Monday, December 20, 2021

 शासकीय इतमामात जवान डुबुकवाड

यांना साश्रुनयनाने अखेरचा निरोप 

·         पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी कुटुंबियांचे केले सांत्वन  

·         शहीद जवान अमर रहे च्या घोषणेने पंचक्रोशीतील गावकऱ्यांची श्रद्धांजली 

नांदेड (जिमाका)   दि. 20 :-  कंधार तालुक्यातील बाचोटीचे भुमीपूत्र वीर जवान बालाजी श्रीराम डुबुकवाड यांच्या पार्थिवावर आज बाचोटी येथे साश्रुनयनांनी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जम्मू-काश्मिर येथील कुपवाडा येथे भारत मातेचे रक्षणासाठी वीर जवान नायक बालाजी यांना कर्तव्य बजावतांना दिनांक 18 डिसेंबर रोजी वीर मरण आले. भारतीय सैन्यदलातील 101 INF BN (TA) मराठा LI दलातील लान्सनायक म्हणून ते कर्तव्यावर होते. 

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी बाचोटी येथे वीर जवान बालाजी यांना पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, आमदार श्यामसुंदर शिंदे, माजी खासदार डॉ. केशवराव धोंडगे, माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे, माजी आमदार रोहिदास चव्हाण, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी महेश वडदकर, उपविभागीय अधिकारी शरद मंडलीक आदींनी यावेळी वीर जवान बालाजी यांना श्रद्धांजली अर्पण केली. पंचक्रोशीतील नागरीक व युवकांची यावेळी उपस्थिती होती.

00000




 नांदेड जिल्ह्यात 1 व्यक्ती कोरोना बाधित तर 2 कोरोना बाधित झाले बरे

नांदेड (जिमाका) दि. 20 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 736 अहवालापैकी 1 अहवाल कोरोना बाधित आला आहे. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 1 तर अँटिजेन तपासणीद्वारे निरंक अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 529 एवढी झाली असून यातील 87 हजार 852 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 22 रुग्ण उपचार घेत असून 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 655 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 1 असे एकुण 1 बाधित आढळले आहे.

आज जिल्ह्यातील 2 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 2 असे एकूण 2 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 22 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गंत गृह विलगीकरण 3, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 16, खाजगी रुग्णालय 3 अशा एकूण 22 व्यक्ती उपचार घेत आहेत.  

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 90 हजार 226

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 86 हजार 178

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 529

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 852

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 655

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.3 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-01

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-22

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2

कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. मिशन कवच कुंडल अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

 त्रिकुट येथे चित्रकला, गीतगायन स्पर्धेचे आयोजन

विजेत्यांची विद्यार्थ्यांची नावे घोषित 

नांदेड (जिमाका)   दि. 20 :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षे व  रिव्हर्स ऑफ इंडिया उपक्रमाच्या निमित्ताने त्रिकुट येथे जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध स्पर्धाचे आयोजन आज करण्यात आले होते. त्रिकुट पंचक्रोशीतील गावांसह इतर तालुक्यातील विविध विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. यात चित्रकला स्पर्धा, देशभक्तीपर गीतगायन, फोटोग्राफी इत्यादी उपक्रमातर्गंत कार्यक्रम संपन्न झाला.   

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे, उपशिक्षणाधिकारी बनसोडे, उपशिक्षणाधिकारी बंडू आमदुरकर, गटशिक्षणाधिकारी राजेंद्र रोटे, नायब तहसिलदार मुगाजी काकडे, विस्तार अधिकारी अरुणा घोडसे, ग्रामसेवक गुरमे, शोभा भारती, श्री. खेडकर, निजाम शेख, मेकाले, श्री. मुंगल, सर्व शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमूख निरंजन भारती, विजयकुमार धोंडगे, विश्वांभर धोपटे, बळीराम फाजगे, संजय गुजरवाड, बी. डी. जाधव, श्री. गुरुडे, श्री. सोनटक्के यांची उपस्थिती होती. 

आज घेण्यात आलेल्या गीत गायन स्पर्धेत केंद्रीय प्रा. शाळा वाजेगाव येथील इयत्ता 1 ते 5 विद्यार्थी प्रथम तर इयत्ता 6 वी ते 10 मधील सना हायस्कूल ची विद्यार्थी द्वितीय व ज्ञान भारती विद्यार्थी मंदिरचे विद्यार्थी तृतीय. चित्रकला स्पर्धेत केंद्रीय प्राथमिक शाळा वाजेगाव इयत्ता पहिली ते पाचवी कु. तनुजा पचलिंगे प्रथम क्रमांक, प्रा. शाळा इंजेगाव श्रध्दा पुयड द्वितीय, प्रा. शाळा पुणेगाव शालिनी खाडे तृतीय. गट दुसरा 6 ते 10 क्रमांक ज्ञान भारती विद्या मंदिर नांदेडचा रुद्राक्ष तेलंगे प्रथम क्रमांक, सना उर्दू हायस्कूल नांदेड येथील सायरा मरीयम द्वितीय क्रमांक, याच शाळेतील मनिया खान तृतीय क्रमांक. तर गट तिसरा प्रथम क्रमांक शिवाजी हायस्कूलची तेजस्विनी प्रथम क्रमांक, श्रुती अथवाळे द्वितीय क्रमांक, अंकिता मेकाले तृतीय क्रमांक आहेत. विशेष प्रोत्साहान पर बक्षिस वितरण करुन मान्यवरांच्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.  

0000

 त्रिकुट येथील युवा-युवतींनी क्रॉस कॅन्ट्री स्पर्धेत घेतला उत्स्फूर्त सहभाग

 

·         विजेत्यांची नावे जाहीर 

नांदेड (जिमाका)   दि. 20 :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्ष व  रिव्हर्स ऑफ इंडिया उपक्रमाच्या निमित्ताने जिल्हा प्रशासनाने त्रिकुट येथील संगमावर घेतलेल्या मॅरेथॉन स्पर्धेने आज नवी ऊर्जा दिली. पंचक्रोशीतील गावांसह इतर तालुक्यातून सुमारे 300 व्यक्तींनी यात सहभाग घेतला. नांदेड येथील जिल्हा हौसी ॲथेलेन्टींक संघटना, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने क्रॉस कॅन्ट्री स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत विजयी झालेल्याची नावे घोषित करण्यात आली आहेत.   

यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे, माता साहिब गुरुद्वारा बोर्डचे मुख्य जेथेकार बाबा तेजासिंग महाराज, बाबा गुलाबसिंग खालसा, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम, उपविभागीय अधिकारी विकास माने, उप शिक्षणाधिकारी बंडु आमदूरकर, नायब तहसिलदार मुंजाजी काकडे, गटविकास अधिकारी पांडुरंग नारवटकर, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार,  विस्तार अधिकारी राजेंद्र रोटे, क्रीडाधिकारी गुरुदीपसिंग संधू, पाठक, क्रीडा शिक्षक कुलकर्णी, त्रिकुट गावातील जेष्ठ नागरिक व प्रतिनिधी,  तालुक्यातील ग्रामविकास अधिकारी / ग्रामसेवक आदींची लक्षणीय उपस्थिती होती.  

रिव्हर्स ऑफ इंडिया या उपक्रमांतर्गत रविवार 19 डिसेंबर रोजी त्रिकुट क्रॉस कॅन्ट्री स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेस सर्व वयोगटातील खेळांडूनी मोठया प्रमाणात सहभाग नोंदविला. दोन कि.मी अंतर धावणाऱ्या 16 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये पहिल्या पाच विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. तुकाराम नागोराव सुर्यवंशी, ओम कैलास जोनपल्ले, ओमकार गणेश ढगे, रोहन रविकांत गवळी, मनिष यादव बकरे तसेच या स्पर्धेत मुलींमध्ये पहिल्या पाच क्रमांक येणाऱ्यांची नावे याप्रमाणे आहेत. रविना रविकांत गवळी, मधुरा रमेश चौरे, ममता साहेबराव नामेवार, वैभवी संजय मस्के, प्रगती नरसिंग कांबळे अशी आहेत. 

वय 18 वर्षाच्या वयोगटातील चार कि.मी. अंतर धावणाऱ्या मुलीमध्ये आरती दुधे, दुर्गा सुभाष बंडेवार, राजनंदनी संजय मस्के तर 6 किमी अंतर धावणाऱ्या मुलांमध्ये माधव बाबु पेंडलवार, गणेश नरहरी भालेराव, साईनाथ शंकरराव तमलुरे, शिंदे शाम लक्ष्मण, सोनटक्के गितेश शिवाजी, शेट्टे दत्ता कोडिंबा विजेत्यांची नावे घोषित करण्यात आले आहेत. खुला पुरुष गटातील 10 किमी अंतरासाठी माधव तुकाराम मेहकर, आकाश पिराजी वाघमारे, अनिल सिताराम रानडे, कौशल्य अंकुश माधवराव तर मुलींमध्ये उषा व्यंकटी भंद्रे, आरती नागोराव डाकोरे विजेत्यांची नावे घोषित केली आहेत. 

आठ किमी अंतर धावणाऱ्या 20 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये उमाकांत शिवाजी ठोंबरे, गजानन तानाजी जाधव, सुनिल राम बटेवार तर मुलीमध्ये प्रथम पल्लवी गोविंद चिठ्ठे द्वितीय मायावती साहेबराव नामेवार तीन खेळाडूंची नावे घोषित करण्यात आली आहेत.

0000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...