Saturday, March 7, 2020

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या नातेवाईकास एक लाखांची मदत
पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी दिला धनादेश

नांदेड दि. 7 - अर्धापूर तालुक्यातील सावरगाव येथील शेतकरी ज्ञानेश्वर नारायण आबादार यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली. या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीस 1 लाख रुपयांची आर्थिक मदत पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आली.
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीस अंगणवाडी सेविका म्हणून शासकीय सेवेत घेण्यासंदर्भात योग्य ती कारवाई करण्यात यावी. त्यासोबतच आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या नावावर असलेले बँकेचे कर्ज सरकारच्या कर्जमाफी योजनेत बसवून कुटुंबियांच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा कमी  करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी माजी राज्यमंत्री डी.पी.सावंत, मदार अमरनाथ राजूरकर, माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, कारखान्याचे चेअरमन गणपतराव तिडके, व्हाईस चेअरमन प्रा.कैलास दाड, तालुकाध्यक्ष बालाजी गव्हाणे, शहराध्यक्ष राजू शेट्टे आदींची उपस्थिती होती.

000000

पालकमंत्री अशोक चव्हाण यांचा दौरा
नांदेड दि. 8 :- राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण हे नांदेड दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
रविवार 8 मार्च 2020 रोजी  सकाळी 9 वा. महिला दिनानिमित्त कार्यक्रमास उपस्थिती स्थळ- वजिराबाद पोलीस स्टेशन नांदेड. सकाळी 10 वा. जागतिक महिला दिन, महिला आरोग्य शिबीर कार्यक्रमास उद्घाटनासाठी उपस्थिती. स्थळ- शिवाजीनगर दवाखाना नांदेड. सकाळी 11 वा.ब्रिलिंयन्ट कॉमर्स अकॅडमी यांच्यातर्फे आयोजित सत्कार कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- प्रगती महिला मंडळ वसंतनगर नांदेड. दुपारी 1 वा. जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित महिला मेळावा या कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- डीपीसी सभागृह नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड. दुपारी 3 वा. जागतिक महिला दिनानिमित्त यशोदामाता पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- भक्ती लॉन्स मालेगाव रोड नांदेड. सायं 5.30 वा. हॉटेल नैवेद्यम प्युअर व्हेज फॅमिली रेस्टारंटच्या उद्घाटनास उपस्थिती. स्थळ नरहरनगर रिंग रोड आशीर्वाद मंगल कार्यालया जवळ छत्रपती चौक नांदेड. सायंकाळी 6 वा. कामाजी पवार यांच्याकडील विवाह सोहळ्यास उपस्थिती. स्थळ- आशीर्वाद गार्डन काबरानगर नांदेड.
00000



प्रधानमंत्री पिक विमा योजना ;
कमी मदत मिळालेल्या मंडळांना
अधीक मदत मिळवून दयावी
-         पालकमंत्री अशोक चव्हाण
नांदेड दि. 7 :-  प्रधानमंत्री पिक विमा योजनेत कमी मदत मिळालेल्या मंडळांना अधीक मदत मिळवून दयावी, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात प्रधानमंत्री पिक विमा योजनेसंबंधी आढावा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आज घेतला. त्यावेळी ते बोलत होते.  
जिल्ह्यात प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप 2019 मध्ये सोयाबीन या पिकामध्ये मंडळ निहाय कमी अधिक मदत मिळाली आहे. काही मंडळात प्रत्येकी हेक्टरी मदत कमी मिळाल्याचे दिसून आले आहे. भोकर तालुक्यात भोकर, मोघाळी, किनी, मातूळ या चार महसूल मंडळापैकी मोघाळी व किनी महसूल मंडळात कमी रक्कम मिळाल्याचे दिसून आले. जिल्ह्यातील इतर तालुक्यामध्ये या प्रकारची तफावत दिसून आली. कमी मदत मिळालेल्या मंडळांना अधिक मदत मिळून देण्याबाबत भारतीय कृषि विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी गौतम कदम यांना यावेळी सुचना दिल्या.
पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी विमा कंपनीच्या राज्यस्तरीय अधिकाऱ्यांना ही बाब निदर्शनास आणून तफावत दूर करावी. वाढीव निधी मिळण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांनी कृषी सचिव यांना पाठवावा. यासंदर्भात पुढील आठवड्यात मुंबई येथे कृषि मंत्री, कृषि सचिव, कृषि आयुक्त व विमा कंपनीचे राज्यस्तरीय अधिकारी यांची बैठक घेण्यात येईल, असे सांगितले.
पीक विमा नुकसान भरपाई पोटी शेतकऱ्यांना मिळालेल्या रक्कमेतून बँकांनी कर्जाच्या रक्कमेची कपात करुन नये असे पत्र सर्व बँकांना देण्याबाबत जिल्हा उपनिबंधक प्रविण फडणीस यांना यावेळी सुचना दिल्या.
आमदार अमर राजूरकर, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे, जिल्हा उपनिबंधक प्रविण फडणीस, भोकरचे तालुका कृषि अधिकारी विठ्ठल गिते, विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी गौतम कदम आदींची यावेळी उपस्थित होते.
0000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...