वृत्त क्र. 636
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला ग्रामीण व शहरी भागात उस्फूर्त प्रतिसाद
वृत्त क्र. 636
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला ग्रामीण व शहरी भागात उस्फूर्त प्रतिसाद
वृत्त क्र. 635
एक ऑगस्टपासून महसूल सप्ताह साजरा करण्याची प्रशासनाची तयारी
नांदेड दि. २५ जुलै : प्रशासनाचा कणा असणाऱ्या महसूल विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी १ ते ७ ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह साजरा करण्याचे नियोजन केले आहे. शासनाच्या पथदर्शी व अभिनव योजनांचा प्रचार, प्रसार व अंमलबजावणी ही या सप्ताहाची वैशिष्ट्ये असणार आहे.
महसूल सप्ताहामध्ये प्रत्येक दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तालुकास्तरावर समाजाच्या विविध घटकातील नागरिकांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये एक ऑगस्टला शुभारंभ सप्ताह कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, दोन ऑगस्टला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, तीन ऑगस्टला मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, 4 ऑगस्टला स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय, पाच ऑगस्टला सैनिक हो तुमच्यासाठी, 6 ऑगस्ट ला एक हात मदतीचा दिव्यांगाच्या कल्याणाचा, तर सात ऑगस्ट रोजी महसूल संवर्गातील कार्यरत सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी संवाद, उत्कृष्ट अधिकारी कर्मचारी पुरस्कार वितरण व महसूल सप्ताह सांगता समारंभ घेण्यात येणार आहे.
याव्यतिरिक्त शासन व सामान्य नागरिक यांना जोडणाऱ्या अनेक कार्यक्रमांचे आयोजन या सप्ताहामध्ये करण्यात येणार आहे. यासंदर्भात नुकतीच एक बैठक निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आली. यामध्ये महसूल विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी या सप्ताहात हीरहिरीने सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले.
000000
वृत्त क्र. 634
इयत्ता दहावी व बारावी पुरवणी परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये बदल
नांदेड दि. 25 जुलै :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये घेण्यात येणारी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10 पुरवणी परीक्षा 16 जुलै ते 30 जुलै 2024 आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12 वी पुरवणी परीक्षा 16 ते 8 ऑगस्ट 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आलेली आहे. तथापि 26 जुलै 2024 रोजी राज्याच्या काही जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यामुळे 26 जुलै रोजी होणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10 वी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12 वी परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला आहे. या वेळापत्रकातील बदलाची सर्व संबंधित माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, प्राचार्य, विद्यार्थी, पालक व अन्य घटकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन राज्य मंडळाचे सहसचिव मेधा निरफराके यांनी केले आहे.
इयत्ता दहावी पुरवणी परीक्षा शुक्रवार 26 जुलै 2024 रोजी सकाळी 11 ते 1 वाजता विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 (72-2) या विषयाची परीक्षा बुधवार 31 जुलै 2024 रोजी सकाळी 11 ते 1 या कालावधीत होणार आहे. तसेच उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावीची पुरवणी परीक्षा शुक्रवार 26 जुलै 2024 रोजी होणारी सकाळ सत्र 11 ते 2 या कालावधीत होणारी वाणिज्य संघटन व व्यवस्थापन व अन्नशास्त्र व तंत्रज्ञान तसेच एम.सी.व्ही.सी पेपर-2 या विषयाची परीक्षा शुक्रवार 9 ऑगस्ट 2024 रोजी सकाळ सत्रात 11 ते 2 या कालावधीत होईल. तसेच इयत्ता 10 व 12 वी पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट 2024 लेखी व अन्य परीक्षेच्या उर्वरित वेळापत्रकामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या बदलाची सर्व संबंधितानी नोंद घ्यावी असेही राज्य मंडळ, पुणे यांच्याकडून कळविण्यात आले आहे.
0000
वृत्त क्र. 633
जिल्हा आरोग्य अधिकारी पदावर डॉ. संगिता चंद्रकांत देशमुख रुजू
नांदेड दि. 25 जुलै :-जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी या पदावर डॉ. संगिता चंद्रकांत देशमुख यांची पदस्थापना शासन आदेशान्वये करण्यात आली आहे. त्या अन्वये डॉ. संगिता चंद्रकांत देशमुख या 16 जुलै 2024 रोजी जिल्हा परिषद नांदेड येथे जिल्हा आरोग्य अधिकारी पदावर रुजू झाल्या आहेत.
आरोग्य सेवेतील कामाचा त्यांना प्रदीर्घ अनुभव असून यापुर्वी त्या वाशिम येथे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी व सांगली येथे जिल्हा हिवताप अधिकारी तसेच सातारा येथे तालुका आरोग्य अधिकारी या पदावर कार्यरत होत्या.
जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड या पदावर रुजू झाल्यानंतर त्यांनी अधिकारी व कर्मचारी यांचा विविध आरोग्य विषयक राष्ट्रीय कार्यक्रमांचा सविस्तर आढावा घेवून मार्गदर्शन केले. या अनुषंगाने आवश्यक त्या सूचना केल्या. जिल्ह्यातील नागरिकांना उत्तम व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यात येतील असेही त्यांनी बैठकीत सांगितले.
0000
वृत्त क्र. 632
मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने पुरवठा योजनेच्या
अर्जात त्रुटीची पूर्तता करण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदतवाढ
नांदेड दि. 25 जुलै :-अनुसूचित व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा करणेबाबतची योजना शासनाने सुरु केली आहे. या योजनेच्या अटी व शर्ती निश्चित केलेल्या आहेत.
या योजनेचे प्रस्ताव सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नांदेड कार्यालयास प्राप्त झाले असून 17 जुलै 2024 रोजी त्रुटी पुर्ततेसाठी संबंधीत अर्जदाराच्या भ्रमणध्वनीवर 25 जुलै 2024 रोजीपर्यंत त्रुटी पूर्तता करण्याबाबत कळविण्यात आले होते.
परंतु विविध संघटनानी दिलेली तारीख पुन्हा वाढवून मिळणेबाबत या कार्यालयास विनंती केली आहे. त्यासाठी अनुसूचित व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा करणे या योजनेच्या अर्जात त्रुटीची पुर्तता करण्यासाठी विविध संघटनांच्या विनंतीनुसार 31 जुलै 2024 पर्यत मुदतवाढ देण्यात आली आहे. सदरची मुदतवाढ ही अंतिम असून यापुढे मुदतवाढ दिली जाणार नाही असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.
00000
वृत्त क्र. 631
वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...