Thursday, July 25, 2024

 वृत्त क्र. 631

विष्णूपुरी बंधाऱ्याच्या सखल भागातील नागरिकांनी सावध असावे : जिल्हाधिकारी

नांदेड दि. २५ : नांदेड जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्प असणाऱ्या शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प ८३ टक्के क्षमतेने भरला आहे.त्यामुळे कधीही बंधार्‍याच्या दाराला उघडले जाऊ शकते. नदीपात्रात त्यामुळे विसर्ग वाढेल.प्रकल्पाच्या पुढील गावांनी सतर्क असावे, असा इशारा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिला आहे.

नांदेड जिल्हयातील शंकररावजी  चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे आज  दि. 25 रोजी 83% क्षमतेने भरला आहे.धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चालू असलेल्या सततच्या पावसामुळे प्रकल्पाच्या पाणी पातळीत सतत वाढ होत आहे. बंधाऱ्यात येणाऱ्या पाण्याची आवक लक्ष्यात घेता विष्णुपुरी बंधाऱ्याचा दरवाजा कोणत्याही क्षणी उघडण्यात येईल, अशी सूचना पूर नियंत्रण अधिकारी यांनी केली आहे.

त्यामुळे विष्णुपुरी बंधाऱ्याच्या खालच्या बाजूस असणाऱ्या सर्व गावांतील नागरिकांच्या मालमत्तेचे, जीवित्वाचे, पशुधनाचे,वीटभट्टी साहित्याचे नुकसान होणार नाही,यासाठी नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे, अशी सूचना देण्यात आली आहे.
0000000



No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 1129 लोकसभेसाठी 67.81 तर विधानसभेसाठी 69.45 टक्के मतदान  विधानसभेसाठी भोकर येथे सर्वाधिक 76.33 तर नांदेड उत्तरमध्ये 60.6 सर्वात...