Saturday, February 13, 2021

32 कोरोना बाधितांची भर तर

28 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी 

नांदेड (जिमाका) दि. 13 :- शनिवार 13 फेब्रुवारी 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 32  व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 14 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 18 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या  28  कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.  

आजच्या 563 अहवालापैकी 530 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 22 हजार 823 एवढी झाली असून यातील 21 हजार 770 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 254 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 7 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 590 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.     

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 1, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 17, मुखेड कोविड रुग्णालय 2, खाजगी रुग्णालय 2, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 1, कंधार तालुक्यांतर्गत 4, किनवट कोविड रुग्णालय 1 असे एकूण 28 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 95.38 टक्के आहे.   

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 8, कंधार तालुक्यात 1, मुखेड 1, नांदेड ग्रामीण 2, किनवट 1 असे एकुण 14 बाधित आढळले.  ॲटीजन किट्स तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 13, नांदेड ग्रामीण 5 असे एकूण 18 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 254 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 1, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण 17, मुखेड कोविड रुग्णालय 2, खाजगी रुग्णालय 2, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 1, कंधार तालुक्यांतर्गत 4, किनवट कोविड रुग्णालयात 1 आहेत.   

शनिवार 13 फेब्रुवारी 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 171, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 97 एवढी आहे.   

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 2 लाख 16 हजार 990

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 89 हजार 790

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 22 हजार 823

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 21 हजार 770

एकुण मृत्यू संख्या-590

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी  (गृहविलगीकरण) बरे होण्याचे प्रमाण 95.38 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक 

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-निरंक

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-395

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-254

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-7.          

0000

 

भविष्यातील जगाच्या गरजा लक्षात घेऊन

रोबोट सारखे नाविन्यपूर्ण प्रशिक्षण केंद्र महत्वाचे

-         पालकमंत्री अशोक चव्हाण  

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत 

औद्योगिक यंत्र मानव प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन 

नांदेड (जिमाका) दि. 13 :- भविष्यातील जगाच्या गरजा या पूर्णत: अभियांत्रिकी क्षेत्राशी निगडीत होत चालल्या आहेत. या क्षेत्रातील संशोधन व माणसांच्या कल्पनांनुसार ज्या गरजा दृष्टिपथात आहेत त्याचे आविष्कार व प्रात्याक्षिक शिकण्याची संधी विद्यार्थ्यांना आत्तापासूनच अभियांत्रिकी संस्थांमधून देणे गरजेचे आहे. श्री गुरुगोविंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेच्या यांत्रिकी विभागातील औद्योगिक यंत्र मानव प्रशिक्षण केंद्र हे यादृष्टिने मोठे योगदान देईल असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी या केंद्राची माहिती घेऊन येणाऱ्या विद्यार्थ्यांना हे केंद्र नवीन दिशा देईल असा विश्वास व्यक्त केला. 

श्री गुरुगोविंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेच्या यांत्रिकी विभागातील औद्योगिक यंत्र मानव प्रशिक्षण केंद्राचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. यावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. याचबरोबर आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार श्यामसुंदर शिंदे, उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने, तंत्र शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ, श्री गुरुगोविंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेचे संचालक डॉ. यशवंत जोशी, सहसंचालक प्रा. महेश शिवणकर आदी उपस्थित होते.

000000





 

नांदेडच्या शैक्षणिक शिरपेचात

आता तीन अध्यासनांची भर

पालकमंत्री अशोक चव्हाण व उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

यांच्याकडून शैक्षणिक विस्ताराचा आढावा   

नांदेड (जिमाका) 13 :- मराठवाड्याच्या एका टोकावर असलेल्या नांदेड जिल्ह्यासह लातूर, हिंगोली आणि परभणी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या नव्या वाटा मिळाव्यात यासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठात आता लवकरच भा.प्र.से. पूर्व प्रशिक्षण केंद्र, छत्रपती शिवाजी महाराज अभ्यास केंद्र, डॉ. शंकरराव चव्हाण अभ्यासिका संकुल हे लवकरच आता विद्यापीठ परिसरात साकारल्या जाणार आहेत. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी येथील शैक्षणिक विकासाच्या दृष्टिकोणातून सांगोपांग चर्चाअंती हा निर्णय घेतला. 

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत विविध शैक्षणिक विकास आणि नांदेड येथील शैक्षणिक क्षेत्राच्या विकासाबाबत आज श्री गुरुगोविंद सिंघजी आभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेत विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीस आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार श्यामसुंदर शिंदे, कुलगुरु डॉ. उद्धव भोसले, उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने, तंत्र शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ, संचालक डॉ. यशवंत जोशी आणि विभाग प्रमुख उपस्थित होते. या बैठकीत विद्यापीठ व स्वायत्त दर्जा लाभलेल्या श्री गुरुगोविंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेअंतर्गत विविध शैक्षणिक विकास कामांचा आढावा घेण्यात आला. 

नांदेड येथील शासकिय अध्यापक महाविद्यालयाच्या इमारत बांधकामास मान्यतेसह नांदेड येथील शासकिय तंत्रनिकेतची 1 हजार 272 चौ.मीटरची जागा ईबीसी वसतीगृहासाठी हस्तांतरणाच्या निर्णयाला मान्यता देण्यात आली. या बैठकीत श्री गुरुगोविंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेअंतर्गत प्रलंबित असलेल्या विविध प्रश्नांवर यावेळी चर्चा करुन त्यात मार्ग काढण्यात आला. यात प्रामुख्याने व्यवस्थापन मंडळाच्या अधिकारातील कामांना चालना देणे, शिक्षकीय संवर्गातील रिक्त पदे यावर चर्चा करण्यात आली. महाविद्यालयीन स्तरावर निर्णय घेता यावेत व दैनंदिन कामकाज सुरळीत पार पाडले जावे यादृष्टिने व्यवस्थापन मंडळाची लवकरच नेमणुकीबाबत निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट करण्यात आले. संस्थेचे संचालक डॉ. वाय. व्ही. जोशी यांनी प्रारंभी सर्वांचे स्वागत केले.

0000







  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...