वृत्त क्र. 456
निर्यातक्षम द्राक्षबागांची
ग्रेपनेटद्वारे नोंदणी करण्याचे आवाहन
नांदेड (जिमाका) दि. 14 :- द्राक्ष बागायतदारांनी सन 2020-21 साठी निर्यातक्षम बागाची नोंदणी व नुतनीकरण करण्याकरिता कृषी विभागाच्या कृषी सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे संपर्क साधून अर्ज करावेत. ग्रेपनेटव्दारे नोंदणी करण्याची अंतिम मुदत 29 नोव्हेंबर असून कृषि विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयाशी संपर्क करुन विहीत मुदतीत नोंदणी व नुतनीकरण करण्याचे आवाहन संचालक फलोत्पादन यांनी केले आहे.
सन 2019-20 मध्ये 33 हजार 451 निर्यातक्षम बागांची नोंदणी झाली आहे. निर्यातक्षम द्राक्षबागाचे नुतनीकरणासाठी फक्त अर्ज करण्याची गरज आहे. तर नव्याने नोंदणीसाठी विहीत नमुन्यातील अर्ज, सातबारा, 8-अ, बागेचा नकाशा व 50 रुपये नोंदणी शुल्क आवश्यक आहे.
किडनाशक उर्वरीत अंश व किडरोगांची हमी देण्यासाठी
ग्रेपनेटव्दारे निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी करण्यात येते. सन 2020-21
साठी निर्यातक्षम द्राक्ष बागाची युरोपियन युनियन व इतर देशांना देखील नोंदणी
बंधनकारक करण्यात आलेले आहे. त्यातील सुचनेनुसार आवश्यक असलेले अनेक्झर-5, (केंद्रीय
किटकनाशक मंडळ व नोंदणी समिती यांनी द्राक्ष पिकांसाठी कायदेशीर प्रमाणीत केलेल्या
औषधांची यादी) व
अनेक्झर-9 (द्राक्ष पिकाकरीता सन 2020-21 या हंगामासाठी वापरण्याच्या कृषि
औषधांची यादी) अंतिम करुन ग्रेपनेट
प्रणालीवर 20 ऑगस्ट 2020 रोजी प्रसिध्द
केली आहे. निर्यातक्षम बागा नोंदणी करीता ग्रेपनेट ही ऑनलाईन प्रणाली 8 ऑक्टोंबर पासून
कार्यान्वित करण्यात आली आहे, असेही आवाहन संचालक फलोत्पादन यांनी केले
आहे.
0000
No comments:
Post a Comment