Tuesday, March 4, 2025

 गुरुवार ६ मार्च रोजी होणाऱ्या बायोगॅस व सहकारी दूध संस्था नोंदणी कार्यशाळेला सर्व माध्यम प्रतिनिधी सादर आमंत्रित आहेत या कार्यशाळेला प्रसिद्धी द्यावी ही नम्र विनंती.



 वृत्त क्रमांक 255

वाहनावरील  प्रलंबित ई-चलन भरणा करण्याचे आवाहन 

नांदेड दि. 4 मार्च  :- प्रादेशिक परिवहन कार्यालयातून वाहन धारकांना देण्यात आलेले प्रतिवेदन हे मोठया प्रमाणात प्रलंबित आहे. प्रलंबित प्रतिवेदन, ई-चलन हे तीन महिण्यानंतर कोर्टात पाठविणे आवश्यक आहे. त्यानुसार या कार्यालयाकडून प्रलंबित प्रकरणे न्यायालयात दाखल करण्यात आले आहे.   

न्यायालयाकडून वाहनमालक, चालक यांना या संदर्भात जामीनपात्र व अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व वाहनचालक- मालक यांनी त्यांच्या वाहनावरील प्रलंबित ई-चलनचा भरणा या कार्यालयात येवून किंवा ऑनलाईन पध्दतीने करावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.

00000

 वृत्त क्रमांक 254

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 

 नांदेड दि. 4 मार्च  :- नांदेड जिल्ह्यात 17 मार्च 2025 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 17 मार्च 2025 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहील. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

00000

 वृत्त क्रमांक 253

मोटर सायकल वाहनासाठी नवी मालिका सुरु 

नांदेड, दि. 4 मार्च :- परिवहनेत्तर संवर्गातील मोटार सायकल वाहनांसाठी एमएच 26 –सीटी ही नवीन मालिका लवकरच सुरु होणार आहे. ज्या अर्जदारांना पसंती क्रमांक घ्यावयाचा आहे त्यांनी आधार कार्ड, पॅनकार्ड, मोबाईल नंबर व ईमलसह अर्ज बुधवार 5 मार्च 2025 रोजी दुपारी 2.30 पर्यत स्विकारण्यात येणार आहेत. त्यानंतर पसंती क्रमांकासाठी अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. 

ज्या पसंतीक्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास 5 मार्च 2025 रोजी दुपारी 4 वाजता टेक्स्ट मॅसेज दुरध्वनीद्वारे संबंधित अर्जदारास कळविण्यात येईल. तरी सर्वानी याबाबतची नोंद घ्यावी असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

 गुरुवार ६ मार्च रोजी होणाऱ्या बायोगॅस व सहकारी दूध संस्था नोंदणी कार्यशाळेला सर्व माध्यम प्रतिनिधी सादर आमंत्रित आहेत या कार्यशाळेला प्रसिद...