Friday, February 11, 2022

 सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 11 :- आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना सन 2021-22 केंद्र पुरस्कृत योजना असंघटीत व अनोंदणीकृत अन्न प्रक्रिया उद्योगासाठी राबविण्यात येत आहे. ही योजना मोहिम स्वरुपात राबविण्यात येत आहे. इच्छुकांनी दर बुधवारी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत आवश्यक कागदपत्रासह प्रकल्प संचालक आत्मा कार्यालयसंतोष बीज भांडारच्यावरनवीन मोंढा नांदेड व तालुका कृषि कार्यालयात उपस्थित राहून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांनी केले आहे.

 

लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्डपॅन कार्डवीज बिलबँक पासबुकआठवी पास पुरावायंत्र सामग्रीचे कोटेशनजुना उदयोग असल्यास 2 वर्षापुर्वी स्थापन झालेला असावा व त्याचा पुरावा असावा.  इतर परवाने असल्यास आणावे. एक जिल्हा एक उत्पादन या धर्तीवर राबविली जात आहे. नांदेड जिल्ह्यासाठी हळद व इतर मसाले पदार्थ हे उत्पादन मंजुर आहे. 

 

या योजने अंतर्गत वैयक्तिक अन्न प्रक्रिया उद्योगासाठी सामाईक पायाभुत सुविधा केंद्रासाठी 35 टक्के अनुदानब्रँडींग व मार्केटींगसाठी एकूण खर्चाच्या 50 टक्के अनुदान स्वयंसहाय्यता गटांना बीज भांडवल लहान उपकरणे खरेदीसाठी 40 हजार प्रती सभासद 4 लाखपर्यंत अनुदान देय राहील. या योजनेअंतर्गत शेतकरी उत्पादक संघशेतकरी उत्पादक कंपनीसंस्थास्वयंसहाय्यता गट आणि सहकारी उत्पादकशासन यंत्रणा किंवा खाजगी उद्योग इत्यादी घटकांना लाभ देण्यासाठी सामायिक पायाभूत सुविधा या घटकांतर्गत नवीन प्रकल्पाचे प्रस्ताव ओडीओपी उत्पादनावर हळद व इतर मसाले पदार्थ देता येतील. सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या प्रक्रीया प्रकल्पांच्या विस्तारीकरणासाठी जसे गुळ उद्योगदाळ मिल इत्यादी एक जिल्हा एक उत्पादनाच्या व्यतीरीक्त इतर प्रस्ताव देखील या योजनेमध्ये सादर करता येतील असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांनी कळविले आहे.

0000 

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...