Wednesday, June 25, 2025

 वृत्त क्र. 662   

आरोग्य विद्यापीठातर्फे नांदेड येथे

कुलगुरू कट्टयाचे शुक्रवारी आयोजन

 

नांदेडदि. 25 जून :- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे शुक्रवार 27 जून 2025 रोजी सकाळी 11 वा. शासकीय आयुर्वेद महाविद्यालय वजिराबाद नांदेड येथे "कुलगुरु कट्टाकार्यक्रमाचे आयोजन नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विद्यापिठाचे कुलगुरु यांच्या  संकल्पनेतून करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी समजून त्यावर योग्य उपाययोजना करण्याच्या दृष्टीकोनातून सुरु करण्यात आलेला "कुलगुरु कट्टाकार्यक्रमात कुलगुरु विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार आहेत.

 

यापूर्वी विद्यापीठातर्फे नाशिकछत्रपती संभाजीनगरपुणेसोलापूरलातूरमुंबईनागपूरअहिल्यानगरकोल्हापूर आदी ठिकाणी "कुलगुरु कट्टाकार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याचे शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. वाय. आर. पाटील यांनी सांगितले.

 

नांदेड येथे आयोजित कार्यक्रमास कुलगुरु यांच्या समवेत विद्यापीठाचे प्रति-कुलगुरू डॉ. मिलिंद निकुंभकुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळपरीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडूविद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. देवेंद्र पाटीलमहाविद्यालयाचे अधिष्ठाताप्राचार्य आदी अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

 

नांदेड जिल्हयातील वजिराबाद येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाच्या सभागृहात 27 जून रोजी सकाळी 11 वा. "कुलगुरु कट्टाकार्यक्रम घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमाकरीता विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थीशिक्षक मोठया संख्येने उपस्थित राहणार आहेत.

00000

 वृत्त 

नांदेड शहर,परिसराचा २५ वर्षांचे नियोजन लक्षात घेऊन मास्टर प्लॅन तयार करा

एमएमआरडीएने यंत्रणांचीबैठक घेऊन मार्गदर्शन करावे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई, दि. २५: नांदेड शहर व परिसराचा पुढील २५ वर्षांचे नियोजन लक्षात घेऊन मास्टर प्लॅन तयार करण्यासाठी एमएमआरडीएने नांदेड जिल्हाधिकारी, महपालिका आयुक्त आणि संबंधित यंत्रणांची तातडीने बैठक घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. या शहराचा सुनियोजीत विकासासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचा सल्लागार नेमण्याबाबत देखील उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सूचना केली.

सह्याद्री अतिथीगृह येथे नांदेड शहर विकास आराखड्यासंदर्भात बैठक झाली. त्यावेळी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी खासदार सर्वश्री अशोक चव्हाण, अजित गोपछेडे, रविंद्र चव्हाण, आमदार सर्वश्री हेमंत पाटील, बालाजी कल्याणकर, आनंद बोंडारकर, नगरविकास विबागाचे प्रधान सचिव गोविंदराज, एमएमआरडीएचे अतिरीक्त आयुक्त विक्रमकुमार आदी यावेळी उपस्थित होते. नांदेड जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त दुरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

नांदेड शहराला धार्मिक आणि ऐतिहासिक महत्व असून पवित्र नगरी म्हणून या शहराचा सुनियोजित विकास होणे गरजेचे आहे. याठिकाणी देश आणि जगभरातून लाखो भाविका येतात. त्यामुळे चांगले रस्ते, सांडपाण्याची व्यवस्था, बगिचे शहरात व्हावे याकरीता पुढील २५ वर्षांचे नियोजन डोळ्यासमोर ठेऊन शहराचा विकास आराखडा करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. एमएमआरडीने त्यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि संबंधितांची एक बैठक घेऊन शहराचा सुनियोजीत विकास कसा करता येईल याबाबत चर्चा करावी. आवश्यकता भासल्यास शहराच्या विकास आराखडा कसा असावा, पवित्र नगरी म्हणून पर्यटनाच्या दृष्टीने कसा विकास करता येईल यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचा सल्लागार नेमण्यात यावा, असेही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी खासदार श्री. चव्हाण, श्री. गोपछेडे, श्री. चव्हाण, आमदार श्री. पाटील, श्री. कल्याणकर, श्री. बोंडारकर यांनी नांदेड शहर व परिसर विकासाच्या दृष्टीने मनोगत व्यक्त केले.

००००

 वृत्त क्र. 661   

श्री गुरूगोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत

विद्यार्थ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रदर्शन संपन्न   

नांदेड, दि. 25 जून :- सध्याचे युग हे आधुनिक तंत्रज्ञानाचे युग आहे. प्रत्येक क्षेत्रात आज एआय सारख्या तंत्रज्ञानाचा वापर केल्या जातो. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना या सर्व बाबींची माहिती होण्यासाठी शैक्षणिक गुणवत्ता व कंपनीला लागणारे कौशल्य यांच्यातील शैक्षणिक दरी मिटवण्यासाठी बीएमएस व  टाटा Strive यांच्या संयुक्त विद्यमाने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रोजेक्ट व पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय आद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथे करण्यात आले होते. 

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेडचे आयएमएस सदस्य हर्षद शहा उपस्थित होते. एस.जी.जी.एस. इंजिनीअरींग कॉलेजचे एचओडी डॉ. गणेश पाकळे निरीक्षक म्हणून तर हूजूर साहिब आद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेडचे भिमसिंग व जगजितपाल उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे प्राचार्य सचिन सुर्यवंशी यांनी भुषवले. बीएमएस टाटा Strive चे व्यवस्थापक कार्यक्रमासाठी उपस्थित होते. 

बीएमएस टाटा Strive यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशिक्षणार्थ्यांना त्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी ऑनलाईन प्रशिक्षण देवून प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. आयएमसीचे सदस्य हर्षद शहा यांनी आधुनिक तंत्रज्ञानामुळे दैनंदिन कामे लवकर आणि सहज होतात. त्यामुळे प्रशिक्षणार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अंगीकृत करावा, असे आपल्या भाषणात नमूद केले. अध्यक्षीय भाषणात संस्थेचे प्राचार्य सचिन सुर्यवंशी यांनी मुल्यवर्धीत शिक्षण घेण्याचे प्रशिक्षणार्थ्यांना आवाहन केले. तंत्रज्ञानामुळे शिक्षणाचे नविन मार्ग उपलब्ध होत आहेत. त्याचा जास्तीत जास्त फायदा प्रशिक्षणार्थ्यांनी जीवनात करून घ्यावा, असे सांगीतले. 

याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शना ज्या प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग नोंदवला त्यांचे कौतूक केले. प्रत्येकी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त प्रशिक्षणार्थ्यांना BMS TaTa Strive यांच्या मार्फत बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सर्व नियोजन संस्थेतील गटनिदेशिका सौ. के. टी. दासवाड यांनी केले. आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डी. ए. पोतदार यांनी मानले. कार्यक्रमासाठी मोठया प्रमाणात पालक, प्रशिक्षणार्थी संस्थेतील कर्मचारी उपस्थित होते.  

0000



 वृत्त क्र. 660 

विद्यार्थ्यांना जाता वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहिम शिबीर 

नांदेड, दि. 25 जून :- राजर्षी शाहू महाराज जयंती पर्वच्या अनुषंगाने सामाजिक न्याय दिन साजरा करण्यासाठी 26 जून ते 4 जुलै 2025 दरम्यान सन 2025-26 मध्ये प्रवेशीत इ. 11 वी व 12 वी विज्ञान शाखेतील सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहिम शिबीर राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी त्यांचे ऑनलाईन अर्ज भरुन त्याची प्रिंट काढून शिबिराच्या कालावधीत समिती कार्यालयात उपस्थित राहून त्वरीत जमा करावेत, असे आवाहन समितीचे अध्यक्ष उपायुक्त तथा सदस्य व संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव यांच्यावतीने  करण्यात आले आहे. 

"राजर्षी शाहू महाराज जयंती पर्व" च्या अनुषंगाने 26 जुन ते 4 जुलै 2025 या कालावधीत सन 2025-26 या वर्षातील प्रवेशित इ. 11 12 वी विज्ञान शाखेतील ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी आजपर्यंत ऑनलाईन अर्ज भरले नाहीत अशा सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रवेशीत संबंधित महाविद्यालया स्थापन केलेल्या समान संधी केंद्रामार्फत ऑनलाईन अर्ज भरुन त्याची प्रिंट काढून त्यासोबत आवश्यक ते मुळ कागदपत्रे पुरावे जोडून प्रवेशित महाविद्यालयाचे समान संधी केंद्राकडे जमा करावेत. 1112 वी विज्ञान शाखा असलेल्या सर्व संबंधित महाविद्यालयानी 26 जुन ते 4 जुलै, 2025 कालावधीत महाविद्यालय स्तरावर विशेष मोहिम शिबिर राबवून स्थापन केलेल्या समान संधी केंद्रामार्फत प्रवेशीत सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन भरलेले अर्ज एकत्रितरित्या आपल्यास्तरावर जमा करुन घेण्यात यावेत. जेणेकरुन विद्यार्थ्यांसाठी गैरसोय होणार नाही. 

सन 2025-26 या वर्षातील प्रवेशीत इ. 11, 12 वी विज्ञान शाखेतील व विविध व्यावसायिक पाठयक्रमाच्या प्रवेशासाठी राखीव प्रवर्गातून प्रवेश घेणाऱ्या सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वैधता प्रमाणपत्रा अभावी प्रवेशापासून वंचित राहू नये यासाठी समितीकडून विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी व जात वैधता प्रमाणपत्र मिळविताना येणाऱ्या अडी-अडचणीबाबत विद्यार्थी, पालकांना व संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य, नोडल अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन करण्यासाठी ऑनलाईन वेबीनारकरीता विशेष मोहिम शिबिर राबविण्यात येत आहे. 

विशेष मोहिम अंतर्गत महाविद्यालय स्तरावर एकत्रितरित्या जमा करुन घेण्यात आलेले जात प्रमाणपत्र पडताळणीचे ऑनलाईन प्रस्ताव समितीकडे जमा करण्यासाठी समिती कार्यालयासाठी संपर्क साधून जमा करण्यात यावेत. तसेच 2025-26 मध्ये विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या राखीव प्रवर्गाच्या प्रवेशासाठी सीईटी दिलेल्या व डिप्लोमा तृतीय वर्ष संपलेल्या ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी देखील आजपर्यंत ऑनलाईन अर्ज भरले नाहीत अशा सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी त्यांचे ऑनलाईन अर्ज भरुन त्याची प्रिंट काढून या शिबिराच्या कालावधीत समिती कार्यालयात उपस्थित राहून त्वरीत जमा करावेत, असे आवाहन समितीचे अध्यक्ष, उपायुक्त तथा सदस्य व संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव यांच्यावतीने  करण्यात आले आहे.

000000

वृत्त क्र. 659

आणीबाणी काळात लढा देणाऱ्या व्यक्तींचा 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे सन्मानपत्र देऊन गौरव 

जिल्हाधिकारी यांच्या हस्ते झाला सन्मान 

नांदेड, दि. 25 जून :- दिनांक 25 जून 1975 ते 31 मार्च 1977 या घोषीत कालावधीत आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर लोकशाही मुल्यांच्या रक्षणासाठी लढा देणाऱ्या आणि त्यासाठी बंदिवास सोसावा लागला अशा व्यक्तींचा सन्मान, यथोचित गौरव आज जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आला.  

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात आणीबाणीत सहभागी असलेल्या संघर्षयात्रींचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे सन्मानपत्र व शाल देऊन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी काही वयोवृद्ध ज्येष्ठ व्यक्ती उपस्थित होत्या. त्यांचा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जागेवर जावून सन्मान केला. 

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, आणीबाणीमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतलेले लक्ष्मण कुलकर्णी, तुकाराम वारकड, प्रभाकर उंचाडकर, नंदकुमार कुलकर्णी यांच्यासह जिल्ह्यातील आणीबाणीत सहभाग घेतलेले विविध नागरिक व त्यांचे वारसदार यांची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी यांच्या हस्ते झाला सन्मान

यावेळी लक्ष्मण किशनराव कुलकर्णी, तुकाराम शंकरराव वारकड, श्यामसुंदर शंकरराव जहागीरदार, मनोहर एकनाथ केंद्रे, महाजन शंकर पिंपळदरे, वारसपत्नी उषा अरुणराव नातु, वारसपत्नी प्रभावती शंकरराव सरदेशपांडे, वारसपत्नी लिलाबाई विष्णुपंत ब्रम्हनाथकर, वारसपत्नी संजीवनीबाई बस्वेश्वर दरगु, वारसपत्नी शांताबाई गंगाधर तीवाडी, वारसपत्नी मथुराबाई अनंतराव जोशी, विजयकुमार श्रीनिवासराव कुलकर्णी, नंदकुमार माधवराव कुलकर्णी, वारसपत्नी कांताबाई शंकर अंकमवार, वारसपत्नी संगिता आनंदराव साखरेकर, रामा शेषेराव केंद्रे , मारोती गोविंद केंद्रे , शिवाजी भिमराव वाघमारे, शिवाजी गंगाराम देशमुख, दत्ता जळबा वाघमारे, वारसपत्नी  धोंडयाबाई लक्ष्माण वाघमारे, उत्तम देवजी केंद्रे, संभाजी नागोजी केंद्रे, बालाजी मारोती मुंडकर, गंगाधर शेषेराव तेलंग, भिमराव गणपती वंजे, दशरथ नामदेव कल्याणकर, विश्वनाथ रामा गायकवाड, वारसपत्नी सोन्या बाई सुभाषराव मोरे, शेख शबीर मौलाना, आनंदा भुजंगा गायकवाड, गंगाराम ग्यानोबा कल्याणकर, नामदेव दत्ता तेलंग, वारसपत्नी निलावती भागवत ढगे, गुरुनाथ माणिकराव कुरुडे, पंढरीनाथ माणिकराव कुरुडे, आमृता मानोजी पाये, हुजुर कादरसाब शेख, निळबा सोनबा डाके, आनंदा पिराजी पाटील, बालाजी केशवराव गिरे, दादाराव मारुती शिंदे, उत्तम भिमराव तेलंग, वारसपत्नी प्रयागबाई श्रीराम शिंदे, उध्दव रामराव पुरी, वारसपत्नी रेणुकाबाई भानुदास ढाकणे, माधव मोतीराम कल्याणकर, शिवाजी शेषेराव कल्याणकर, वारसपत्नी कमलबाई संभाजी नखाते, वारसपत्नी प्रयागबाई उत्तम मुंडे, वारसपत्नी संताबाई नागोराव गित्ते, वारसपत्नी राऊबाई लक्ष्मलण केंद्रे, वारसपत्नी  रुक्मनीबाई नारायण वडजे, वारसपत्नी धोंडयाबाई मारोती इप्पर, वारसपत्नी पदमीनबाई शंकर कल्याणकर, वारसपत्नी लक्ष्मीबाई बालाजी पेठकर, वारसपत्नी विमलबाई केरबा पेटकर, वारसपत्नी सखुबाई सोपान दासरे, वारसपत्नी कौतिकाबाई रघुनाथ गायकवाड, वारसपत्नी गोदावरीबाई विश्वनाथराव मानसपुरे, वारसपत्नी शकुंतला राजाराम निलावार, वारसपत्नी पदमीनबाई भाऊराव किडे, वारसपत्नी मंजुळाबाई काशीनाथ गोरे, पुरुषोत्तम धोंडोपंत देशपांडे, विठ्ठल बापुजी घोरबांड, वारसपत्नी शारदाबाई विनायकराव देशमुख , वारसपत्नी सुंदरबाई दत्तात्रय किडे, नागोराव रामजी वानखेडे, उत्तमराव गणपतराव कदम, सदाशिव साधू लोखंडे, त्र्यंबक केरबाजी कदम, दिगांबर परसराम कदम, भगवान संतराम आनेराव, बालाजी पांडूरंग आनेराव, संभा महादू कदम, किशन बाबुबुवा गोसावी, रघुनाथ सटवाजी केंद्रे, वारसपत्नी रेणुकाबाई गोविंदराव कदम, वारसपत्नी शोभाबाई श्रीराम कदम, वारसपत्नी जिजाबाई रंगनाथ कदम, वारसपत्नी रंजनाबाई विश्वांभर गंगोत्री व रुक्मीनबाई विश्वांभर गंगोत्री, प्रभाकर रामराव उंचाडकर यांचा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी शाल व सन्मानपत्र देवून सन्मान केला. 

00000














 सोबत- व्हिडिओ चित्रफित 


वृत्त क्र. 658  

 

छायाचित्र प्रदर्शनातून आणीबाणीतील घडामोडीचा

इतिहास अनुभवण्यास मिळणार जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

 

  • जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने आणीबाणीतील सचित्र प्रदर्शनाचे आयोजन
  • ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांचा छायाचित्र प्रदर्शनास उर्त्स्फूत प्रतिसाद

 

नांदेडदि. 25 जून :- देशात 25 जून 1975 रोजी आणिबाणी लागू करण्यात आली होती. या घटनेला आज 25 जून रोजी 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. या काळात ज्या नागरिकांनी तुरुंगवास भोगला व भुमिगत राहून कार्य केले अशा नागरिकांचा इतिहास छायाचित्र व माहितीच्या स्वरुपात या प्रदर्शनाच्या माध्यमातून अनुभवण्यास मिळत आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून आणिबाणीतील सर्व घटनाक्रम व इतिहास नागरिकांना अनुभवण्यास मिळत आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.   

 

जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने आणीबाणीच्या कालावधीतील छायाचित्र व माहिती प्रदर्शनाचे आयोजन जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे फित कापून जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. यावेळी आणीबाणीमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतलेले लक्ष्मण कुलकर्णीतुकाराम वारकडप्रभाकर उंचाडकरनंदकुमार कुलकर्णीजिल्ह्यातील आणीबाणी सहभाग घेतलेले विविध नागरिकत्यांचे वारसदार यांच्यासह जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सुर्यवंशीजिल्हा माहिती कार्यालयाच्या उपसंपादक अलका पाटीलविद्यार्थीनागरिकांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती.  

 

आपला देश हा लोकशाही पुरस्कृत देश असून आपल्याला लोकशाही फार कष्टातून मिळालेली आहे. सन 1975 ला देशात आणीबाणी लागली यावेळी अनेक‍ नागरिकांना तुरुंगास भोगावा लागलालोकशाहीचे महत्त्व अधोरेखीत राखण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहे. अनेकांनी भुमिगत राहून कार्य केली. या सर्व सहभागी नागरिकांना शासनातर्फे मानधन देण्यात येते. या आणीबाणीत सहभाग घेतलेल्या व्यक्तींप्रती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

 

यावेळी जिल्हाधिकारी कर्डिले यांच्या हस्ते उपस्थित आणीबाणीत सहभाग घेतलेले नागरीक व त्यांच्या वारसदारांचा पुष्पगुच्छ व लोकराज्य अंक देवून सन्मान करण्यात आला. आणीबाणीत सहभागी असलेल्या नागरिकांनी केलेल्या कार्याची माहिती यावेळी लक्ष्मण कुलकर्णी यांनी दिली. हे प्रदर्शन श्री गुरूगोविंदसिंघजी स्टेडियम परिसर जिल्हा ग्रंथालय कार्यालय नांदेड येथे आज आणि उद्या सर्वांसाठी खुले राहणार असून नागरिकांनी या प्रदर्शनास भेट द्यावीअसे आवाहन नांदेड जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.   

00000




































  वृत्त क्र. 706 खरीप हंगामासाठी पीक विमा भरण्याची 31 जुलै मुदत   नांदेड, दि. ८ जुलै :- खरीप हंगाम 2025 साठी पीक विमा भरण्याची अंतिम दिनांक ...