Sunday, October 15, 2023

 

सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे यांचा दोरा

                                                                                          

नांदेड, (जिमाका) दि. 15 :- राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक बांधकाम) मंत्री दादाजी भुसे हे सोमवार 16 ऑक्टोंबर 2023 रोजी मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्यासमवेत नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत  आहेत.

0000

 सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा 

 

नांदेड (जिमाका) दि. 15  :- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाची स्थापना भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नातून 15 ऑक्टोबर 1932 रोजी मुंबई येथे झाली. या घटनेला 15 ऑक्टोंबर 2023 रोजी 91 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानुषंगाने समाज कल्याण विभागाचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी अधिनस्त क्षेत्रीय स्तरावरील कार्यालयेशासकिय वसतिगृहे व शासकीय निवासी शाळा या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करुन समाज कल्याण विभागाचा वर्धापन दिन साजरा करणेबाबत निर्देश दिले आहे.  

 

त्याअनुषंगाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील सांस्कृतिक सभागृहात सहाय्यक आयुक्तसमाज कल्याण नांदेडजिल्हा समाज कल्याण अधिकारी-जिल्हा परिषद नांदेड व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणीनांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक न्याय विभागाच्या वर्धापन दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आज  संपन्न झाला.

 

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा अध्यक्षजिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सुनिल महिंद्रकर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून अ.ना.गोडबोलेसेवानिवृत्त वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक व डॉ.भिमराव हटकर-सामाजिक कार्यकर्तेएल.जी.कदम-सेवानिवृत्त समाज कल्याण अधिकारी व सेवानिवृत्त समाज कल्याण अधिकारी आर.व्ही.पुराणिक हे होते.   

 

यावेळी महामानवाचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन दीप प्रज्वलीत करण्यात आले. तसेच याप्रसंगी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांची जयंती साजरी करण्यात आली. तसेच या प्रसंगी सामजिक न्याय विभागातील सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांचे शालश्रीफळ व पुष्पगुच्छ देवून यथोचित सत्कार करण्यात आला.

 

प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी केले. प्रास्ताविकेत त्यांनी सामाजिक न्याय विभागाच्या स्थापनेचा संपूर्ण इतिहास सांगून उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी सामाजिक न्याय विभागामध्ये सेवा करण्याची संधी मिळाल्यामुळे ऋण व्यक्त करून वर्धापन दिनानिमित्त उपस्थित सर्व अधिकारी /कर्मचारी  व विद्यार्थी/विद्यार्थींनी यांना शुभेच्छा दिल्या. 

 

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे से.नि.वरिष्ठ समाज कल्याण निरिक्षक अ.ना.गोडबोले यांनी सामाजिक न्याय विभागाच्या वर्धापन दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले. तसेच सामाजिक कार्यकर्ते भिमराव हटकर यांनी सामाजिक न्याय विभागाचे स्थापनेबाबतची माहिती देवून मोलाचे मार्गदर्शन केले. जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार यांनी सामाजिक न्याय विभागाच्या वर्धापन दिनामित्त मनोगत व्यक्त केले. समाज कल्याण अधिकारी बी.एस. दासरी यांनी समाज कल्याण विभागाच्या स्थापनेपासून आजतागायत वाटचालीची माहिती दिली.

 

कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनिल महिंद्रकर-अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा अध्यक्षजिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीनांदेड यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात  सामाजिक न्याय विभागाचे महत्व सांगून मोलाचे मार्गदर्शन केले व उपस्थित सर्व अधिकारी कर्मचारी यांनी वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. 

 

 या कार्यक्रमास सामाजिक न्याय विभागातील सेवानिवृत्त अधिकारी एल.जी.कदमआर.व्ही.पुराणिक  व कर्मचारी सिद्धराम वनशेटेनारायण सदावर्तेसंजय खिरे हे उपस्थित होते तसेच सहाय्यक आयुक्तसमाज कल्याणनांदेड कार्यालयातील सर्व अधिकारी/ कर्मचारी उपस्थित होते. 

या कार्यक्रमाचे सुत्रसचंलन गजानन पंपटवारतालुका समन्वयक यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती  एल.एस. गायकेवरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक यांनी केले.

0000



 राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचा दौरा

                                                                                          

नांदेड, (जिमाका) दि. 15 :- राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.

 

सोमवार 16 ऑक्टोंबर 2023 रोजी जळगाव विमानतळ येथून खाजगी विमानाने नांदेड विमानतळ येथे सकाळी 10.45 वा. आगमन व शासकीय वाहनाने ऊसतोड कामगार महामेळावा महाराष्ट्र 2023 या कार्यक्रम स्थळाकडे प्रयाण. स्थळ क्रिकेट मैदान, गोदावरी ढवळकेवाडी तांडा अहमदपूर रोड, गंगाखेड जिल्हा परभणी. दुपारी 3 वा. नांदेड विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 3.45 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन. दुपारी 4 वा. नांदेड विमानतळ येथून खाजगी विमानाने मुंबई विमानतळाकडे प्रयाण करतील.

00000 

 राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचा दौरा

                                                                                          

नांदेड, (जिमाका) दि. 15 :- राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील हे नांदेड जिल्हा दौरा येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.  

 

सोमवार 16 ऑक्टोंबर 2023 रोजी जळगाव विमानतळ येथून खाजगी विमानाने नांदेड विमानतळ येथे सकाळी 10.45 वा. आगमन व शासकीय वाहनाने ऊसतोड कामगार महामेळावा महाराष्ट्र 2023 या कार्यक्रम स्थळाकडे प्रयाण. स्थळ क्रिकेट मैदान, गोदावरी ढवळकेवाडी तांडा अहमदपूर रोड, गंगाखेड जिल्हा परभणी. दुपारी 3 वा. नांदेड विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 3.45 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन. दुपारी 4 वा. नांदेड विमानतळ येथून खाजगी विमानाने मुंबई विमानतळाकडे प्रयाण करतील.

00000 

 शेतीपूरक उद्योग व्यवसाय व सहकार चळवळीकडे सकारात्मक दृष्टीने पाहणे आवश्यक*

- महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
नांदेड (जिमाका) दि. 15 :- शेती व शेतकरी समृध्द होण्याचा मार्ग हा शेतीपूरक व्यवसायात दडलेला आहे. तो भक्कम होण्यासाठी सहकार चळवळीची राज्यात महत्वपूर्ण जोड देवून पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी शेती व शेतकऱ्यांना एक समृध्द मार्ग दिला. ज्या सहकाराच्या माध्यमातून राज्याच्या ग्रामीण भागाची पायाभरणी झाली त्या सहकार चळवळीचा सकारात्मक विस्तार राज्यात झाला नाही अशी, अशी खंत राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.
नियोजन भवन येथे पद्यश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि परिषद आयोजित शेतकरी सन्मान सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार राजेश पवार, आमदार बालाजी कल्याणकर, माजी केंद्रीय मंत्री सुर्यकांता पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, वसंतराव नाईक कृषि विद्यापिठ परभणीचे कुलगुरु डॉ. इंद्र मणी, पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे डॉ. अनिल भिकाने, संतुकराव हंबर्डे, कृषि परिषदेचे अध्यक्ष भागवत देवसरकर आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.
सहकार महर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी महाराष्ट्रात सहकारी चळवळीचा पाया घातला. सहकार चळवळीच्या माध्यमातूनच शेतकऱ्यांच्या जीवनात आमुलाग्र बदल घडणे शक्य झाले. मराठवाडा व विदर्भात मात्र सहकार चळवळी पूर्ण ताकदीने व यातील सत्वाने उभ्या राहील्या नाहीत असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. या भागात शेतकऱ्यांच्या विकासासाठी आजही सहकार चळवळीची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकरी स्वत: खूप मोठा संशोधक आहे. संशोधनाच्या माध्यमातून अनेक प्रगत शेतकरी शेतीत नवनवीन प्रयोग करुन भरघोस उत्पादन घेत आहेत. अशा प्रगतशिल शेतकऱ्यांना सोबत घेवून इतर शेतकऱ्यांना प्रगत शेती करण्यास कृषी विद्यापिठांनी प्रोत्साहीत केले पाहिजे. कृषी संशोधन केंद्रानी त्यांना सोबत घेवून संशोधन करण्यावर भर दिला तर वेगळे चित्र दिसेल. शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेती करण्यावर भर देवून रासायनिक खतांचा अति वापर टाळला पाहिजे. शेती व शेतकरी हे क्षेत्र प्रयोगशील असून ही प्रयोगशिलता शेतकऱ्यांचे आत्मबल वाढवेल, अशा विश्वास महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
शेतकऱ्याच्या मुलांनी अधिक तंत्रकुशल होण्याची गरज
- माजी केंद्रीय राज्यमंत्री सुर्यकांता पाटील
मराठवाड्या सारख्या भागातील पाण्याचे दुर्भिक्ष लक्षात घेवून केंद्रीय राज्यमंत्री असताना शेततळयासारखी अभिनव योजना भारतात प्रथम सुरु करण्याची संधी मला मिळाली. मराठवाड्यातील शेतकरी या योजनेतून अधिक संपन्न होईल असा विश्वास त्यावेळी होता. अन्य विभागातील व मराठवाड्यातील काही शेतकऱ्यांनी या योजनेचा पुरेपूर तंत्रशुध्द लाभ घेवून प्रगती साध्य केली. बहुसंख्य शेतकऱ्यांनी या योजनेच्या अनुदानाकडे पाहून पाहिजे तसा या योजनेचा लाभ घेतला नाही असे सांगायला त्यांनी कमी केले नाही. शेती ही आता कष्टाची आहे. शेतकऱ्यांच्या मुलांनी कष्टासमवेत तंत्रकुशलताही मिळविली पाहिजे, असेही माजी केंद्रीय राज्यमंत्री सुर्यकांता पाटील यांनी सांगितले. सुरक्षा, शिक्षा व आरोग्य ही शासनाची जबाबदारी असून या त्रिसूत्रीवर विकासाचा पाया भक्कम होणे अधिक गरजेचे आहे असल्याचे त्यांनी सांगितले.
मराठवाड्यातील बहुतांश भाग हा कोरडवाहू आहे. येणाऱ्या संकटातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी कृषी व पशुसंवर्धन यांचा सुयोग्य समन्वय कसा साधला जातो हे अधिक महत्वाचे आहे . यादृष्टीने वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापिठ व महाराष्ट्र पशु व मस्त्य विज्ञान विद्यापीठ मिळून संयुक्त प्रयत्नावर आम्ही भर देत असल्याचे कुलगुरु डॉ. इंद्र मणी यांनी सांगितले.
विदर्भासारखी मराठवाड्यातील काही भागात अतिवृष्टीने जमीन खरडून गेल्याने काही शेतकऱ्यांचे नुकसान झाले. अतिवृष्टीपाठोपाठ यलो मोझॅक मुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. लोहा व कंधार भागात नुकसान अधिक आहे. शासनाने या भागातील शेतकऱ्यांना अधिक मदत द्यावी, अशी विनंती आमदार राम पाटील रातोळीकर यांनी केली.
या कार्यक्रमात पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि परिषद यांच्यावतीने मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जिल्ह्यातील उल्लेखनिय योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांचा शाल, सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला. व्यंकट पाटील, दशरथ संभाजीराव कपाटे, दत्ता पाटील हडसणीकर, मिथेलेश हरीशचंद्र देसाई, माधव लक्ष्मणराव राऊत, अनंत कबिरदास कदम, डॉ. जे.एच.कदम, निलेश पुनमचंद सोमाणी, तुकाराम रामजी गवळी, त्रिभुवन चव्हाण कंजारकर, मंगेश केशवराव इंगोले, संदीप सुरेश हंबर्डे, रमेश नंदकुमार पंडीत, मंजूषा गुलाबराव पावडे, प्रमोद पंजाबराव देशमुख, वसंत रामजी घोरबांड, सागर निळकंठअप्पा रावले, प्रल्हाद पाटील हडसनीकर, दत्तराव किशनराव तावडे, सुदेश नारायणराव शिंदे, दिलीप बळीराम पवार, शंकर चव्हाण उंचाडेकर, विनायक जाधव, प्रा. महेश देशमुख, दिगंबर अर्जूनराव जाधव यांचा सन्मान करण्यात आला. तसेच विशेष सन्मान दत्ता पाटील हडसणीकर, आत्माराम पाटील वाटेगावकर, एकनाथ पाटील बोरगावकर, डॉ. अविनाश खंदारे पाटील-उमरखेड यांचा करण्यात आला. यासोबत पशुसंवर्धन विभागाचे डॉ. भुपेंद्र बोधनकर, किनवटचे उपविभागीय कृषि अधिकारी राजकुमार रणवीर, कंधार तालुक्यातील बाचोटी येथील पशुपालक विठ्ठल बालाजी पांडरणे, डॉ. साईनाथ पवार, डॉ. राजीव टरफेवाड, डॉ. अविनाश बुन्नावार, डॉ. सपना पेदुलवार, डॉ. मारोजी कानोळे यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन दत्ता जाधव यांनी मानले.
00000












 वृत्त

 

शेतरस्ते व पांदण रस्त्याचे प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यासाठी

तहसिलदारांनी आपल्या अधिकाराची काटेकोर अंमलबजावणी करावी

-         महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील   

                                                                                          

नांदेड, (जिमाका) दि. 15 :- कृषिक्षेत्राच्या विकासात लहान-मोठ्या रस्त्यांची सहज, सुलभ उपलब्धता ही अत्यंत आवश्यक असणारी बाब आहे. अनेक गावात एक-दोन शेतकऱ्यांच्या अडमुठेपणामुळे शेकडो शेतकऱ्यांना शेतासाठी मार्गच उरत नाही. शेतीच्या इतर प्रश्नासमवेत महसूल विभागाच्या दृष्टीने शेतरस्ते व पांदण रस्त्यांची जबाबदारी तेवढीच महत्त्वाची असून वेळप्रसंगी तहसीलदारांनी आपल्याला मिळालेल्या न्यायालयीन अधिकाराची अधिक काटेकोर अमंलबजावणी करावी, असे स्पष्ट निर्देश राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

 

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार राजेश पवार, आमदार बालाजी कल्याणकर, संतुकराव हंबर्डे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

 

जिल्ह्यातील आपत्तीच्या काळात महसूल विभागाने आपली जबाबदारी समर्थपणे पार पाडल्याबद्दल महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी समाधान व्यक्त केले. शासनाच्या योजना, सेवा, सुविधा या जनतेपर्यंत जलद पोहचण्यासमवेत त्याचा लाभ देण्यासाठी इतर विभागांशी परस्पर समन्वय हा अधिक महत्त्वाचा असतो. यासाठी राजस्व अभियान, ई-चावडी, मिशन 90 दिवस, सलोखा योजना याची प्रभावी अंमलबजावणी महत्त्वाची आहे. देशाप्रती आपली कटिबद्धता अधिक दृढ व्हावी यादृष्टीने मेरी माटी मेरा देश हे अभियान जिल्ह्यातील किमान 1 लाख मुलांपर्यंत पोहोचविण्याचे निर्देश त्यांनी विभाग प्रमुखांना दिले. तलाठी, तहसिलदार, कृषि अधिकारी, पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी, जिल्हा परिषदेचे अधिकारी यांनी समन्वय ठेवून मिशन मोडवर काम केले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

 

खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी शेतरस्ते, पांदणरस्तेबाबत गती मिळावी यादृष्टीने जलद नियोजन आवश्यक असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निदर्शनास आणुन दिले. याचबरोबर लालकंधारी ही बैलाची जात कंधारची ओळख आहे. या भागातूनच लालकंधारी सर्वत्र पोहोचले. गौळ येथे शासनाची यासाठी जागा असून हे केंद्र कंधार येथे होण्याबाबत आग्रही मागणी त्यांनी महसूल मंत्री तथा पशु व संवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली. आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार राजेश पवार, आमदार बालाजी कल्याणकर यांनी शेतरस्ते, पांदणरस्ते व शेतीच्या विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळावी यासाठी महसूल मंत्र्यांचे लक्ष वेधले.

00000

 

छायाचित्र : सदानंद वडजे, नांदेड





  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...