कष्टाची जोड आवश्यक

-         जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे

§   नांदेड येथे छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती शिबिरात

   सहभागी हजारो युवकांना पोलीस अधिक्षकांचा गुरुमंत्र 

 

नांदेड (जिमाका) दि. 10 :दहावी व बारावीची परीक्षा दिल्यानंतर करिअर घडविण्याची जबाबदारी ही पालकावर नाही तर विद्यार्थी म्हणून प्रत्येकावर येवून पडते. आपल्या उज्वल भवितव्यासाठी युवकांनी सर्वप्रथम स्वत:ला ओळखले पाहिजे. आपली आवड काय आहे याचा निर्णय स्वत: हाच घेतला पाहिजे. ज्यावेळेला ही प्रक्रीया प्रत्येक विद्यार्थी स्वत: हून पार पाडेल त्या दिवसापासून तुमचे भवितव्य अर्थात करिअर घडण्यास सुरुवात झाली हे आत्मविश्वासाने समजून घ्याअसे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी युवकांना केले.


 

आज नांदेड येथील भक्ती लॉन्स येथे भव्य प्रमाणात आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करियर शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहानेसहसंचालक सतिश सुर्यवंशीजिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी आर.बी. गणवीरजिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवारकौशल्य रोजगार उद्योजकता व नाविण्यता विभागाच्या सह आयुक्त रेणुका तम्मलवार यांची उपस्थिती होती.

 

आयुष्याचा मार्ग शोधताना कोणत्याही विद्यार्थ्यांची द्विधा मनस्थिती असणे स्वाभाविक आहे. या द्विधा मनस्थितीतून मी ही गेलेलो आहे. बीएससीला घेतलेले ॲडमिशन रद्द करुन मी शेवटी बीकॉमपर्यत पोहोचलो. बीकॉम यासाठी की मला युपीएससीची तयारी करता यावी हा उद्देश डोळ्यापुढे ठेवला. यासाठी क्लासेस लावले. पहिल्या टप्प्यात माझा अभ्यास न झाल्याने मी परीक्षा दिली नाही. घरचे नाराज झाले. माझ्या मित्राने मला स्पर्धा परीक्षेकडे पाहण्याचा दृष्टीकोन दिला. त्याच्या नोट्सवरुन माझा आत्मविश्वास वाढला. नंतरच्या परीक्षेत मी इतरापेक्षा अधिक मार्क मिळवून घवघवीत यश संपादन केले.


 

माझे मी ध्येय निश्चित केल्यानंतर कुणाकडेच पाहिले नाही. राहणीमान व भौतिक सुविधा याला शुन्य महत्व देवून अभ्यासाला प्राधान्य दिल्यामुळे  मी या पदापर्यंत पोहोचू शकलो अशी अनुभवाची शिदोरी जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी विद्यार्थ्यांना दिली. पॅशनडेडीकेशनडिव्होशनडिस्परेशन याबाबी आपल्या यशाची गुरुकिल्ली आहेत हे युवकांनी विसरता कामा नये हे त्यांनी स्पष्ट केले.


 

18 वर्षापासून 25 वर्षापर्यंत जे अपार कष्ट घेतातमेहनत करतात त्याची पुढची 50 वर्षे ही राजासारखी असतात या शब्दात मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांनी युवकांना यशाचे महत्व पटवून दिले. आयुष्यातील हा तुमचा अत्यंत महत्वाचा काळ आहे. शिक्षणासमवेत आपल्या भोवताली असलेल्या स्वयंरोजगाराच्या संधी तपासून घेतल्या पाहिजे. मोबाईलच्या आहारी न जाता त्या वेळेचा सदउपयोग आपल्या करियरच्या दृष्टीने इतर वाचनामध्ये विद्यार्थ्यांनी द्यावा असे ते म्हणाले. उद्घाटनाच्या पहिल्या सत्रानंतर अनेक मान्यवरांची यावेळी समयोचित भाषणे झाली.

0000   

एमएच-सीईटी परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

 एमएच-सीईटी परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश 

नांदेड (जिमाका) दि. 10 :- एमएच-सीईटी परीक्षा-2023  ही 21 मे 2023 पर्यत (15 मे वगळून) दोन सत्रात जिल्ह्यात 7 परीक्षा केंद्रावर घेण्यात येत आहे.  परीक्षा केंद्राच्या परिसरात बाहेरील व्यक्तींचा उपद्रव होऊ नये व परीक्षा स्वच्छ सुसंगत पार पाडण्याच्यादृष्टिने या परीक्षा केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी काढले आहेत. 

 

या परीक्षा केंद्रापासून 100 मीटर परिसरात 21 मेपर्यंत (15 मे 2023 वगळून) सकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीला प्रवेश करता  येणार नाही. परीक्षा कालावधीत या परीसरात 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वी, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनीक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे.  

00000

 

संत रोहिदास चर्मोद्योग महामंडळाच्या अनुदान, बिजभांडवल योजनेसाठी कर्जप्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन

 संत रोहिदास चर्मोद्योग महामंडळाच्या अनुदान,

बिजभांडवल योजनेसाठी कर्जप्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन

 

नांदेड, (जिमाका) दि. 10:- संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्या. नांदेड जिल्हा कार्यालयास सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी अनुदान योजनेअंतर्गत 20 लाभार्थी व बीज भांडवल योजनेअंतर्गत 16 लाभार्थ्यांचे उद्दीष्ट प्राप्त झाले आहे. या योजनांचा कर्ज प्रस्ताव महामंडळाच्या विहित नमुन्यात अर्ज 8 जून 2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत (सकाळी 9.30 ते सायं 6.15 वाजेपर्यंत) जिल्हा कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन ग्यानमाता शाळेसमोर, कामठा रोड, नांदेड येथे स्विकारले जातील. 

 

या दोन योजना राष्ट्रीयकृत बँकेमार्फत राबविल्या जातात. चांभार समाजात अंतर्भाव असणाऱ्या चांभार, ढोर, मोची, होलार या समाजातील अर्जदारांकडून विविध व्यवसायासाठी कर्ज प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. या समाजातील लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांनी यापूर्वी महामंडळाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. तसेच अर्जदाराने महामंडळाच्या नियमाप्रमाणे आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करुन कर्ज प्रस्ताव तीन प्रतीत पुढील ठिकाणी स्वत: अर्जदाराने मुळ कागदपत्रासह उपस्थित राहून दाखल करावीत. त्रयस्थ / मध्यस्थामार्फत कर्ज प्रकरणे स्विकारण्यात येणार नाहीत. 

 

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे पुढील प्रमाणे लागतील. सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेला जातीचा दाखला, तहसीलदार यांच्याकडून घेतलेला अर्जदाराच्या कुटुंबाचा चालू वर्षाचा उत्पन्नाचा दाखला. नुकतेच काढलेले पासपोर्ट आकाराचे छायाचित्र तीन प्रतीत जोडावे. अर्जदाराचा शैक्षणिक दाखला. राशन कार्ड झेरॉक्स प्रती, आधार कार्ड / मतदान कार्ड / पॅन कार्डची झेरॉक्स प्रत, व्यवसायाचे दरपत्रक, व्यवसाय ज्या ठिकाणी करावयाचा आहे त्या जागेची भाडेपावती, करारपत्रक किंवा मालकी हक्काचा पुरावा (नमुना नंबर आठ), लाईट बील, टॅक्स पावती, बिजभांडवल योजनेसाठी प्रकल्प अहवाल, वाहनासाठी लायसन्स परवाना बॅच, व्यवसायाचे ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका यांचे नाहरकत प्रमाणपत्र, व्यवसायासंबंधी तांत्रिक प्रमाणपत्र तसेच अनुभवाचा दाखला. अनुदान न घेतल्याबाबत प्रतिज्ञापत्र याप्रमाणे कागदपत्रे स्वयंसांक्षाकित करुन घोषणापत्र देण्यात यावे. 

 

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील चांभार, ढोर, मोची, होलार, समाजातील बेरोजगार युवक, युवतींना तसेच होतकरु गरजू अर्जदारांनी योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक अरुण राऊत यांनी केले आहे.

00000

परिवहन प्रवर्गासाठी 15 मे पासून नवीन मालिका सुरु

 परिवहन प्रवर्गासाठी 15 मे पासून नवीन मालिका सुरु

नांदेड (जिमाका) दि. 10 :- परिवहन प्रवर्ग (एचजीव्ही, एलसीव्ही, बस इसाठी एमएच 26-सीएच ही नविन मालिका सोमवार 15 मे 2023 पासून सुरु होत आहे. ज्या अर्जदारांना पसंती क्रमांक घ्यावयाचा आहे त्यांचे (आधार कार्डपॅनकार्डमोबाईल नंबर  ईमेल सह) अर्ज दि.15 मे रोजी दुपारी 2.30 पर्यंत स्विकारण्यात येतील. त्यानंतर पसंती क्रमांकासाठी अर्ज स्विकारण्यात येणार नाहीतअसे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.

ज्या पसंती क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास 16 मे 2023 रोजी सकाळी 10 वाजता कार्यालयात त्याची यादी प्रदर्शित करण्यात येईल व टेक्स्ट मॅसेजद्वारे संबंधीत अर्जदारास कळविण्यात येईल यांची सर्वांनी नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

0000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...