Monday, October 10, 2016

वाहन नोंदणीसाठी आज
परिवहन कार्यालय सुरु राहणार
नांदेड, दि. 10 :- नविन वाहन नोंदणीसाठी दसरा निमित्त सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी मंगळवार 11 ऑक्टोंबर 2016 रोजी नवीन वाहन नोंदणी कामकाजासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड हे चालू राहणार आहे. संबंधितांनी याची नोंद घ्यावी , असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000
राष्ट्रीय लोकन्यायालयाचे 12 नोव्हेंबर रोजी आयोजन
नांदेड, दि. 10 :-  जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून बुधवार 12 नोव्हेंबर 2016 रोजी जिल्हा न्यायालय नांदेड व जिल्ह्यातील सर्व न्यायालयात राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये दिवाणी, फौजदारी, भूसंपादन, मोटार वाहन अपघात नुकसान भरपाईची प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे, कामगारांची प्रकरणे तसेच विविध बॅंकांची तसेच विविध मोबाईल कंपन्यांची दाखलपूर्व प्रकरणे आपसात तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. तसेच चेक अनादरित झाल्याबाबतचे खटले देखील मोठया प्रमाणात तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत.
 विधिज्ञ, जिल्हाधिकारी कार्यालय, मनपा, उर्ध्व पैनगंगा प्रकल्प, विमा कंपनी, विविध मोबाईल कंपनीचे अधिकारी, पक्षकार यांनी या लोकन्यायालयात जास्तीतजास्त प्रकरणे निकाली काढून पैसा, वेळ वाचवावा व राष्ट्रीय लोकन्यायालय यशस्वी करावे, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सविता बारणे यांनी केले आहे.
            मागील महालोकन्यायालयातमध्ये मिळालेले यश पाहता यावर्षी देखील बऱ्याच मोठया प्रमाणावर प्रकरणे निकाली निघतील असा विश्वास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. ए. आर. कुरेशी यांनी व्यक्त केला असून पक्षकारांनी आपली प्रलंबित प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी संबंधित न्यायालयात व दाखलपूर्व प्रकरणे जवळच्या तालुका विधी सेवा समितीकडे किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड या कार्यालयाकडे अर्ज देवून आपले प्रकरण लोकन्यायालयामध्ये ठेवण्याची विनंती करावी. यासाठी कुठलेही शुल्क आकारण्यात येत नाहीत. आपसातील वाद मिटविण्याची या लोकन्यायालयाच्या रूपाने सुवर्ण संधी चालून आली आहे. याचा फायदा सर्वांनी घ्यावा, असेही आवाहन न्या. कुरेशी यांनी केले आहे.

00000000 
जागतिक मानसिक स्वास्थ दिनानिमित्त शिबीर संपन्न
नांदेड, दि. 10 :-  जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड कार्यालयातर्फे राजस्थानी एज्युकेशन सोसायटी, नांदेड संचलित आर.आर. मालपाणी निवासी मतिमंद विद्यालय मगनपुरा नवामोंढा नांदेड येथे जागतिक मानसिक स्वास्थ्य दिनानिमित्त शिबीराचे आज आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या.  ए. आर. कुरेशी होते.  
यावेळी न्या. कुरेश यांनी मानसिक आणि शारिरीक विकलांग लोकांच्या संबंधित विविध कायद्याबाबत माहिती दिली. न्या. एन. एम. बिरादार यांनी मानसिक व शारिरीक विकलांग व्यक्तींचे अधिकार याबाबत विस्तृत माहिती दिली. तसेच आंबेडकरनगर नांदेड येथील प्रसिध्द शाहिर शेषेराव वाघमारे यांनी गीत गायनातून मतिमंद मुलांच्या समस्या विषद केल्या.  
यावेळी  अतिरिक्त सहदिवाणी न्यायाधीश न्या. जे. आर. पठाण, न्या. श्रीमती बी. ए. तळेकर, न्या. एन. एम. बिरादार अॅड. नईमखान पठाण, अॅड. एम. एल. गायकवाड यांची उपस्थित होते. प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक नितीन निर्मल यांनी केले. शाळेचे सचिव विजय मालपाणी यांनी आभार मानले.
000000
जिल्हा परिषद , पंचायत समिती निवडणुकीतील
 आरक्षीत जागांचा मसुदा जाहीर ; हरकती मागविल्या  
नांदेड, दि. 10 :- जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत आरक्षीत जागांबाबतचा मसुदा जिल्‍हाधिकारी कार्यालय, जिल्‍हा परिषद नांदेड, सर्व तहसिल कार्यालय,  सर्व पंचायत  समिती  कार्यालय या ठिकाणी प्रसिद्धी करण्यात आला असून त्याबाबत कोणाची हरकत किंवा सूचना असल्यास ती गुरुवार 20 ऑक्टोंबर 2016 पर्यंत सादर करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्‍ट्र जिल्‍हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961, (1962 चा अधिनियम 5) चे कलम 12 पोटकलम (1) अन्‍वये  नांदेड जिल्‍हा परिषद व पंचायत समितीच्‍या आगामी सार्वत्रिक निवडणूकीसाठी  जिल्‍हा परिषद क्षेत्रातील निवडणूक विभागाची व कलम 58 (1) (अ) अन्‍वये पंचायत समित्‍यामधील निर्वाचक गणांची रचना व एकुण सदस्‍य संख्‍या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातील स्त्रियांसह राखून ठेवण्‍यात आलेले  जिल्‍हा परिषद निवडणूक विभागाच्‍या प्रभागरचना व आरक्षणाचे परिशिष्‍ट 11 (अ) व पंचायत समिती निर्वाचक गणाची प्रभागरचना व आरक्षणाचे परिशिष्‍ट 12 (अ) ची प्रत दि. 10 ऑक्टोंबर 2016 रोजी जिल्‍हाधिकारी कार्यालय, जिल्‍हा परिषद नांदेड, सर्व तहसिल कार्यालय,  सर्व पंचायत  समिती  कार्यालयातील  नोटीस बोर्डावर प्रसिध्‍द करण्‍यात आलेली आहे.   
या आदेशाच्‍या मसुदयास कुणाची हरकत  किंवा सूचना असल्‍यास त्‍यासंबंधीची जी सकारण लेखी निवेदने उपजिल्‍हाधिकारी (सामान्‍य) दुसरा मजला जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड यांचेकडे गुरुवार 20 ऑक्टोंबर 2016 पर्यंत सादर करावीत. तारखेनंतर जिल्‍हाधिकारी यांच्‍याकडे आलेले निवेदन,  हरकती, सूचना इत्‍यादी विचारात घेतले जाणार नाहीत, असेही कळविण्यात आले आहे.

00000
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता
धनंजय मुंडे यांचा नांदेड दौरा
   नांदेड, दि. 10 :- राज्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे हे  नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
सोमवार 10 ऑक्टोंबर 2016 रोजी परळी वै. येथून शासकीय मोटारीने शासकीय विश्रामगृह नांदेड येथे रात्री 11.55 वा. आगमन , राखीव व मुक्काम.
मंगळवार 11 ऑक्टोंबर 2016 रोजी सकाळी 4 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून माहूरकडे प्रयाण. सकाळी 6.30 वा. शासकीय विश्रामगृह माहूर येथे आगमन व राखीव (रेणुका मातेचे दर्शन). सकाळी 8 वा. नांदेड येथून शासकीय मोटारीने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी 10 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. सकाळी 11 वा. नांदेड येथून शासकीय मोटारीने परळीकडे प्रयाण करतील.

0000000
जिल्हा उद्योग केंद्राच्या
विविध सभांचे शुक्रवारी आयोजन
नांदेड दि. 10 :-  जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयाच्या जिल्हा उद्योग मित्र समिती सभा, जिल्हा सल्लागार समिती सभा, स्थानिक लोकांना रोजगारात प्राधान्य जिल्हास्तरीय समिती सभा व आजारी उद्योग पुनरुज्जीवन जिल्हास्तरीय समितीची सभा शुक्रवार 14 ऑक्टोंबर 2016 रोजी दुपारी 4 वा. नांदेड जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे आयोजित करण्यात आली आहे. संबंधितांनी या सभांना उपस्थित रहावे, असे आवाहन नांदेड जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी केले आहे.  

0000000
राज्य ग्राहक आयोगाकडील
गैरन्यायिक सदस्य पदासाठी अर्ज मागविले
   नांदेड, दि. 10 :- राज्य ग्राहक वाद निवारण आयोग महाराष्ट्र यांच्याकडील गैरन्यायिक सदस्यांची पदे भरण्यात येणार आहेत. ही पदे भरण्याकरीता प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी अर्हता प्राप्त उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आल्याची माहिती जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांच्यावतीने देण्यात आली आहे.
या गैरन्यायिक सदस्य पदाकरीता ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 तसेच सुधारीत महाराष्ट्र ग्राहक संरक्षण नियम 2000 च्या संबंधीत तरतुदी लागू आहेत. उमेदवारांची अर्हता, पात्रतेचे निकष यासंबंधीची माहिती व विहित नमुन्यातील अर्ज नांदेड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांच्याकडे आवश्यक शुल्क 100 रुपये भरल्यास उपलब्ध होवू शकतील.
तसेच संपूर्ण तपशिलासह भरलेले अर्ज प्रबंधक राज्य ग्राहक वाद निवारण आयोग महाराष्ट् राज्य मुंबई यांचे कार्यालयात 4 नोव्हेंबर 2016 पर्यंत पोहचणे आवश्यक आहे. याची सर्व संबंधितानी नोंद घ्यावी. अधिक माहिती व तपशीलसाठी इच्छुकांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, नांदेड रुक्मिणी कॉम्पलेक्स, व्हीआयपी रोड नांदेड येथे संपर्क साधावा.  

000000
जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू
नांदेड, दि. 10  :- जिल्ह्यात बुधवार 19 ऑक्टोंबर 2016  रोजी मध्यरात्रीपर्यत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
आगामी काळातील सण, उत्सव आणि इतर सार्वजनिक कार्यक्रम, विविध प्रकारची संभाव्य आंदोलनांची शक्यता यांच्‍या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था कायम रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात गुरुवार 6 ऑक्टोंबर ते बुधवार 19 ऑक्टोंबर 2016 रोजीच्‍या मध्यरात्रीपर्यत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमूद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...