Friday, August 29, 2025

अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीबाबत #नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री अतुल सावे यांनी आज सविस्तर आढावा घेतला. या बैठकीनंतर माध्यमांशी पालकमंत्री अतुल सावे यांनी #संवाद साधला.



 

वृत्त क्रमांक  922

मेजर ध्यानचंद यांचा जन्म दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणुन उत्साहात संपन्न 

नांदेड दि. 29 ऑगस्ट :-मेजर ध्यानचंद (हॉकीचे खेळाडू) यांचा 29 ऑगष्ट हा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणुन देशभरात साजरा करण्यात येतो. त्यानुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद नांदेड, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड व नांदेड जिल्हा सेपकटाकरॉ असोसिएशनच्यावतीने आज 29 ऑगस्ट रोजी ऑलप्मिक वीर मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात आला. याप्रसंगी 26 वी महाराष्ट्र ज्युनिअर राज्यस्तर सेपकटाकरॉ स्पर्धा सन 2025-26 चे उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला.

राष्ट्रीय क्रीडा दिन निमित्त 29 ऑगस्ट 2025 रोजी सकाळच्या सत्रात मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन शपथ घेण्यात आली. तर सांयकाळ सत्रातील कार्यक्रमप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणुन आमदार बालाजी कल्याणकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन जिल्हा पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार,  जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे, नांदेड जिल्हा सेपकटाकरॉ असो. सचिव प्रवीण कुपटीकर, श्रीमती शिवकांता देशमुख (राज्य क्रीडा मार्गदर्शक तथा कार्यक्रम प्रमुख), रवीकुमार बकवाड (सेपकटाकरॉ असोसिएशन,नांदेड) आदी मान्यवर उपस्थित होते. 

याप्रसंगी आमदार बालाजी कल्याणकर यांनी उपस्थित खेळाडू व प्रशिक्षक यांना राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या व स्पर्धेच्या शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेकरीता राज्यातील विविध जिल्हयातील खेळाडूंनी सहभाग घेतला. तसेच राष्ट्रीय क्रीडा दिन निमीत्त दि. 29 ऑगस्ट 2025 रोजी सांयकाळच्या सत्रात क्रीडा दिन सप्ताह निमीत्त राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग तथा प्राविण्य संपादन केलेल्या खेळाडूंचा, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देवून उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते गौरव करण्यात आला.

आमदार व जिल्हा पोलीस अधिक्षक नांदेड यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमीत्त विजेत्या खेळाडू, पुरस्कारार्थी यांचा सन्मान करुन पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. 

कार्यक्रम यशस्वी करणेकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांचे मार्गदर्शनाखाली कार्यक्रम प्रमुख राज्य क्रीडा मार्गदर्शक श्रीमती शिवकांता देशमुख हे होते. तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी तालुका क्रीडा अधिकारी विजय काकडे, क्रीडा अधिकारी संजय बेतीवार, राज्य क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसीकर, चंद्रप्रकाश होनवडजकर, क्रीडा अधिकारी राहुल श्रीरामवार, कनिष्ठ लिपीक दत्तकुमार धुतडे कार्यालयातील संजय चव्हाण, आकाश भोरे, हनमंत नरवाडे, मोहन पवार, सुभाष धोंगडे, विद्यानंद भालेराव, चंद्रकांत गव्हाणे, यश कांबळे व सोनबा ओव्हाळ तसेच नांदेड जिल्हा सेपकटाकरॉ असोसिएशनचे खेळाडू, प्रशिक्षक आदीनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन बालाजी शिरसीकर यांनी केले तर आभार प्रदर्शन संजय बेतीवार यांनी मानले.

00000






वृत्त क्रमांक  921  

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा : पालकमंत्री अतुल सावे

 

·         जिल्हाधिकारी कार्यालयात पूरपरिस्थितीचा घेतला आढावा

 

नांदेड दि. 29 ऑगस्ट :- नांदेड जिल्ह्यात मागील दोन दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे प्रशासनाने तात्काळ पंचनामे पूर्ण करुन अहवाल शासनाकडे सादर करावा. जेणेकरुन नुकसानग्रस्तांना तातडीने नुसान भरपाई देण्यात येईल, असे राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी सांगितले.

 

अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीबाबत पालकमंत्री अतुल सावे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात सविस्तर आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार रविंद्र चव्हाण, आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. प्रारंभी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली.

 

पालकमंत्री अतुल सावे यांनी कृषी, आरोग्य, जलसिंचन, बांधकाम, पुशसंवर्धन, विद्युत, महानगरपालिका विभागांच्या अधिकाऱ्यांकडूनही जिल्ह्यातील परिस्थिती विषयी माहिती जाणून घेऊन या सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याची सूचना केली. पावसामुळे पिकांचे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत. यासोबतच इतर नुकसानीचेही पंचनामे करुन शासनाकडे अहवाल सादर करावा. याबाबत मंत्रीमंडळ बैठकीत मंजुरी घेऊन तातडीने नुकसानग्रस्तांना भरपाई दिली जाईल. आरोग्य विभागाने आपली यंत्रणा सज्ज ठेवावी. विशेषत: साथरोग पसरु नये म्हणून आवश्यक ती खबरदारी घ्यावी. नगरपालिका व महानगरपालिकेने शहरात आरोग्याच्याबाबत दक्षता घ्यावी. बांधकाम विभागाने पावसामुळे नादुरुस्त झालेल्या रस्त्यांचे सर्वेक्षण करुन तात्काळ दुरूस्ती करावी. पशुसंवर्धन विभागाने मृत झालेल्या जनावरांचे पंचनामे करावेत. विद्युत विभागाने खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करावा. जलसंपदा विभागाने हवामान खात्याचे अंदाज लक्षात घेऊन आवश्यक ती खबरदारी घ्यावी. ज्यांच्या घरामध्ये पुराचे पाणी जाऊन नुकसान झाले आहे त्यांनाही नुकसान भरपाई दिली जाईल, असेही पालकमंत्री अतुल सावे यांनी सांगितले. जिल्हा नियोजन समितीचा 5 टक्के निधी हा आपत्ती व्यवस्थापनासाठी राखीव ठेवण्यात येतो. त्याअनुषंगाने प्रस्ताव तयार करुन शासनाकडे मान्यतेसाठी पाठवावा, असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.

 

दरम्यान नांदेड शहरात, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना नृसिंह विद्यामंदिर हायस्कुल श्रावस्तीनगर येथे स्थलांतरीत केले आहे. याठिकाणी पालकमंत्री अतुल सावे यांनी भेट देऊन नागरिकांची विचारपूस केली.

00000















 

वृत्त क्रमांक 1277   जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध   नांदेड (जिमाका) ,  दि .   5 :-   जिल्हा माहिती कार्यालय ,   नांदे...