Wednesday, October 14, 2020

 

253 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

96 बाधितांची भर तर तीन जणांचा मृत्यू    

नांदेड (जिमाका) दि. 14 :- बुधवार 14 ऑक्टोंबर 2020 रोजी सायं. 5.30  वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 253 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 96 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 52 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 44 बाधित आले. 

आजच्या एकुण 899 अहवालापैकी 760 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 17 हजार 698 एवढी झाली असून यातील  15  हजार 156 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 1 हजार 968 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 45 बाधितांची प्रकृती अती गंभीर स्वरुपाची आहे. 

या अहवालात तीन जणाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. सोमवार 12 ऑक्टोंबर रोजी सराफा गल्ली नांदेड येथील 80 वर्षाचा एक पुरुषाचा खाजगी रुग्णालयात, लुंगारे गल्ली कंधार येथील 60 वर्षाचा एक पुरुष, चौफाळा नांदेड येथील 64 वर्षाच्या एक महिलेचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 464 झाली आहे.  

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 1, धर्माबाद कोविड केंअर सेंटर 1, मुखेड कोविड केंअर सेंटर 5, हदगाव कोविड केंअर सेंटर 8, लोहा कोविड केंअर सेंटर 1, किनवट कोविड केंअर सेंटर 7, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 16, मुदखेड कोविड केंअर सेंटर 2, एनआरआय, पंजाब भवन, महसूल भवन/होम आयसोलेशन 170, बारड कोविड केंअर सेंटर 3, उमरी कोविड केंअर सेंटर 6, खाजगी रुग्णालय 33, असे 253 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 88.50 टक्के आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 38, अर्धापुर तालुक्यात 1, हिमायतनगर तालुक्यात 1, नायगाव तालुक्यात 2, परभणी 2, नांदेड ग्रामीण 4, भोकर तालुक्यात 1, किनवट तालुक्यात 2, हिंगोली 1 असे एकुण 52 बाधित आढळले.  

तर अँटिजेन तपासणीद्वारे  नांदेड मनपा क्षेत्र 24, लोहा तालुक्यात 4,  माहूर तालुक्यात 2, भोकर तालुक्यात 2, मुखेड तालुक्यात 3, नांदेड ग्रामीण 1, धर्माबाद तालुक्यात 1, किनवट तालुक्यात 2, बिलोली तालुक्यात 4, कंधार तालुक्यात 1, असे एकूण 44 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 1 हजार 968 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 140, एनआरआय व पंजाब भवन, महसूल भवन/होम आयसोलेशन एकत्रित 1 हजार 164, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड येथे 65, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड (नवी इमारत) येथे 35, हदगाव कोविड केअर सेंटर 23, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 39, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 33, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 48,  मांडवी कोविड केअर सेंटर 6, देगलूर जैनब कोविड केअर सेंटर येथे 12, लोहा कोविड केअर सेंटर येथे 20, बारड कोविड केअर सेंटर 3, मुदखेड कोविड केअर सेटर 11, माहूर कोविड केअर सेंटर 21, किनवट कोविड केअर सेंटर येथे 34, धर्माबाद कोविड केअर सेंटर 19, उमरी कोविड केअर सेंटर 32, कंधार कोविड केअर सेंटर येथे 15, अर्धापूर कोविड केअर सेंटर 23, भोकर कोविड केअर सेंटर 18,  खाजगी रुग्णालयात दाखल 207 झाले आहेत. 

बुधवार 14 ऑक्टोंबर रोजी 5.30 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 76, आयुर्वेदिक शासकीय महाविद्यालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 90, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 63 एवढी आहे. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 95 हजार 723,

निगेटिव्ह स्वॅब- 74 हजार 793,

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 17 हजार 698,

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 15 हजार 156,

एकूण मृत्यू संख्या- 464,

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 88.50

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-5,

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 8,

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 461, 

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 1 हजार 168,

आज रोजी अती गंभीर प्रकृती असलेले बाधित- 45.  

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. 

0000 

 

 

हमीभावाने कापूस खरेदीसाठी

शेतकऱ्यांनी प्राथमिक नोंदणी करणे आवश्यक 

नांदेड (जिमाका) दि. 14 :- सन 2020-21 मधील हंगामातील कापसाची हमीभावाने खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी प्राथमिक नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्याची ऑनलाईन गुगल लिंक तयार केली आहे. जिल्ह्यातील सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी तालुकानिहाय गुगल लिंकवर येत्या 31 ऑक्टोबरपर्यंत प्राथमिक नोंदणी करावी, असे आवाहन  सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक डॉ. अमोल यादव यांनी केले आहे. 

केंद्र शासनाने हंगाम 2020-21 मध्ये कापसाची किमान आधारभुत किंमत 5 हजार 515 मिडीयम स्टॅम्पल व 5 हजार 825 लॉग स्टॅम्पल अशी जाहिर केली आहे. सन 2020-21 च्या कापूस हंगामाlसाठी कापसाच्या हमी किंमतीत वाढ झाली असल्याने सीसीआयला किमान आधारभूत किंमत योजनेत मोठ्या प्रमाणात कापूस खरेदी करावी लागणार आहे. 

जिल्ह्यात हंगाम 2019-20 मधील कापसाची शासकीय हमीभावाने खरेदी करण्यासाठी 8 शासकीय खरेदी केंद्र होते. सन 2019-20 मध्ये भारतीय कापूस निगम सीसीआय व महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ मर्यादित, खाजगी बाजार, थेटपणन परवानाधारक व बाजार समितीमधील अनुज्ञप्तीधारक व्यापारी या सर्वामार्फत जिल्ह्यात एकुण 12.31 लाख क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. 

यावर्षी जिल्ह्यात चांगला पाऊस झाला असून व सध्या कापूस पिकाची परिस्थितीसुद्धा उत्तम आहे. त्यामुळे हंगाम 2020-21 मधील कापसाचे उत्पादनात वाढ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. म्हणून जिल्ह्यातील शेतकऱ्यांची प्राथमिक नोंदणी करणे आवश्यक झाले आहे. हंगाम 2020-21 मधील कापसाची खरेदीसाठी शेतकऱ्यांची प्राथमिक ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र अशी ऑनलाईन गुगल लिंक तयार करण्यात आली आहे. सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी दिलेल्या लिंकवर नोंदणी करावी. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची यादी संबंधित तालुक्यातील उपसहायक निबंधक सहकारी संस्था यांच्याकडे पाहण्यासाठी उपलब्ध असणार आहे. 

हंगाम 2020-21 मधील कापूस खरेदीसाठी नियंत्रण अधिकारी व गुगललिंक पुढीलप्रमाणे आहे.

उपनिबंधक सहकारी संस्था नांदेड तालुका

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScDjX7eO-GNUuUys5qgRmhPoidlcse3MrJJ8eY3dGdCiUNJ3A/viewform?usp=sf_link

सहायक निबंधक, सहकारी संस्था अर्धापूर तालुका https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfj1cYY5pGwhta5QlyGZGprwmintAtXyBdJf4jVGQMsdbaGpg/viewform?usp=sf_link

सहायक निबंधक, सहकारी संस्था मुदखेड तालुका https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSclkldmO0zaRYwtI2eZfTRXkMLF7fSCObkP9r6lp1oyDAEPEQ/viewform?usp=sf_link

सहायक निबंधक, सहकारी संस्था उमरी तालुका https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSenT7G2synCw-iLuq9saxJ-17_Vx43Hs9VBwHjxUhwdHF5GIA/viewform?usp=sf_link

सहायक निबंधक, सहकारी संस्था धर्माबाद तालुका https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSf794cdmvzcofLWKlzQ6-H-GzrKfYr5p5ggiWJopXUDsnakHA/viewform?usp=sf_link

सहायक निबंधक, सहकारी संस्था बिलोली तालुका https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScZsZQZPsaTWequ26CxuE4Lx6NSMdIsDGmMT_daxUkDGlgj9w/viewform?usp=sf_link

सहायक निबंधक, सहकारी संस्था मुखेड तालुका https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScjqOAn0FnmdtrjPuWwx2ubV9ENTavcse26ZAH7pXy5MaUJAA/viewform?usp=sf_link

सहायक निबंधक, सहकारी संस्था नायगाव तालुका

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdW-WrAF2oVGdm5xdWvl5hKpoT1k2bEePZ0rmcr1eAT75GLrQ/viewform?usp=sf_link

सहायक निबंधक, सहकारी संस्था देगलूर तालुका https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfHQ90F3zyHHh8vXumo2tMi096lrVV0ElzinOYZTfO4L95pRQ/viewform?usp=sf_link

सहायक निबंधक, सहकारी संस्था कंधार तालुका https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSe4ptkqNSB26xEjWIN_DLEdigNp-CtSV71WyCBAfGn1QC0odA/viewform?usp=sf_link

सहायक निबंधक, सहकारी संस्था लोह तालुका https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdMVRm2hl0QJd4W5fXLUs4lE7VdrjR7rEbvG4ZvpZ5Z0Kl-Ow/viewform?usp=sf_link

सहायक निबंधक, सहकारी संस्था हदगाव तालुका https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdG_QXgmQO9dyfUOI5Bkf-iY9mDcw321dkXUGcEasyJwg9ouA/viewform?usp=sf_link

सहायक निबंधक, सहकारी संस्था भोकर तालुका https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfqwrZpnPB5AAqaVgyBk6JlD94FzDIXTk-rVxPpZ8dKLxNEaQ/viewform?usp=sf_link

सहायक निबंधक, सहकारी संस्था हिमायतनगर तालुका https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfUJoH91g9hqBKqpgSl9_E5TVtsyd1Ft42ib1NQLMhqveAiBA/viewform?usp=sf_link

सहायक निबंधक, सहकारी संस्था किनवट तालुका https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSccegPb6FIOYJ4kaDCwXNpwATLsqh0B0pZ9fk3OBE0fNVnv-w/viewform?usp=sf_link

सहायक निबंधक, सहकारी संस्था माहूर तालुका https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdAnOw_cH5CxGZPZ_lvflJhbEwIVIl5ap7lILudPPvyxIAraA/viewform?usp=sf_link

 याप्रमाणे हमीभावाने कापूस खरेदीसाठी नियंत्रण अधिकारी व  गुगललिंकची माहिती सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक डॉ. अमोल यादव यांनी दिली आहे.

000000

 

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी

शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे 

नांदेड दि. 14 (जिमाका):- जिल्ह्यात महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती 2019 योजनेंतर्गत लाभासाठी 7 हजार 321 शेतकऱ्यांनी अद्याप आधार प्रमाणिकरण प्रक्रिया पुर्ण केलेली नाही. त्यांना आधार प्रमाणिकरण केल्याशिवाय शेतकऱ्यांच्या खात्यात शासनामार्फत कर्जमुक्तीची रक्कम जमा करता येणार नाही. त्यासाठी आधार प्रमाणिकरण शिल्लक राहिलेल्या शेतकऱ्यांनी जवळच्या सेतू केंद्रावर जाऊन तात्काळ आधार प्रमाणिकरण करावे, असे आवाहन सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक डॉ. अमोल यादव यांनी केले आहे. 

राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने "महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019" ही 27 डिसेंबर 2019 च्या आदेशान्वये कार्यान्वित केली आहे. 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च, 2019 पर्यंतच्या कालावधीसाठी अल्पमुदतीचे पीककर्ज घेतलेल्या तसेच या कालावधीत घेतलेल्या अल्पमुदतीच्या पीक कर्जाचे पुर्नगठन, फेरपुनर्गठन केलेल्या कर्जामधील 30 सप्टेंबर 2019 रोजी रु. 2 लाखापर्यंत थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. 

नांदेड जिल्ह्यात या योजनेंतर्गत एकुण 2 लाख 14 हजार 491 शेतकरी कर्जमुक्तीसाठी पात्र असुन त्यापैकी बँकांनी 2 लाख 7 हजार 617 शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड केली आहे. या बँकांनी अपलोड केलेल्या माहितीपैकी कर्जमाफी पात्र असणाऱ्या 1 लाख 83 हजार 344 शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर प्रसिद्ध केली आहे. त्यापैकी 1 लाख 76 हजार 23 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण प्रक्रिया पुर्ण केलेली आहे. आधार प्रमाणिकरण प्रक्रिया पुर्ण केलेल्या शेतकऱ्यापैकी 1 लाख 73 हजार 243 शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम 1,18,813 लाख रुपये जमा करण्यात आली आहे. उर्वरीत आधार प्रमाणिकरण केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात शासनामार्फत लवकरच कर्जमुक्तीची रक्कम जमा करण्यात येणार आहे, असेही सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक डॉ. अमोल यादव यांनी कळविले आहे.

00000

 

प्रधानमंत्री पिकविमा योजनेअंतर्गंत खरीप पिकांचे नुकसान झाल्यास

पिकविमा कंपनीस कळविण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 14 :- जिल्ह्यात ऑक्टोंबर महिन्यातही सर्वत्र पाऊस होत आहे. खरीप पीक कापणी हंगाम नेमका अंतिम टप्प्यात असून काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पिके काढून गोळा न करता शेतातच वाळविण्यासाठी ठेवलेले आहेत. तर काही शेतकऱ्यांचे पीक शेतात उभे आहे. मागील दोन-तीन दिवसात झालेल्या पावसामुळे ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे व ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा उतरविला आहे. त्यांनी विम्यासाठी पुढील प्रक्रिया करणे आवश्यक आहे. अधिसूचित केलेल्या पीक व क्षेत्रातील शेतात पिकाच्या कापणीपासून 14 दिवसांच्या आत गारपीट, चक्रीवादळ, अतिवृष्टी, ढगफुटी व अवकाळी पाऊस यामुळे झालेल्या नुकसानीचे वैयक्तिक स्तरावरुन केलेले पंचनामे नुकसानीस ग्राह्य धरता येतात. यासाठी शेतकऱ्यांनी असे कोणाबाबत घडले असल्यास 72 तासाच्या आत याबाबत सूचना विमा कंपनीस किंवा महसूल / कृषि विभागास देणे बंधनकारक आहे. यामध्ये नुकसान कळवितांना सर्वेनंबर व नुकसानग्रस्त तपशील कळविणे हे बंधनकारक आहे. प्राप्त झालेल्या सुचनेवर संयुक्त समिती शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या क्षेत्राची पाहणी करेल. या पाहणी पथकात विमा कंपनी प्रतिनिधी, कृषी अधिकारी व संबंधित शेतकरी यांचा समावेश असेल.

 

ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांनी जवळच्या माहिती असलेल्या व्यक्तीकडून गुगल प्ले-स्टोअरवरील क्रॉप ईन्शुरन्स हे ॲप डाऊनलोड करुन घ्यावे. त्यानंतर आपल्या नुकसानीची माहिती त्यात द्यावी. ज्या शेतकऱ्यांना हे शक्य नसेल त्यांनी 18001035490 या टोल फ्री क्रमांकावर किंवा agri.support@iffcotokio.co.in या ई-मेलवर अथवा कृषि व महसुल विभागास याबाबत माहिती कळवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

  

0000

 वृत्त क्र. 456  

निर्यातक्षम द्राक्षबागांची

ग्रेपनेटद्वारे नोंदणी करण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 14 :- द्राक्ष बागायतदारांनी सन 2020-21 साठी निर्यातक्षम बागाची नोंदणी व नुतनीकरण करण्याकरिता कृषी विभागाच्‍या कृषी सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे संपर्क साधून अर्ज करावेत. ग्रेपनेटव्‍दारे नोंदणी करण्‍याची अंतिम मुदत 29 नोव्‍हेंबर असून कृषि विभागाच्‍या क्षेत्रीय कार्यालयाशी संपर्क करुन विहीत मुदतीत नोंदणी व नुतनीकरण करण्‍याचे आवाहन संचालक फलोत्‍पादन यांनी  केले आहे.  

 सन 2019-20 मध्‍ये 33 हजार 451 निर्यातक्षम बागांची नोंदणी झाली आहे. निर्यातक्षम द्राक्षबागाचे नुतनीकरणासाठी फक्‍त अर्ज करण्‍याची गरज आहे. तर नव्‍याने नोंदणीसाठी विहीत नमुन्‍यातील अर्ज, सातबारा, 8-अ, बागेचा नकाशा व 50 रुपये  नोंदणी शुल्क आवश्‍यक आहे. 

किडनाशक उर्वरीत अंश व किडरोगांची हमी देण्‍यासाठी ग्रेपनेटव्‍दारे निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी करण्‍यात येते. सन 2020-21 साठी निर्यातक्षम द्राक्ष बागाची युरोपियन युनियन व इतर देशांना देखील नोंदणी बंधनकारक करण्‍यात आलेले आहे. त्‍यातील सुचनेनुसार आवश्‍यक असलेले अनेक्‍झर-5, (केंद्रीय किटकनाशक मंडळ व नोंदणी समिती यांनी द्राक्ष पिकांसाठी कायदेशीर प्रमाणीत केलेल्‍या औषधांची यादी)  व अनेक्‍झर-9 (द्राक्ष पिकाकरीता सन 2020-21 या हंगामासाठी वापरण्‍याच्‍या कृषि औषधांची यादी) अंतिम करुन ग्रेपनेट प्रणालीवर 20 ऑगस्ट 2020 रोजी प्रसिध्‍द केली आहे. निर्यातक्षम बागा नोंदणी करीता ग्रेपनेट ही ऑनलाईन प्रणाली 8 ऑक्‍टोंबर पासून कार्यान्वित करण्‍यात आली आहे, असेही आवाहन संचालक फलोत्‍पादन यांनी  केले आहे. 

0000

 वृत्त क्र. 455  

केळी पिकावरील किडबाबत सल्ला  

नांदेड (जिमाका) दि. 14 :- कृषी विभागामार्फत केळी पिकावरील किड व रोग सर्वेक्षण तसेच सल्ला प्रकल्पाचे काम सुरु असून केळी पिक संरक्षणासाठी पुढीलप्रमाणे कृषी संदेश देण्यात आला आहे. यात केळी पिकांवरील फुलकिडे नियंत्रणासाठी केळीचे घडावर व्हर्टीसिलियम लेकॅनी 3 ग्रॅम लि. अधिक एक मिली स्टीकर  किंवा निंबोळी अर्क 5 टक्के फवारणी करावी. केळीचे घड पॉलीप्रोपीलीन पिशवीने घट्ट झाकावे, असे आवाहन नांदेडचे उप विभागीय कृषि अधिकारी आर. टी. सुखदेव यांनी केले आहे. 

00000

 

दिव्यांगमित्र संकेतस्थळावर केलेल्या

अर्जदारांनी प्रत्यक्ष त्रुटीची पुर्तता करावी    

नांदेड (जिमाका) दि. 14 :- दिव्यांगमित्र संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज केलेल्या काही लाभार्थ्यांचे अर्ज अपूर्ण व त्रुटीत असल्याचे आढळून आली आहेत. अशा लाभार्थ्यांनी पंचायत समिती, गटविकास अधिकारी यांचे कार्यालयात प्रत्यक्ष जावून कागदपत्रांची पुर्तता करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी तेजस माळवतकर यांनी केले आहे. 

जिल्हा परिषदेच्या स्वउत्पनातून दिव्यांग व्यक्तीचे कल्याण व पुर्नवसन करणे तसेच त्यांच्या वैयक्तीक कल्याणकारी योजनेसाठी 5 टक्के निधी राखीव ठेवण्यात येतो. त्यात सन 2020-21 या वर्षासाठी दिव्यांगमित्र या संकेतस्थळावर ज्या लाभार्थ्यांना 5 टक्के स्थानिक निधीच्या लाभ योजनेसाठी ऑनलाईन अर्ज पंचायत समिती, गटविकास अधिकारी स्तरावर केली होती. त्यातील बरेचसे लाभार्थ्यांचे अर्ज अपूर्ण व त्रुटीत असल्याचे आढळून आली आहेत. त्या लाभार्थ्यांनी अर्जाच्या त्रुटीची पुर्तता करुन परिपूर्ण अर्ज सादर करणार नाहीत त्यांची सर्वस्वी जवाबदारी संबंधित लाभार्थ्यांची राहील असेही आवाहन जिल्हा परिषद समाज कल्याण कार्यालयाने केले आहे.

00000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...