Wednesday, July 4, 2018


महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे
सदस्य (विधी) न्या. सी. एल. थूल यांचा दौरा
नांदेड दि. 4 :- महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती / जमाती आयोगाचे सदस्य (विधी) न्यायमूर्ती सी. एल. थूल हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शनिवार 7 जुलै 2018 रोजी दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंत मौजे बामणी ता. मुखेड जि. नांदेड येथील पिडीत व्यक्तींच्या घटनास्थळाला भेट व पीडीत व्यक्तीशी चर्चा. दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 3 वा. बामणी येथून उदगीर मार्गे नांदेडकडे प्रयाण. नांदेड येथे मुक्काम.
रविवार 8 जुलै 2018 रोजी सकाळी 10 वा. नांदेड येथे आयोजित अनु. जाती / जमाती यांच्या सेवाविषयक अन्यायाबाबतची सद्यस्थिती व उपाययोजना. दुपारी 3 ते 5 वाजेपर्यंत उपायुक्त सामाजिक न्याय विभाग, जिल्हाधिकारी नांदेड तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी आयोजित केलेल्या ॲट्रोसिटी ॲक्ट कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन व चर्चा. नांदेड येथे मुक्काम. सोमवार 9 जुलै 2018 रोजी सकाळी 10 वा. सोयीनुसार मुंबईकडे प्रयाण.
0000000


नोंदणीकृत मदरसांना पायाभुत सुविधा,
विषय शिक्षकांच्‍या वेतनासाठी अनुदान 
अर्ज करण्याची 14 ऑगस्ट पर्यंत मुदत  
नांदेड, दि. 4 :-  डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेंतर्गत नोंदणीकृत मदरसांना पायाभूत सुविधा आणि विषय शिक्षकांच्‍या वेतनासाठी सहाय्यक अनुदान 2018-19 साठी ज्‍या मदरशांमध्‍ये फक्‍त पारंपारिक धार्मिक शिक्षण देण्‍यात येत आहे आणि ज्‍यांना आधुनिक शिक्षणासाठी  शास‍कीय अनुदान घेण्‍याची इच्‍छा आहे, अशा मदरशांकडून राज्य अल्‍पसंख्‍याक विकास विभागाने अर्ज मागविले आहेत. इच्‍छुक मदरशांनी विहित नमुन्‍यातील परिपुर्ण अर्ज आवश्‍यक कागदपत्रासह मंगळवार 14 ऑगस्ट 2018 पर्यंत जिल्‍हा नियोजन समिती, जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड येथे सादर करावेत, असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा अध्‍यक्ष उच्‍चस्‍तरीय निवड समिती, नांदेड यांनी केले आहे. 
मदरसाची धर्मदाय आयुक्‍त अथवा महाराष्‍ट्र राज्‍य वक्‍फ बोर्डाकडे नोंदणी आवश्यक आहे. अर्जाचा नमुना, आवश्‍यक कागदपत्रांची यादी http://mdd.maharashtra.gov.in या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध आहेत. शासन निर्णयाच्‍या तरतुदीनुसार पुढील बाबींसाठी विहित नमुन्‍यात अर्ज करता येतील. विज्ञान, गणित, समाजशास्‍त्र, हिंदी, मराठी, इंग्रजी व उर्दू हे विषय शिकविण्‍यासाठी शिक्षकांना मानधन देणे. पायाभूत सुविधासाठी व ग्रंथालयासाठी अनुदान. शासन निर्णय 11 ऑक्टोंबर 2013 च्‍या तरतुदीनुसार जास्‍तीतजास्‍त तीन डी. एड / बी. एड शिक्षकांना मानधन देण्‍यात येईल. विद्यार्थी व शिक्षक यांचे प्रमाण 40.1 असे राहील. शिक्षणासाठी हिंदी, इंग्रजी, मराठी, उर्दू यापैकी एका माध्‍यमाची निवड करून त्‍यानुसार शिक्षकांची नेमणूक करणे आवश्‍यक आहे. ग्रंथालयासाठी तसेच विद्यार्थ्यांकरिता शैक्षणिक साहित्‍यासाठी एकदाच 50 हजार रुपये अनुदान देय आहे. पायाभूत सुविधासाठी 2 लाख रुपये अनुदान देय आहे. यामध्‍ये मदरशांच्‍या इमारतीचे नुतनीकरण व डागडुजी, पेय जलाची व्यवस्था करणे, प्रसाधन गृह उभारणे व त्‍याची डागडुजी करणे, विद्यार्थ्‍यांसाठी आवश्‍यक फर्निचर, मदरसाच्‍या निवासस्‍थानात इन्‍वहर्टरची सुविधा उपलब्‍ध करणे, मदारसांच्‍या निवासी इमारतीचे नुतनीकरण व डागडुजी, संगणक, हार्डवेअर, सॉफटवेअर, प्रिंटर्स इत्यादी व प्रयोगशाळेचे साहित्‍य, सायन्स कीट, मॅथेमॅटीक्स कीट व इतर अध्ययन साहित्य. यासाठी किमान 3 वर्षापूर्वी नोंदणी केलेल्‍या व अल्‍पसंख्‍याक बहुल मदरशांना प्राधान्‍य देण्‍यात येईल. ज्‍या मदरशांना Scheme for Providing Quality Education in Madarsa (SPQEM) या केंद्र पुरस्‍कृत योजनेंतर्गत लाभ मिळाला आहे अशा मदरसांना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही. 14 ऑगस्ट 2018 च्या विहित मुदतीनंतर प्राप्‍त झालेले प्रस्‍ताव ग्राहय धरले जाणार नाहीत, असेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. 
00000


अल्‍पसंख्‍याक बहुल शासनमान्‍य खाजगी शाळा, कनिष्‍ठ महाविद्यालय,
औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था, अपंग शाळेसाठी पायाभुत सोयी सुविधा अनुदान योजना
नांदेड दि. 4 :- जिल्‍ह्यातील धार्मिक अल्‍पसंख्‍याक विद्यार्थी बहुल शासनमान्‍य खाजगी शाळा, कनिष्‍ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था व अपंग शाळा यांच्याकडून पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजनेंतर्गत कामाल 2 लाख रुपये अनुदानाचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज जिल्‍हा नियोजन समिती, जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड येथे मंगळवार 14 ऑगस्ट 2018 पर्यंत सादर  करावेत, असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा अध्‍यक्ष उच्‍चस्‍तरीय निवड समिती नांदेड यांनी केले आहे. 
शासन निर्णय 7 ऑक्टोंबर 2015 व अर्जाचा नमुना https://mdd.maharashtra.gov.in या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध आहे. शासनमान्‍य खाजगी शाळा, कनिष्‍ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्‍थामध्ये अल्पसंख्याक समाजाचे (मुस्लिम, बौध्‍द, ख्रिश्चन, जैन, शिख, व पारसी मिळून) किमान 70 टक्के विद्यार्थी शिकत असणे आवश्‍यक आहे. शासन मान्‍यताप्राप्‍त अपंगाच्‍या शाळांमध्‍ये किमान 50 टक्के अल्‍पसंख्‍यांक विद्यार्थी शिकत असणे आवश्‍यक आहे.
या योजनेंतर्गत पुढील पायाभूत सुविधांसाठी अनुदान देय आहे. शाळेच्‍या इमारतींचे नुतनीकरण व डागडूजी. शुद्ध पेयजलाची व्यवस्था करणे. ग्रंथालय अद्ययावत करणे. प्रयोगशाळा उभारणे / अद्यावत करणे. संगणक कक्ष उभारणे / अद्यावत करणे. प्रसाधनगृह / स्‍वच्‍छतागृह उभारणे / डागडूजी करणे. विद्यार्थ्यांसाठी आवश्यक फर्निचर. इन्व्हर्टर / जनरेटरची सुविधा निर्माण करणे. झेरॉक्स मशीन. अध्‍ययनाची साधने (Learning Material)/ एल.सी.डी.प्रोजेक्‍टर अध्‍ययनासाठी लागणारे विविध  सॉफटवेअर, इत्‍यादी. इंग्रजी लॅग्‍वेज लॅब. संगणक हार्डवेअर / सॉफटवेअर. या योजनेंतर्गत यापूर्वी 5 वेळा अनुदान घेतलेल्‍या शाळा, संस्‍था यावर्षी अनुदानासाठी पात्र  असणार नाहीत. विहित मुदतीनंतर प्राप्‍त झालेले प्रस्‍ताव ग्राह धरले जाणार नाहीत.
0000000


सैनिक, माजी सैनिकांसाठी
औरंगाबाद येथे हॉलीडे होम अल्पदरात सुरु
नांदेड दि. 4 :- स्टेशन हेडक्वार्टर औरंगाबाद संचलीत औरंगाबाद छावणी  कार्यालय नगर रोड औरंगाबाद येथे 26 रुमचे विश्रामगृह हॉलीडे होम सुरु झाले आहे.  या विश्रामगहाचे दर अधिकारी वर्ग 500 रुपये, जेसीओज 350 रुपये  व अन्य रँकसाठी 150 रुपये आहे.  
स्टेशन कंमाडर ब्रिगेडिअर डी. के. पत्रा यांनी नांदेड येथे माजी सैनिकांच्या  बैठकीत  दर कमी करत असल्याबाबत व सर्व रुम एअर कंडीशन व सर्व  सोईयुक्त असल्याबाबत सांगीतले होते. तसेच विवाहसाठी व इतर कार्यक्रमांसाठी माजी सैनिकांनी रुम आरक्ष्‍िात केल्यावर 50 प्रतिशत पर्यंत दर कमी करण्यात  येत आहेत व विरनारी, विरमाता व विरपिता यांना 7 दिवस मोफत राहण्याची सोय आहे.  हॉलीडे होमचे आरक्षण व अधिक माहितीसाठी  भ्रमणध्वनी क्रमांक 7798377960 व दुरध्वनी क्रमांक 0240-2370997 संपर्क साधावा, असे आवाहन  जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर  सुभाष सासने यांनी  केले आहे.
00000


आदिवासी सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन प्रशिक्षणाची संधी
नांदेड दि. 4 :- आदिवासी उमेदवारांसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, किनवट जिल्हा नांदेड या प्रशिक्षण केंद्रात बुधवार 1 ऑगस्ट 2018 पासून सुरु होणाऱ्या 97 व्या प्रशिक्षण सत्रात आदिवासी सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना विविध स्पर्धा परिक्षेची तयारी करीता प्रवेश देण्यासाठी उमेदवारांनी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कार्यालय किनवट येथे शुक्रवार 27 जुलै 2018 तत्पुर्वी पोहचतील अशा बेताने आदिवासी (अनुसूचित जमातीचे) उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रवेशासाठीची अटी पुढीलप्रमाणे राहील. उमेदवार अनुसूचित जमातीपैकी (एस.टी.) प्रवर्गातील असावेत. नांदेड जिल्ह्यातील व इतर जिल्ह्यातील उमेदवारांचाही प्रवेशासाठी विचार करण्यात येईल. उमेदवार कमीतकमी शालांत परीक्षा उत्तीर्ण असावेत. उच्च शैक्षणिक पात्रतेस प्राधान्य देण्यात येईल. उमेदवारांनी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता कार्यालयात नाव नोंदणी केलेली असावी. उमेदवारांनी किनवट येथे स्वत: राहाण्याची व जेवण्याची व्यवस्था स्वखर्चाने करावी लागेल. प्रशिक्षण कालावधी 3 महिने 15 दिवस असून शालांत परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना तसेच पदवीधारांना दरमहा 1 हजार रुपये विद्यावेतन दिले जाईल. उमेदवरांचे वय 31 जुलै 2018 रोजी 18 वर्ष पूर्ण असावेत व 35 वर्षापेक्षा जास्त नसावे. प्रशिक्षणार्थींचे विद्यावेतन संबंधित प्रशिक्षार्थींचे बँक खात्यामध्ये दरमहा जमा करण्यात येणार असल्यामुळे प्रशिक्षणार्थीच्या बँकेमध्ये चालू खाते असणे आवश्यक आहे. आपण यापुर्वी अशा प्रकारचे प्रशिक्षण घेतलेले असल्यास किंवा हे प्रशिक्षण सत्र अर्ध्यातून सोडलेले असल्यास प्रवेश देण्यात येणार नाही.
प्रशिक्षण सत्रात नोकऱ्यांसाठी द्याव्या लागणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षेची तयारी करुन घेण्यात येते. तसेच आदिवासी उमेदवारांसाठी राबविण्यात येणाऱ्या इतर खात्याच्या स्वयंरोजगार योजनांची माहिती देवून मार्गदर्शन केले जाते. पात्र अशा इच्छूक उमेदवारांनी आपल्या स्वाक्षरीत कोऱ्या कागदावर 27 जुलै 2018 पर्यंत शैक्षणिक व जातीचे प्रमाणपत्राच्या सत्यप्रतीसह अर्ज करावेत. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, आदिवासी उमेदवारांसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र , पेटकुलेनगर, गोकुंदा किनवट जि. नांदेड या कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक 02469-221801 या कार्यालयाशी अधिक माहितीसाठी संपर्क साधावा. 
0000


वेतन पडताळणी पथकाचा दौरा
नांदेड, दि. 4 :- वेतन पडताळणी  पथकाचा माहे जुलै 2018 चा नांदेड जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आयोजित केला आहे, असे सहसंचालक लेखा व कोषागारे औरंगाबाद यांनी कळविले आहे. 
हे पथक मंगळवार 24 जुलै 2018 रोजी पोलीस अधिक्षक कार्यालय नांदेड येथे व बुधवार 25 जुलै ते शुक्रवार 27 जुलै 2018 काळात जिल्हा व तालुका स्तरावरील इतर कार्यालयाची वेतन पडताळणी करील. त्यासाठी हे पथक या कालावधीत कोषागार कार्यालय नांदेड येथे उपस्थित राहील. ज्या कर्मचाऱ्यांचे दि. 1 जानेवारी 2006 रोजीची वेतन पडताळणी अद्याप झालेली नाही त्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहसंचालक लेखा व कोषागारे औरंगाबाद यांनी केले आहे.
00000


पोलीस, सैन्यदल भरती पुर्व प्रशिक्षणासाठी शिबीर
नांदेड दि. 4 :- अनुसूचित जाती व नवबौध्द  घटकातील युवक व युवतींसाठी अमरावती येथे आयोजित सैन्य व पोलीस भरती पुर्व प्रशिक्षणासाठी सोमवार 16 जुलै 2018 रोजी नांदेड जिल्हयातील उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन नांदेड येथे उपस्थित रहावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी  केले आहे.
            सामाजिक न्याय व सांस्कृतिक कार्य, क्रीडा व विशेष सहाय्य विभागाने अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील युवक व युवतींसाठी सैन्य व पोलीसमध्ये भरती करण्याकरिता भरतीपुर्व प्रशिक्षण कार्यक्रम मंजूर केला आहे. प्रशिक्षणाचा कालावधी 3 महिन्याचा असून प्रशिक्षण श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती येथे होणार आहे.
अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील युवकांसाठी सैन्य व पोलीस भरतीपुर्व प्रशिक्षणासाठी पात्र अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत. उमेदवार हा महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असावा. उमेदवाराचे वय हे 18 ते 25 वयोगटातील असावे. उमेदवाराची पुरुष उंची 165 से.मी व महिला उंची 155 से.मी. छाती न फुगवता पुरुष 79 से.मी. (फुगवुन 84 से.मी. ) असावी. शैक्षणिक पात्रता इयत्ता 12 वी पास. जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, सेवायोजन कार्यालयातील नोंदणी आणि ओळखपत्राची सत्यप्रत देणे आवश्यक राहील. उमेदवार हा शारीरीक व मानसिक दृष्टया निरोगी असावा.
            प्रशिक्षणाच्या निवडीसाठी नांदेड जिल्हयातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील युवक, युवतीनी सोमवार 16 जुलै रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, अर्धापूर रोड, ग्यानमाता शाळेच्या समोर, नमस्कार चौक, नांदेड येथे मुळ कागदपत्रासह व साक्षांकित प्रतीसह उपस्थित राहावे. उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना जाण्या-येण्याचा भत्ता दिला जाणार नाही याची नोंद घ्यावी, असेही आवाहन नांदेडचे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांनी केले आहे.
00000

नांदेड : अफवांवर विश्वास ठेवू नका...


  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...