Sunday, October 15, 2023

 सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा 

 

नांदेड (जिमाका) दि. 15  :- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाची स्थापना भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नातून 15 ऑक्टोबर 1932 रोजी मुंबई येथे झाली. या घटनेला 15 ऑक्टोंबर 2023 रोजी 91 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानुषंगाने समाज कल्याण विभागाचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी अधिनस्त क्षेत्रीय स्तरावरील कार्यालयेशासकिय वसतिगृहे व शासकीय निवासी शाळा या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करुन समाज कल्याण विभागाचा वर्धापन दिन साजरा करणेबाबत निर्देश दिले आहे.  

 

त्याअनुषंगाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील सांस्कृतिक सभागृहात सहाय्यक आयुक्तसमाज कल्याण नांदेडजिल्हा समाज कल्याण अधिकारी-जिल्हा परिषद नांदेड व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणीनांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक न्याय विभागाच्या वर्धापन दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आज  संपन्न झाला.

 

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा अध्यक्षजिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सुनिल महिंद्रकर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून अ.ना.गोडबोलेसेवानिवृत्त वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक व डॉ.भिमराव हटकर-सामाजिक कार्यकर्तेएल.जी.कदम-सेवानिवृत्त समाज कल्याण अधिकारी व सेवानिवृत्त समाज कल्याण अधिकारी आर.व्ही.पुराणिक हे होते.   

 

यावेळी महामानवाचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन दीप प्रज्वलीत करण्यात आले. तसेच याप्रसंगी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांची जयंती साजरी करण्यात आली. तसेच या प्रसंगी सामजिक न्याय विभागातील सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांचे शालश्रीफळ व पुष्पगुच्छ देवून यथोचित सत्कार करण्यात आला.

 

प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी केले. प्रास्ताविकेत त्यांनी सामाजिक न्याय विभागाच्या स्थापनेचा संपूर्ण इतिहास सांगून उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी सामाजिक न्याय विभागामध्ये सेवा करण्याची संधी मिळाल्यामुळे ऋण व्यक्त करून वर्धापन दिनानिमित्त उपस्थित सर्व अधिकारी /कर्मचारी  व विद्यार्थी/विद्यार्थींनी यांना शुभेच्छा दिल्या. 

 

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे से.नि.वरिष्ठ समाज कल्याण निरिक्षक अ.ना.गोडबोले यांनी सामाजिक न्याय विभागाच्या वर्धापन दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले. तसेच सामाजिक कार्यकर्ते भिमराव हटकर यांनी सामाजिक न्याय विभागाचे स्थापनेबाबतची माहिती देवून मोलाचे मार्गदर्शन केले. जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार यांनी सामाजिक न्याय विभागाच्या वर्धापन दिनामित्त मनोगत व्यक्त केले. समाज कल्याण अधिकारी बी.एस. दासरी यांनी समाज कल्याण विभागाच्या स्थापनेपासून आजतागायत वाटचालीची माहिती दिली.

 

कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनिल महिंद्रकर-अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा अध्यक्षजिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीनांदेड यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात  सामाजिक न्याय विभागाचे महत्व सांगून मोलाचे मार्गदर्शन केले व उपस्थित सर्व अधिकारी कर्मचारी यांनी वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. 

 

 या कार्यक्रमास सामाजिक न्याय विभागातील सेवानिवृत्त अधिकारी एल.जी.कदमआर.व्ही.पुराणिक  व कर्मचारी सिद्धराम वनशेटेनारायण सदावर्तेसंजय खिरे हे उपस्थित होते तसेच सहाय्यक आयुक्तसमाज कल्याणनांदेड कार्यालयातील सर्व अधिकारी/ कर्मचारी उपस्थित होते. 

या कार्यक्रमाचे सुत्रसचंलन गजानन पंपटवारतालुका समन्वयक यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती  एल.एस. गायकेवरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक यांनी केले.

0000



No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड दौरा   नांदेड दि. 24 जानेवारी :- राज्याचे इतर मागास बहूजन कल्याण , दूग्धविकास , अपारंपारि...