Monday, September 7, 2020

 

181 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

336 बाधितांची भर तर सात जणांचा मृत्यू    

नांदेड (जिमाका) दि. 7 :- सोमवार 7 सप्टेंबर 2020 रोजी सायं. 5.30  वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 181 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 336 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 174 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 162 बाधित आले. 

आजच्या एकुण 1 हजार 236 अहवालापैकी  833 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 9  हजार 246 एवढी झाली असून यातील  5  हजार 834 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे उपचारानंतर घरी सोडण्यात आलेल्या बाधित रुग्णांचे प्रमाणे 65.46 टक्के एवढे झाले आहे. एकुण 3 हजार 78 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 41 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. 

 

या अहवालात रविवार 6 सप्टेंबर रोजी लोकमित्र नगर नांदेड येथील 70 वर्षाचा एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे, पिंपळगाव पोरका येथील 50 वर्षाचा एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात तर सोमवार 7 सप्टेंबर रोजी शिवाजी चौक सिडको येथील 50 वर्षाचा एक पुरुष, बिलोली तालुक्यातील कासराळी येथील 46 वर्षाचा एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे, हदगाव येथील 87 वर्षाचा एका पुरुषाचा, गोकुळनगर नांदेड येथील 70 वर्षीय एक महिला, बारड येथील 60 वर्षीय एका महिलेचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 272 झाली आहे.  

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथील 21, मुखेड कोविड केंअर सेंटर 4, देगलूर जैनब कोविड केंअर सेंटर 10, खाजगी रुग्णालयातून 9, माहूर कोविड केंअर सेंटर 2, बारड कोविड केंअर सेंटर 2, मुदखेड कोविड केंअर सेंटर 7, पंजाब भवन कोविड केंअर सेंटर नांदेड 123, किनवट कोविड केंअर सेंटर 3 असे 181 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.  

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपाक्षेत्र 50, अर्धापूर तालुक्यात 1, देगलूर 12, हिमायतनगर 2, बिलोली 19, किनवट 5, लोहा 4, उमरी 1, हिंगोली 1, बीड 2, नांदेड ग्रामीण 7, मुदखेड 1, भोकर 1, हदगाव 24, नायगाव 15, मुखेड 23, कंधार 3, यवतमाळ 2, नागापूर 1 असे एकुण 174 बाधित आढळले.  

तर अँटिजेन तपासणीद्वारे  नांदेड मनपा क्षेत्र 80, अर्धापूर तालुक्यात 4,  देगलूर 2, किनवट 8, नायगाव 6, भोकर 5, धर्माबाद 1, नांदेड ग्रामीण 2, मुदखेड 3, लोहा 12, कंधार 13, हदगाव 7, माहूर 19 असे  एकुण 162 बाधित आढळले.

 जिल्ह्यात 3 हजार 78 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 263, एनआरआय व पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 1 हजार 333, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड येथे 96, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 77, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 79, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 111,  देगलूर जैनब कोविड केअर सेंटर येथे 68, लोहा कोविड केअर सेंटर येथे 120, हदगाव कोविड केअर सेंटर 85, भोकर कोविड केअर सेंटर 33,  कंधार कोविड केअर सेंटर येथे 37,  किनवट कोविड केअर सेंटर येथे 99, अर्धापूर कोविड केअर सेंटर येथे 44, मुदखेड कोविड केअर सेटर 31,  माहूर कोविड केअर सेंटर येथे 73, आयुर्वेदिक शासकिय रुग्णालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 39, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 48, उमरी कोविड केअर सेंटर 54, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 8, बारड कोविड केअर सेंटर 4, खाजगी रुग्णालयात 348 बाधित, औरंगाबाद येथे संदर्भित 18, निजामाबाद येथे 3 बाधित, मुंबई येथे 1 बाधित तर हैद्राबाद येथे 5 बाधित, लातूर येथे 1 बाधित  संदर्भित झाले आहेत.  

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 56 हजार 533,

निगेटिव्ह स्वॅब- 45 हजार 10,

आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 336,

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 9 हजार 246,

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-28,

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 11,

एकूण मृत्यू संख्या- 272,

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 5 हजार 834,

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 3 हजार 78,

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 527, 

आज रोजी अती गंभीर प्रकृती असलेले बाधित- 41.  

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.   

00000

 

 

 

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचे ऑनलाईन सत्र  

नांदेड (जिमाका) दि. 7 :- जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांच्यावतीने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाबाबत ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन मंगळवार 8 सप्टेंबर 2020 रोजी दुपारी 3 ते 4 यावेळेत करण्यात आले आहे. जिल्ह्यातील युवक-युवतींनी या ऑनलाईन मार्गदर्शन सत्रामध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन कार्यालयाचे सहायक आयुक्त यांनी केले आहे.  

कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता केंद्राचे (परिविक्षाधीन अधिकारी) सहायक आयुक्त गौरव इंगोले (उपजिल्हाधिकारी पदी निवड एमपीएससी-2019) हे मार्गदर्शन करणार आहेत. या मार्गदर्शन सत्रात सहभागी होण्यासाठी पुढील सूचनांचे पालन करावे.  Meeting URL: https://meet.google.com/uti-qros-rng  या लिंकवर क्लिक करावे. आपल्याकडे Google meet app यापूर्वी install केलेले नसेल तर install करून घ्यावे. आपण Google meet app मधून कनेक्ट झाल्यानंतर Ask to join वर क्लिक करावे. या सत्रामध्ये सहभागी होण्यासाठी 10 मिनिटे वेळेपूर्वी जॉईन करावे.  दिलेल्या लिंक मधून connect झाल्यावर लगेच आपला video  mice mute/ बंद करावे. सत्राच्या शेवटी काही प्रश्न विचारावयाचे असल्यास माईक  unmute / सुरु करून विचारावे व लगेच  माईक mute / बंद करण्याची दक्षता घ्यावी. अधिक माहितीकरिता जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड 02462-251674 येथे संपर्क करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

 

 

 

कोरोनावरील उपचार आणि विलगीकरणासाठी खाटा वाढवणार !

-         पालकमंत्री अशोक चव्हाण 

नांदेड (जिमाका) दि. 7 :-  जिल्ह्यातील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शासकीय व खासगी अशा दोन्ही क्षेत्रात उपचार आणि विलगीकरणासाठी खाटांची संख्या वाढवली जाणार असल्याचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीसंदर्भात सोमवारी सकाळी सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. रविवारी रात्री व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक झाली असून या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. 

आपल्या संबोधनात पालकमंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, नांदेड जिल्ह्यात रोज साधारणतः 250-300 रूग्ण आढळून येत आहेत. समाधानाची बाब म्हणजे तेवढेच रूग्ण रोज बरे होऊन घरी जातात. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्युचा दर देखील कमी झाला आहे. असे असले तरी परिस्थिती काळजी करण्यासारखीच आहे. रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता लवकरच उपचार आणि विलगीकरणासाठी उपलब्ध सुविधांमध्ये वाढ केली जाणार आहे. वैद्यकीय पायाभूत सुविधांसोबतच निधी व मनुष्यबळाची उपलब्धता महत्वाची आहे. जिल्ह्याला पैसा कमी पडू दिला जाणार नाही. पैशाविना कोणतेही काम अडणार नाही, याची खबरदारी घेतली जाते आहे. आरोग्य आणि अर्थव्यवस्था या दोन्ही बाबी एकाचवेळी सांभाळण्याचे मोठे आव्हान समोर आहे. आर्थिक व्यवहार नियंत्रित पद्धतीने सुरू ठेवून कोरोना रोखणे, हाच एकमेव पर्याय आपल्या सर्वांसमोर आहे. अशा परिस्थितीत सर्वांनी एकमेकांच्या सुरक्षेची काळजी घेण्याची गरज पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी विषद केली. 

डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई कर्मचारी, पोलीस व इतर विभागांचे कर्मचारी मागील अनेक महिन्यांपासून रात्रीचा दिवस करून काम करीत आहेत. त्यांना सुट्टी नाही, पुरेशी विश्रांती नाही. तरीही ते उसंत न घेता रूग्णसेवेत व्यस्त आहेत. कोरोना रोखण्यासाठी शासनाने दिलेले दिशानिर्देश पाळावेत आणि अनावश्यक गर्दी टाळून या कोरोनायोद्ध्यांना सहकार्य करावे, असे आवाहन देखील पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.

 

पालकमंत्र्यांच्या आढावा बैठकीतील महत्वाचे निर्णय

·         नांदेड जिल्‍ह्यातील शासकीय रूग्णालयात खाटांची संख्या वाढवणार.

·         नांदेडमधील 9 खासगी रूग्णालयांमध्ये 10 टक्के खाटा वाढवणार.

·         50 खाटांची क्षमता असलेल्या दोन खासगी रूग्णालयांना कोविड-19 उपचार केंद्र करण्याची बोलणी सुरू.

·         डॉ. शंकरराव चव्‍हाण वैद्यकिय महाविद्यालयात 10 सप्टेंबरपर्यंत ऑक्‍सीजनसह अतिरिक्त 80 खाटांचे नियोजन करणार.

·         गुरुगोविंदसिंघ जिल्‍हा रुग्‍णालयाच्या नवीन इमारतीत ऑक्‍सीजनसह 150 खाटा एका आठवड्यात उपलब्ध करणार.

·         शासकीय आयुर्वेद महाविद्यालय,नांदेड येथे 30 सप्टेंबरपर्यंत ऑक्‍सीजनसह 100 खाटा व विनाऑक्‍सीजन 50 खाटा उपलब्‍ध होणार.

·         अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथील ट्रॉमा हॉस्पिटलला 30 खाटांच्या ऑक्‍सीजन सुविधेसह कोविड-19 सेंटर म्‍हणून कार्यान्‍वीत करणार.

·         जिल्ह्यातील ऑक्सिजन साठा व पुरवठ्यासंदर्भात दैनंदिन आढावा घेणार.

·         कोरोना रूग्णांसाठी खाटा उपलब्‍ध होत नसल्‍याच्या तक्रारी येत असल्याने खाटा व्यवस्थापनासाठी नियंत्रण कक्ष उभारणार.

·         रूग्‍णांच्‍या स्थितीची माहिती नातेवाईकांना देण्यासाठी व्‍हीडीओ कॉलिंग सुविधा सुरू करणार.

·         खाजगी रुग्‍णालयात जादा बिल आकारले जात असल्याच्या तक्रारींचे निरसन करण्यासाठी यंत्रणा अधिक कार्यक्षम करणार.

या बैठकीला जिल्‍हाधिकारी डॉ. बिपिन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी,  महापालिका आयुक्त डॉ. सुनिल लहाने, अप्पर जिल्‍हाधिकारी खुशालसिंह परदेशी, उपजिल्‍हा निवडणूक अधिकारी प्रशांत शेळके, जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. निळकंठ भोसीकर, डॉ.शंकरराव चव्‍हाण वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. मोरे, शासकीय आयुर्वैद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. यशवंत पाटील, मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुरेशसिंघ बिसेन आदी उपस्थित होते.

000000

 

दि. 7 सप्टेंबर, 2020

प्लाझ्मा दानामध्ये महाराष्ट्र आघाडी घेईल

दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील कोरोनाशी दोन हातया चर्चासत्र मालिकेचासमारोप आज प्रसारित होणाऱ्या भागाने होत आहे. शेवटच्या भागात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शांतीलाल मुथ्था यांनी कोरोना: प्लाझ्मा आणि सिरो सर्व्हेलन्स याविषयी संवाद साधला.त्याचा संपादित अंश.

 

श्री. शांतिलाल मुथ्था : कोरोनामुळे होणारा मृत्युदर कमी करायचा असेल तर अनेक गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. प्लाझ्मा दिल्याने कोरोनाबाधित रुग्ण जे मध्यम स्वरूपाचे असतात त्यांना त्याचा फायदा होतो आणि ते त्यातून बरे होतात. कोरोनातून जे लोक बरे झाले आहेत त्यांच्याकडून प्लाझ्मा घेऊन आत्ता सध्या कोरोनाबाधित असणाऱ्या रुग्णांना त्याचा फायदा होऊ शकतो. प्लाझ्मा म्हणजे नेमकं काय? प्लाझ्मा दिल्याने काय होतं? आणि प्लाझ्मा देण्यासाठी पात्रता काय?               

 

आरोग्यमंत्री राजेश टोपे  : प्लाझ्माचा प्रयोग महाराष्ट्रात सुरू आहे आणि त्यामध्ये यशही मिळत आहे. साधारणपणे दहापैकी नऊ केसेसमध्ये प्लाझ्मा  दिला गेला ते रुग्ण बऱ्यापैकी लवकर बरे झाले असा त्यातला अनुभव आहे. आपल्या शरीरातील रक्तातून पेशी बाजूला काढल्या तर जे पिवळे द्रव्य उरते तो प्लाझ्मा. त्याच्यामध्ये ज्या अँटीबॉडीज असतात त्या आपल्या शरीराच्या खऱ्या अर्थाने डिफेन्स मॅकॅनिजम असतात. ज्या व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी उपयुक्त असतात.

प्लाझ्मा कोण देऊ शकतो? जी व्यक्ती १८ ते ६० वयोगटातील असेल, हिमोग्लोबिन (HB) १२.५ टक्के असेल, वजन साधारणपणे ५० किलोपेक्षा जास्त असेल, कोमॉर्बीडीटी नसेल, म्हणजेच रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, मुत्रपिंड, हृदयविकार नसतील अशा लोकांचा प्लाझ्मा आपल्याला घेता येतो. जे लोक कोरोनाबाधित बरे होऊन २८ दिवस झाले आहेत त्यांना प्लाझ्मा दान करता येतो. प्लाझ्मा देत असताना प्लाझ्माफेरीसीस यंत्रातून काढला जातो. यामध्ये जो दाता आहे त्याचा प्लाझ्मा कम्पलसरी ट्रायटेट केला जातो आणि त्या ठिकाणी १:६४ अशा पद्धतीने ते असेल तर तो प्लाझ्मा पात्र असतो. आमच्या  संकेतस्थळावर  एसबीटीसी (स्टेट ब्लड ट्रान्सफ्युजन कौन्सिल) येथे भेट देऊन ज्याला प्लाझ्मा दान करायचाय आणि ज्याला प्लाझ्मा हवाय अशांची नोंद करता येते.

 

रक्तदान हे महान दान आहे तसे "प्लाझ्मादान हे श्रेष्ठदान" म्हणता येईल. प्लाझ्मा दान केल्यानेकाही त्रास होत नाही. आपण काही गरजूंचे जीव नक्की वाचवू शकतो. आज महाराष्ट्रामध्ये जे कोरोनातून बरे झालेले पाच लाख लोक आहेत त्यापैकी प्लाझ्मा दानाच्या  दृष्टिकोनातून बरेच जण पात्र असू शकतात. या सगळ्या योद्ध्यांनी जास्तीत जास्त पुढाकार घेऊन प्लाझ्मा दानाच्या कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवावा अशी माझी विनंती आहे.

 

श्री. शांतिलाल मुथ्था: प्लाझ्मा द्यायचा म्हणजे कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तीच्या रक्तातून प्लाझ्मा काढून घेतला जातो. म्हणजे त्या व्यक्तीचे रक्त घेतले नाही असा जर मी त्यातून अर्थ काढला तर तो बरोबर आहे का?

 

आरोग्यमंत्री राजेश टोपे:बरोबर आहे. त्यातल्या पेशी ज्या आहेत त्या आपल्या जवळ राहतात व पिवळ्या रंगाचा द्रव कोरोनाबाधित रुग्णाला दिला जातो.

 

श्री. शांतिलाल मुथ्था: अठरा वर्षाच्या पुढील कोमॉर्बीड नसलेले, प्रकृती चांगली असणे ही एक पात्रता झाली. दुसरी पात्रता अशी क, त्यांन आधी रक्त चाचणी करून एचआयव्ही, हेपॅटायटस बी आहे का? या सगळ्या गोष्टी बघणं, त्याच्यानंतरच मग प्लाझ्मा घेणे  जरुरी आहे का?

 

आरोग्यमंत्री राजेश टोपे :एखाद्याचे वजन ४० किलो असेल तर त्याचा प्लाझ्मा घेणे शक्य होणार नाही. एखाद्याचं हिमोग्लोबीन ८ टक्के असेल आणि ती व्यक्ती कोरोनातून बरे झाला असेल तरीही प्लाझ्मा दानासाठी ते  पात्र नाहीत. त्यामुळे या सगळ्या गोष्टींची आपल्याला माहिती घेणे व पात्रता तपासणे महत्वाचे आहे.

 

श्री. शांतिलाल मुथ्था : प्लाझ्मादानासाठी पात्रता तपासणीनंतर प्लाझ्मादात्याबरोबर सुसंवाद असणे गरजेचे आहे. कारण आधी ते सांगतात की प्लाझ्मा द्यायला तयार आहेत. परंतु नंतर नाही म्हणतात.

 

आरोग्यमंत्री राजेश टोपे :प्लाझ्मा देण्यासाठी योग्य प्रकारे समुपदेशन करता आले पाहिजे. प्लाझ्मा दान हे एक खूप श्रेष्ठदान आहे, हा विश्वास त्याला वाटणे हे महत्वाचे आहे. त्यासाठी त्याचे प्रबोधन करणे, प्रोत्साहित करणे, प्लाझ्मा दानासाठी प्रवृत्त करणे महत्वाचे आहे. काही स्वयंसेवी संस्थांनी त्यामध्ये सहभाग घेऊन या कार्यक्रमाला प्रतिसाद दिला तर नक्कीच प्लाझ्मा डोनेशनच्या कार्याला हातभार लागू शकतो.कोरोनाच्या विरुद्ध लढण्याच्या दृष्टीकोनातून या कार्यामध्ये आपण हातभार लावावा, असे आवाहन मी जरूर करेन.

 

श्री. शांतिलाल मुथ्था : भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून प्लाझ्मादानाच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर मोहीम हाती घेतली आहे. यासंदर्भात आम्ही काय काम करू शकतो की जेणेकरून मुख्यमंत्री महोदयांनी केलेल्या घोषणेप्रमाणे महाराष्ट्र हे एक नंबरचे राज्य बनू शकेल?

 

आरोग्यमंत्री राजेश टोपे :राज्य शासन, भारतीय जैन संघटना आणि आमच्या लॅब असे आपण एकत्र येऊन मॉडेल तयार करता येईल. तुमचीभूमिकाप्रोत्साहन देण्याची आहे. एक चांगली व्यवस्था निर्माण करूया. आपल्या संकेतस्थळाला भेट देऊन ज्याला प्लाझ्मा द्यायचाय आणि ज्याला घ्यायचाय त्याने तशी नोंद करावी. जे देणारे आहेतआणि जे घेणारे आहेत अशा दोघांनाही तुम्ही संपर्क करून आमच्याकडे सुपूर्द करा. प्लाझ्मादानामध्येसुद्धा महाराष्ट्र  एक नंबरचे राज्य होईल. भारतीय जैन संघटनेचे यामध्ये योगदान असावं.

 

श्री. शांतिलाल मुथ्था:एकदा दिलेला प्लाझ्मा किती दिवसांपर्यंत आपण वापरू शकतो? एक वर्षापर्यंत तो राहू शकतो का?

 

आरोग्यमंत्री राजेश टोपे:प्लाझ्मा फ्रोजन करून ठेवण्याची पद्धत आहे.सध्या टेक्नॉलॉजी पुढे गेलेली आहे त्या माध्यमाने आपल्याला हे करता येऊ शकेल.

 

श्री. शांतिलाल मुथ्था:थेट बऱ्या झालेल्या रुग्णाने दुसऱ्या रुग्णाला प्लाझ्मा दिला, जसं रक्तदान करतात.ते तर आपण त्वरित देतो आणि जर आपण फ्रोजन म्हणून त्याला जतन करून ठेवण्याचा प्रयत्न केला तर तो एक वर्षापर्यंत देता येतो.

 

आरोग्यमंत्री राजेश टोपे :ब्लड फ्रोजन करून ठेवता येत नाही. प्लाझ्माला जी एक प्रॉपर्टी आहे, त्याचा वापर आपल्याला प्लाझ्मा फ्रोजन करण्याच्या  दृष्टीकोनातून करता येईल.

 

श्री. शांतिलाल मुथ्था :भविष्यात जरी आपल्याकडे अशी कुठली लाट आली तरी आपल्याकडे प्लाझ्माची बँक तयार असेल, जितकी जास्तीत जास्त तयारी असेल तितका त्याचा फायदा होईल. मी असं सुद्धा ऐकलेलं आहे की, आपण धारावीला आणि मालेगावला प्लाझ्मा बँक करणार आहात.

 

आरोग्यमंत्री राजेश टोपे :ज्या ठिकाणी नव्याने रुग्ण नाहीत तिथे  सिरोसर्व्हेलन्स झाला आहे त्यामध्ये धारावीतल्या ५६ टक्क्यांपेक्षा अधिक लोकांमध्ये आयजीज (IGG)चे प्रमाण म्हणजे न्यूट्रीलायझिंग अँटीबॉडीजचे  प्रमाण आढळलेले आहे. याचा अर्थ तेथे डोनर्सची संख्या जास्त असू शकते. त्यामुळे  प्लाझ्मा बँक तयार केली तर त्याचा रुग्णांना उपयोग होऊ शकतो.

 

श्री. शांतिलाल मुथ्था : जे लोकं अँटीबॉडी टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आलेले ते देखील प्लाझ्मा दानासाठी पात्र आहेत का?

 

आरोग्यमंत्री राजेशजी टोपे :होय. त्यासाठी अँटीबॉडीचाचण्या मोठ्या पद्धतीने घ्याव्या लागतील. महाराष्ट्रात आता साडेसहा लाख पॉझिटिव्ह रुग्णआढळले. त्यातले पाच लाख बरे झाले. या पाच लाखांपैकी जे काही पात्र होतील. परंतु जे कदाचित ज्यांना इन्फेक्शनझालं, त्यातून ते बरे सुद्धा झाले, त्यांची यादी आपल्याकडे नाही. त्यामुळे त्यांना सिरोसर्व्हेलन्स करून लक्षात घ्यावे लागेल, यादी तयारी करावी लागेल आणि ते पण या पातळीत बसतात का ते बघावं लागेल, असतील तर त्यांचाही प्लाझ्मा आपल्याला घेता येईल.

 

 

श्री. शांतिलाल मुथ्था:िरोसर्व्हेलन्स म्हणजे नेमके काय ?

आरोग्यमंत्री राजेश टोपे : सिरो सर्व्हेलन्स हा एखाद्या समूहामध्ये किती संसर्ग झाला आहे याचं प्रमाण समजून घेण्यासाठी केलेला अभ्यास आहे. धारावीमध्ये १०० पैकी ५६ लोकांमध्ये आयजीजीअँटीबॉडीज सापडल्या. याचा अर्थ एवढाच आहे कीप्रतिकारशक्तीनिर्माण होण्यास झालेली सुरुवात.

 

श्री. शांतिलाल मुथ्था :आता फक्त हे मुंबईमध्ये झालं तसं आतापर्यंत किती ठिकाणी सिरोसर्व्हेलन्स झालेले आहेत?

 

आरोग्यमंत्री राजेश टोपे :सिरोसर्व्हेलन्स मुंबई, पुणे, मालेगाव नंतर आता औरंगाबादमध्ये काही प्रमाणात झाला आणखी काही हॉटस्पॉटमध्ये आपल्याला करता येऊ शकतो असा आमचा मानस आहे.

 

अजय जाधव..७.९.२०२०

000

 

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...