Friday, August 29, 2025

 वृत्त क्रमांक 918

इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी शासकिय वसतिगृह प्रवेश  

 ·   ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेंतर्गत मिळणार भोजन व निवास भत्ता

नांदेड दि. 29 ऑगस्ट :- इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत लातूर प्रादेशिक विभागातील लातूर, धाराशिव, नांदेड व हिंगोली जिल्ह्यातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्याजमाती व विशेष मागास प्रवर्गातील 12 वी उत्तीर्ण झालेल्या मुला-मुलींचे शासकिय वसतिगृहात प्रवेशित विद्यार्थ्यांना सर्व सोई-सुविधा मोफत पुरविण्यात येतात. तसेच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेंतर्गत भोजनभत्ता व निवासभत्ता पुरविण्यात येतो. सन 2025-26 साठी शासकिय वसतिगृह, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम या योजनेतंर्गत व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेश अर्ज 1 ते 18 सप्टेंबर 2025 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर स्विकारले जाणार आहेत. 

संबंधित जिल्हास्तरावरील वसतिगृहात प्रवेशाबाबत इच्छुक विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर अर्ज भरुन सदर अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह दिलेल्या मुदतीत सादर करावे. तसेच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेतंर्गत इच्छुक विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर अर्ज भरुन सदर अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह वरील दिलेल्या दिनांकापर्यंत कार्यालयात संबंधित कर्मचाऱ्यांकडे सादर करावीत. 

उच्च शिक्षणासाठी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना वसतिगृह तसेच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेतंर्गत संबंधित प्रवर्गनिहाय विहीत आरक्षणानुसार तसेच गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येईल. 

लातूर विभागातील शासकीय वसतिगृह असलेल्या जिल्ह्यासाठी सन 2025-26 साठी वसतिगृह, पंडीत दिनदयाळ स्वयंम व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार यासाठी अर्ज करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. 

बारावीनंतरच्या व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमास (बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) या बाबीच्या प्रवेशासाठी अर्ज करावयाचा कालावधी 1 ते 18 सप्टेंबर 2025 पर्यंत राहील. अर्ज छाननी करावयाचा कालावधी 19 ते 24 सप्टेंबर 2025 राहील. पहिली निवड यादी गुणवत्तेनुसार अंतीम करणे व प्रसिध्द 25 सप्टेंबर रोजी होणार आहे. पहिली निवड यादीनुसार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची अंतिम मुदत 6 ऑक्टोंबर 2025 आहे. रिक्त जागेवर दुसऱ्या प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार निवड यादी 9 ऑक्टोंबर 2025 रोजी प्रसिद्ध होणार आहे. दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशांची अंतिम मुदत 17 ऑक्टोंबर 2025 राहील. 

शासकीय वसतिगृहासाठी पात्र असलेल्या तथापि गुणवत्तेनुसार व वसतिगृहाच्या क्षमतेअभावी वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज पंडीत दिनदयाळ स्वंयम व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी विचारात घेतले जातील, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण (प्रादेशिक) विभाग लातूरचे प्रादेशिक उपसंचालक डॉ. तेजस माळवदकर यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक 1277   जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध   नांदेड (जिमाका) ,  दि .   5 :-   जिल्हा माहिती कार्यालय ,   नांदे...