Wednesday, July 4, 2018


अल्‍पसंख्‍याक बहुल शासनमान्‍य खाजगी शाळा, कनिष्‍ठ महाविद्यालय,
औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था, अपंग शाळेसाठी पायाभुत सोयी सुविधा अनुदान योजना
नांदेड दि. 4 :- जिल्‍ह्यातील धार्मिक अल्‍पसंख्‍याक विद्यार्थी बहुल शासनमान्‍य खाजगी शाळा, कनिष्‍ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था व अपंग शाळा यांच्याकडून पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजनेंतर्गत कामाल 2 लाख रुपये अनुदानाचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज जिल्‍हा नियोजन समिती, जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड येथे मंगळवार 14 ऑगस्ट 2018 पर्यंत सादर  करावेत, असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा अध्‍यक्ष उच्‍चस्‍तरीय निवड समिती नांदेड यांनी केले आहे. 
शासन निर्णय 7 ऑक्टोंबर 2015 व अर्जाचा नमुना https://mdd.maharashtra.gov.in या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध आहे. शासनमान्‍य खाजगी शाळा, कनिष्‍ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्‍थामध्ये अल्पसंख्याक समाजाचे (मुस्लिम, बौध्‍द, ख्रिश्चन, जैन, शिख, व पारसी मिळून) किमान 70 टक्के विद्यार्थी शिकत असणे आवश्‍यक आहे. शासन मान्‍यताप्राप्‍त अपंगाच्‍या शाळांमध्‍ये किमान 50 टक्के अल्‍पसंख्‍यांक विद्यार्थी शिकत असणे आवश्‍यक आहे.
या योजनेंतर्गत पुढील पायाभूत सुविधांसाठी अनुदान देय आहे. शाळेच्‍या इमारतींचे नुतनीकरण व डागडूजी. शुद्ध पेयजलाची व्यवस्था करणे. ग्रंथालय अद्ययावत करणे. प्रयोगशाळा उभारणे / अद्यावत करणे. संगणक कक्ष उभारणे / अद्यावत करणे. प्रसाधनगृह / स्‍वच्‍छतागृह उभारणे / डागडूजी करणे. विद्यार्थ्यांसाठी आवश्यक फर्निचर. इन्व्हर्टर / जनरेटरची सुविधा निर्माण करणे. झेरॉक्स मशीन. अध्‍ययनाची साधने (Learning Material)/ एल.सी.डी.प्रोजेक्‍टर अध्‍ययनासाठी लागणारे विविध  सॉफटवेअर, इत्‍यादी. इंग्रजी लॅग्‍वेज लॅब. संगणक हार्डवेअर / सॉफटवेअर. या योजनेंतर्गत यापूर्वी 5 वेळा अनुदान घेतलेल्‍या शाळा, संस्‍था यावर्षी अनुदानासाठी पात्र  असणार नाहीत. विहित मुदतीनंतर प्राप्‍त झालेले प्रस्‍ताव ग्राह धरले जाणार नाहीत.
0000000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...