वृत्त क्र. 660
विद्यार्थ्यांना जाता वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहिम शिबीर
नांदेड, दि. 25 जून :- राजर्षी शाहू महाराज जयंती पर्वच्या अनुषंगाने सामाजिक न्याय दिन साजरा करण्यासाठी 26 जून ते 4 जुलै 2025 दरम्यान सन 2025-26 मध्ये प्रवेशीत इ. 11 वी व 12 वी विज्ञान शाखेतील सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहिम शिबीर राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी त्यांचे ऑनलाईन अर्ज भरुन त्याची प्रिंट काढून शिबिराच्या कालावधीत समिती कार्यालयात उपस्थित राहून त्वरीत जमा करावेत, असे आवाहन समितीचे अध्यक्ष व उपायुक्त तथा सदस्य व संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव यांच्यावतीने करण्यात आले आहे.
"राजर्षी शाहू महाराज जयंती पर्व" च्या अनुषंगाने 26 जुन ते 4 जुलै 2025 या कालावधीत सन 2025-26 या वर्षातील प्रवेशित इ. 11 व 12 वी विज्ञान शाखेतील ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी आजपर्यंत ऑनलाईन अर्ज भरले नाहीत अशा सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रवेशीत संबंधित महाविद्यालयात स्थापन केलेल्या समान संधी केंद्रामार्फत ऑनलाईन अर्ज भरुन त्याची प्रिंट काढून त्यासोबत आवश्यक ते मुळ कागदपत्रे पुरावे जोडून प्रवेशित महाविद्यालयाचे समान संधी केंद्राकडे जमा करावेत. 11 व 12 वी विज्ञान शाखा असलेल्या सर्व संबंधित महाविद्यालयानी 26 जुन ते 4 जुलै, 2025 कालावधीत महाविद्यालय स्तरावर विशेष मोहिम शिबिर राबवून स्थापन केलेल्या समान संधी केंद्रामार्फत प्रवेशीत सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन भरलेले अर्ज एकत्रितरित्या आपल्यास्तरावर जमा करुन घेण्यात यावेत. जेणेकरुन विद्यार्थ्यांसाठी गैरसोय होणार नाही.
सन 2025-26 या वर्षातील प्रवेशीत इ. 11, 12 वी विज्ञान शाखेतील व विविध व्यावसायिक पाठयक्रमाच्या प्रवेशासाठी राखीव प्रवर्गातून प्रवेश घेणाऱ्या सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वैधता प्रमाणपत्रा अभावी प्रवेशापासून वंचित राहू नये यासाठी समितीकडून विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी व जात वैधता प्रमाणपत्र मिळविताना येणाऱ्या अडी-अडचणीबाबत विद्यार्थी, पालकांना व संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य, नोडल अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन करण्यासाठी ऑनलाईन वेबीनारकरीता विशेष मोहिम शिबिर राबविण्यात येत आहे.
विशेष मोहिम अंतर्गत महाविद्यालय
स्तरावर एकत्रितरित्या जमा करुन घेण्यात आलेले जात प्रमाणपत्र पडताळणीचे ऑनलाईन
प्रस्ताव समितीकडे जमा करण्यासाठी समिती कार्यालयासाठी संपर्क साधून जमा करण्यात
यावेत. तसेच 2025-26 मध्ये विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या राखीव
प्रवर्गाच्या प्रवेशासाठी सीईटी दिलेल्या व डिप्लोमा तृतीय वर्ष संपलेल्या ज्या
मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी देखील आजपर्यंत ऑनलाईन अर्ज भरले नाहीत अशा सर्व
मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी त्यांचे ऑनलाईन अर्ज भरुन त्याची प्रिंट काढून या
शिबिराच्या कालावधीत समिती कार्यालयात उपस्थित राहून त्वरीत जमा करावेत, असे आवाहन समितीचे
अध्यक्ष, उपायुक्त
तथा सदस्य व संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव यांच्यावतीने करण्यात आले आहे.
000000
No comments:
Post a Comment