सोबत- व्हिडिओ चित्रफित
वृत्त क्र. 658
छायाचित्र प्रदर्शनातून आणीबाणीतील घडामोडीचा
इतिहास अनुभवण्यास मिळणार : जिल्हाधिकारी राहुल कर्डि
- जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने आणीबाणीतील सचित्र प्रदर्शनाचे आयोजन
- ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांचा छायाचित्र प्रदर्शनास उर्त्स्फूत प्रतिसाद
नांदेड, दि. 25 जून :- देशात 25 जून 1975 रोजी आणिबाणी लागू करण्यात आली होती. या घटनेला आज 25 जून रोजी 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. या काळात ज्या नागरिकांनी तुरुंगवास भोगला व भुमिगत राहून कार्य केले अशा नागरिकांचा इतिहास छायाचित्र व माहितीच्या स्वरुपात या प्रदर्शनाच्या माध्यमातून अनुभवण्यास मिळत आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून आणिबाणीतील सर्व घटनाक्रम व इतिहास नागरिकांना अनुभवण्यास मि
जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने आणीबाणीच्या कालावधीतील छायाचित्र व माहिती प्रदर्शनाचे आयोजन जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे फित कापून जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. यावेळी आणीबाणीमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतलेले लक्ष्मण कुलकर्णी, तुकाराम वारकड, प्रभाकर उंचाडकर, नंदकुमार कुलकर्णी, जि
आपला देश हा लोकशाही पुरस्कृत देश असून आपल्याला लोकशाही फार कष्टातून मिळालेली आहे. सन 1975 ला देशात आणीबाणी लागली यावेळी अनेक नागरिकांना तुरुंगास भोगावा लागला. लोकशाहीचे महत्त्व अधोरेखीत राखण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. अनेकांनी भुमिगत राहून कार्य केली. या सर्व सहभागी नागरिकांना शासनातर्फे मानधन देण्यात येते. या आणीबाणीत सहभाग घेतलेल्या व्यक्तींप्रती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी जिल्हाधिकारी कर्डिले यांच्या हस्ते उपस्थित आणीबाणीत सहभाग घेतलेले नागरीक व त्यांच्या वारसदारांचा पुष्पगुच्छ व लोकराज्य अंक देवून सन्मान करण्यात आला. आणीबाणीत सहभागी असलेल्या नागरिकांनी केलेल्या कार्याची माहिती यावेळी लक्ष्मण कुलकर्णी यांनी दिली. हे प्रदर्शन श्री गुरूगोविंदसिंघजी स्टेडियम परिसर जिल्हा ग्रंथालय कार्यालय नांदेड येथे आज आणि उद्या सर्वांसाठी खुले राहणार असून नागरिकांनी या प्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन नांदेड जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
00000
No comments:
Post a Comment