Friday, February 11, 2022

 सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 11 :- आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना सन 2021-22 केंद्र पुरस्कृत योजना असंघटीत व अनोंदणीकृत अन्न प्रक्रिया उद्योगासाठी राबविण्यात येत आहे. ही योजना मोहिम स्वरुपात राबविण्यात येत आहे. इच्छुकांनी दर बुधवारी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत आवश्यक कागदपत्रासह प्रकल्प संचालक आत्मा कार्यालयसंतोष बीज भांडारच्यावरनवीन मोंढा नांदेड व तालुका कृषि कार्यालयात उपस्थित राहून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांनी केले आहे.

 

लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्डपॅन कार्डवीज बिलबँक पासबुकआठवी पास पुरावायंत्र सामग्रीचे कोटेशनजुना उदयोग असल्यास 2 वर्षापुर्वी स्थापन झालेला असावा व त्याचा पुरावा असावा.  इतर परवाने असल्यास आणावे. एक जिल्हा एक उत्पादन या धर्तीवर राबविली जात आहे. नांदेड जिल्ह्यासाठी हळद व इतर मसाले पदार्थ हे उत्पादन मंजुर आहे. 

 

या योजने अंतर्गत वैयक्तिक अन्न प्रक्रिया उद्योगासाठी सामाईक पायाभुत सुविधा केंद्रासाठी 35 टक्के अनुदानब्रँडींग व मार्केटींगसाठी एकूण खर्चाच्या 50 टक्के अनुदान स्वयंसहाय्यता गटांना बीज भांडवल लहान उपकरणे खरेदीसाठी 40 हजार प्रती सभासद 4 लाखपर्यंत अनुदान देय राहील. या योजनेअंतर्गत शेतकरी उत्पादक संघशेतकरी उत्पादक कंपनीसंस्थास्वयंसहाय्यता गट आणि सहकारी उत्पादकशासन यंत्रणा किंवा खाजगी उद्योग इत्यादी घटकांना लाभ देण्यासाठी सामायिक पायाभूत सुविधा या घटकांतर्गत नवीन प्रकल्पाचे प्रस्ताव ओडीओपी उत्पादनावर हळद व इतर मसाले पदार्थ देता येतील. सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या प्रक्रीया प्रकल्पांच्या विस्तारीकरणासाठी जसे गुळ उद्योगदाळ मिल इत्यादी एक जिल्हा एक उत्पादनाच्या व्यतीरीक्त इतर प्रस्ताव देखील या योजनेमध्ये सादर करता येतील असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांनी कळविले आहे.

0000 

 नांदेड जिल्ह्यात 54 व्यक्ती कोरोना बाधित

तर 177 कोरोना बाधित झाले बरे

 

नांदेड (जिमाका) दि. 11 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या हजार 322 अहवालापैकी 54 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 42 तर अँटिजेन तपासणीद्वारे 12 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या लाख 2 हजार 484 एवढी झाली असून यातील 99 हजार 553 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 244 रुग्ण उपचार घेत असून यात 4 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे.

 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे लोहा तालुक्यातील रिसनगाव येथील 60 वर्षाच्या एका पुरुषाचा 10 फेब्रुवारी रोजी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या हजार 687 एवढी आहे.

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 11, कंधार 2, मुदखेड 2, अमरावती 1, उत्तरप्रदेश 1, नांदेड ग्रामीण 1, किनवट 4, नायगाव 4, औरंगाबाद 2, देगलूर 5, लोहा 2, परभणी 1, बिदर 2, धर्माबाद 1, मुदखेड 1, पंजाब 1, आदिलाबाद 1  तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा 9, किनवट 2, नायगाव 1 असे एकुण 54 कोरोना बाधित आढळले आहे.

 

आज जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 2, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 28,  नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 142खाजगी रुग्णालय 5 असे एकुण 177 कोरोना बाधितांना औषध उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली.

 

उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 20देगलूर कोविड रुग्णालय 2नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 86नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 117खाजगी रुग्णालय 19असे एकुण 244 व्यक्ती उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- लाख 60 हजार 491

एकुण निगेटिव्ह स्वॅब- लाख 41 हजार 310

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- लाख 2 हजार 484

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 99 हजार 553

एकुण मृत्यू संख्या-हजार 687

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.14 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-00

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-24

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-244

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-4.

 

कोरोना विषाणुची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुन: येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधीनंतर दुसऱ्या लसीचा डोस अवश्य घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

000000

 बारावी प्रात्यक्षिक परीक्षेसंदर्भात विशेष मार्गदर्शक सूचना

नांदेड (जिमाका) दि. 11 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता बारावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी, प्रकल्प व तत्सम परीक्षा प्रचलित पद्धतीप्रमाणे घेण्यात येणार आहे. या परीक्षा 14 फेब्रुवारी ते 3 मार्च 2022 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. प्रयोग वही (जर्नल) वरील कालावधीत सादर करावी लागणार आहे. या परीक्षेच्या अनुषंगाने कोविड-19 विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विशेष मार्गदर्शक सूचना शिक्षण मंडळाने निर्गमीत केल्या आहेत.  

 

परीक्षा कालावधीत विद्यार्थी कोरोनाबाधित झाल्यामुळे अथवा अन्य वैद्यकीय अपरिहार्य कारणामुळे प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा, प्रकल्प व तत्सम परीक्षा देवू न शकल्यास अशा विद्यार्थ्यांची परीक्षा लेखी परीक्षेनंतर 31 मार्च 2022 ते 18 एप्रिल 2022 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. आउट ऑफ टर्नचा कालावधी याच कालावधीत समाविष्ट असेल. त्यामुळे आउट ऑफ टर्नसाठी स्वतंत्र कालावधी देण्यात येणार नाही.

 

विज्ञान, कला, वाणिज्य व व्यावसायिक शाखातील विषयांची श्रेणी, तोंडी व इतर अंतर्गत मूल्यमापन परीक्षा घेण्याची जबाबदारी  संबंधित उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात आली आहे. त्यामुळे श्रेणी, तोंडी व इतर अंतर्गत मूल्यमापन परीक्षा प्रचलित मूल्यमापन आराखड्यानुसार तसेच कोविड-19 विषाणूच्या प्रादुर्भावाची परिस्थिती विचारात घेऊन निर्धारीत कालावधीत पार पाडावी.


कोविड-19 विषाणुची पार्श्वभूमी विचारात घेता बहुतांश उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालये विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीसह सुरू ठेवण्यास कमी कालावधी मिळाल्याने निर्धारीत प्रात्यक्षिके पूर्ण करणे शक्य झाले नाही. ही बाब विचारात घेऊन इयत्ता बारावी परीक्षेंतर्गत अंतर्गत मूल्यमापन असलेल्या सर्व विषयांच्या परीक्षेबाबत पुढीलप्रमाणे नियोजन करण्यात आले आहे.

 

कोविड-19 विषाणुची पार्श्वभूमी विचारात घेऊन विषयनिहाय प्रात्यक्षिकांची संख्या किमान 40 टक्के करण्यात आलेली आहे. या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी अंतर्गत व बहिस्थ परिक्षक संबंधित उच्च माध्यमिक विद्यालय / कनिष्ठ महाविद्यालयातून घेण्यात यावी. ज्या कनिष्ठ महाविद्यालयात एका विषयासाठी एकापेक्षा अधिक विषय शिक्षक उपलब्ध नाहीत तेथे त्याच उपलब्ध विषय शिक्षकाने अंतर्गत व बहिर्स्थ परिक्षकाचे काम करावे. कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व संबंधितांनी कोविड-19 विषाणू प्रादुर्भावाच्या अनुषंगाने शासनाच्या व आरोग्य विभागाच्या सर्व सूचनांचे पालन करणे बंधनकारक आहे.

 

या कलावधीत उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयात पिण्याच्या पाण्याची व सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात यावी. याशिवाय अधिक सुरक्षिततेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालयात येताना स्वत:ची पाण्याची बाटली व सॅनिटायझर सोबत ठेवावे. तसेच मास्क व लेखन साहित्य उदा पेन, पेन्सिल कंपास इत्यादी सुद्धा स्वत:सोबत आणावे.

 

प्रात्यक्षिक परीक्षा आयोजित करताना कोविड-19 च्या प्रादुर्भावासंदर्भातील सूचनांचे पालन करण्याच्यादृष्टिने उपलब्ध जागेचा विचार करून विद्यार्थ्यांच्या बॅचेस तयार कराव्यात. विद्यार्थ्यांना व अन्य घटकांना कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश देतांना त्यांचे तापमान मोजण्यात यावे. तसेच महाविद्यालयातील संपूर्ण कालावधीत विद्यार्थी व सर्व संबंधितांनी मास्क वापरणे अनिवार्य राहील. कनिष्ठ महाविद्यालयामध्ये कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही व शारीरिक अंतर राखले जाईल याची दक्षता घ्यावी. आरोग्य विषयक सर्व सूचनांचे पालन करावे. प्रात्यक्षिक परीक्षेच्यावेळी परीक्षा दालनात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिने योग्य ती काळजी घ्यावी, असे निर्देश महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिले आहेत.

000000 

भोकरच्या सिंचन प्रश्नाला दिलासा देणाऱ्या

दिवशी प्रकल्पाचे कार्यादेश निर्गमीत   

 

·         600 हेक्टर सिंचन क्षमता असणारा मराठवाड्यातील पहिला सिंचन तलाव

 - मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख

·         दिवशी परिसरातील शेतकऱ्यांची मागणी पूर्ण केल्याचा अधिक आनंद

-         पालकमंत्री अशोक चव्हाण 

 नांदेड (जिमाका), दि. 11 :- नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यात बहुतांश भाग कोरडवाहू असून सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून वेळोवेळी केली जात होती. दिवशी परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या दिवशी सिंचन तलावाच्या कामाबाबत जलसंधारण विभागाने कार्यादेश निर्गमीत केले असून हे काम दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. 

सिंचनाच्या सुविधाबाबत पालकमंत्री या नात्याने नांदेड जिल्ह्याच्यादृष्टिने एक व्यापक दूरदृष्टी आपण ठेवली आहे. जिल्ह्यातील विविध प्रकल्पासमवेत ज्या भागामध्ये कमी अधिक क्षमतेनुसार जेवढे प्रकल्प, सिंचन तलाव करता येतील तेवढे करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. भोकर मधील दिवशी भागातील सुमारे 600 हेक्टर क्षेत्राला हा सिंचन तलाव सिंचनाच्या सुविधा नव्याने उपलब्ध करून देत असल्याने मला अधिक आनंद असल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.

 

दिवशी (बु.) सिंचन तलावासाठी 37 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. हा सिंचन तलाव मराठवाड्यातील 251 ते 600 हेक्टर सिंचन क्षमता असणारा पहिला प्रकल्प आहे. दिवशी (बु.) सिंचन तलावाची प्रशासकीय मान्यतासह इतर सर्व मान्यतेची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.  या तलावाचे काम तात्काळ सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

जलसंधारण विभागांतर्गत प्रथमच अशा प्रकारच्या प्रकल्पांना मंजुरी देऊन जिथे-जिथे नैसर्गिक संसाधन उपलब्ध आहेत त्याठिकाणी लहान-मोठे सिंचन तलाव निर्माण करून त्यातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरीता   श्री. गडाख यांनी हा धाडसाचा निर्णय घेतला आहे. या सिंचन तलावासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या पाठपुराव्याने प्रकल्पाच्या मंजुरी देणे सुलभ झाले असल्याचे श्री. गडाख यांनी सांगितले.

000000


 महिला व बाल विकास विभागाच्या योजनांसाठी

15 फेब्रुवारीपर्यत अर्ज करण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 11 :- ग्रामीण महिला व मुलींसाठी जिल्हा परिषदेच्या महिला बाल विकास विभागामार्फत वैयक्तीक लाभाच्या योजना राबविण्यात येतात. इच्छूक व पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज 15 फेब्रुवारी 2022 पर्यत कार्यालयास सादर करावेतअसे आवाहन नांदेड जिल्हा परिषदेचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांनी केले आहे.

 

या वैयक्तीक लाभाच्या योजनेत 90 टक्के अनुदानावर ग्रामीण महिला व मुलींना शिलाई मशिन पुरविणेइयत्ता 7 वी ते 12 वी पर्यत पास मुलींना एमएससीआयटी प्रशिक्षणकॉम्प्युटर टायपिंग प्रशिक्षण देणेग्रामीण महिला व मुलींना शिलाई मशिन चालविण्याचे प्रशिक्षण देणेग्रामीण महिला व मुलींना ब्युटी पार्लर प्रशिक्षण देणेग्रामीण महिला व मुलींना फॅशनन डिझायनिंगचे प्रशिक्षण देणे या योजनांचा समावेश असणार आहे. या सर्व वैयक्तीक लाभाच्या योजनांसाठी अटी व शर्तीनुसार  विहित नमुन्यात अर्ज सादर करणे आवश्यक राहील.

 

ग्रामीण महिला व मुलींना शिलाई मशिन

अटी व शर्ती :- विहित नमुन्यातील अर्ज 15 फेब्रुवारीपर्यत सादर करणे आवश्यक आहे. नांदेड जिल्ह्यातील रहिवासी असावे. मागासवर्गीय असल्यास सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र असावे. सदरील महिला ही दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील किंवा त्यांचे सन 2020-21 चे वार्षिक उत्पन्न 1 लाख 20 हजार च्या आत असावे. लाभधारकाकडे शिलाई मशीनचे प्रशिक्षणचे पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे. शिलाई मशिन विक्रीहस्तांतर न करण्याचे हमी पत्र असावे. लाभधारकास 10 टक्के लाभार्थी हिस्सा भरणा करावा लागेलआधारकार्ड सत्यप्रतबँक पासबुकची ठळक छायाचित्र प्रतवस्तू खरेदीचे जीएसटीसह पावती असावी. 

 

इयत्ता 7 वी ते 12 वी पर्यत पास मुलींना एमएससीआयटी प्रशिक्षण

अटी व शर्ती :- एमकेसीएल मान्यता प्राप्त संस्थेमार्फत‍ एमएससीआयटीकॉम्प्यूटर टायपिंग प्रशिक्षणाचे प्रस्ताव 15 फेब्रुवारीपर्यत सादर करावेतकमीत कमी 7 वी पास असलेल्या ग्रामीण भागातील मुली व महिलेस प्रशिक्षण देता येईलप्रशिक्षणार्थीचे रहिवासी प्रमाणपत्र ग्रामसेवक यांचे असावेप्रशिक्षणार्थींच्या पालकांचे सन 2020-21 चे वार्षिक उत्पन्न 1 लाख 20 हजार च्या आत असावे किंवा दारिद्र रेषेखालील यादीत नाव असावे प्रती प्रशिक्षणार्थी शासनाने विहित केलेली संपूर्ण फिस अनुदान देण्यात येइल. मागासवर्गीय लाभार्थ्यांनी त्यांना सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले जातीच्या प्रमाणपपत्राची सत्यप्रत जोडावी. एमएससीआयटी कॉम्प्युटर टायपिंग प्रशिक्षण चालू आर्थिक वर्षात म्हणजेच सन 2021-22 या वर्षात अभ्यासक्रम पूर्ण करणारे असावेतयापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा या प्रमाणे आहेत.

 

ग्रामीण महिला व मुलींना शिलाई मशिन चालविण्याचे प्रशिक्षण

अटी व शर्ती :- मान्यता प्राप्त संस्थेमार्फत शिलाई मशीन चालविण्यांचे प्रशिक्षणांचा प्रस्ताव 15 फेब्रुवारी पर्यत सादर करावाकमीत कमी 7 वी पास असलेल्या ग्रामीण भागातील मुली व महिलेस प्रशिक्षण देण्यात येईलप्रशिक्षणार्थीचे रहिवासी प्रमाणपत्र ग्रामसेवक यांचे असावेप्रशिक्षणार्थींच्या पालकांचे सन 2020-21 चे वार्षिक उत्पन्न 1 लाख 20 हजार च्या आत असावे किंवा दारिद्र रेषेखालील यादीत नाव असावे प्रती प्रशिक्षणार्थी विहित केलेली 90 टक्के फिस अनुदान देण्यात येईलमागासवर्गीय लाभार्थ्यांनी त्यांना सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले जातीच्या प्रमाणपत्राची सत्यप्रत जोडावीयापूर्वी योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

 

ग्रामीण महिला व मुलींना ब्युटी पार्लर प्रशिक्षण

अटी व शर्ती :- मान्यताप्राप्त संस्थेमार्फत ब्युटी पार्लर प्रशिक्षणाचा प्रस्ताव 15 फेब्रुवारी पर्यंत सादर करावा. कमीत कमी 7 वी पास असलेल्या ग्रामीण भागातील मुली व महिलेस प्रशिक्षण देता येईल. प्रशिक्षणार्थीचे रहिवासी प्रमाणपत्र ग्रामसेवक यांचे असावेप्रशिक्षणार्थींच्या पालकांचे सन 2020-21 चे वार्षिक उत्पन्न 1 लाख 20 हजार च्या आत असावे किंवा दारिद्र रेषेखालील यादीत नाव असावेप्रती प्रशिक्षणार्थी विहित केलेली 90 टक्के फिस अनुदान देण्यात येईलमागासवर्गीय लाभार्थ्यांनी त्यांना सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले जातीच्या प्रमाणपत्राची सत्यप्रत जोडावीयापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

 

ग्रामीण महिला व मुलींना फॅशन डिझायनिंगचे प्रशिक्षण

अटी व शर्ती :- मान्यता प्राप्त संस्थेमार्फत फॅशन डिझायनिंगचे प्रशिक्षणाचा प्रस्ताव 15 फेब्रुवारी पर्यंत सादर करावा. कमीत कमी 7 वी पास असलेल्या ग्रामीण भागातील मुली व महिलेस प्रशिक्षण देण्यात येईलप्रशिक्षणार्थींच्या पालकांचे सन 2020-21 चे वार्षिक उत्पन्न 1 लाख 20 हजार च्या आत असावे किंवा दारिद्र रेषेखालील यादीत नाव असावेप्रशिक्षणार्थींचे रहिवासी प्रमाणपत्र ग्रामसेवक यांचे असावे. प्रती प्रशिक्षणार्थीं विहित केलेली 90 टक्के फिस अनुदान देण्यात येईल. मागासवर्गीय लाभार्थ्यांनी त्यांना सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले जातीच्या प्रमाणपत्राची सत्यप्रत जोडावीयापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा, असे नांदेड जिल्हा परिषदेचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांनी कळविले आहे.

00000 

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...