प्रधानमंत्री पिकविमा योजनेअंतर्गंत खरीप पिकांचे नुकसान झाल्यास
पिकविमा कंपनीस कळविण्याचे आवाहन
नांदेड (जिमाका)
दि. 14 :- जिल्ह्यात ऑक्टोंबर महिन्यातही सर्वत्र
पाऊस होत आहे. खरीप पीक कापणी हंगाम नेमका अंतिम टप्प्यात असून काही ठिकाणी
शेतकऱ्यांनी पिके काढून गोळा न करता शेतातच वाळविण्यासाठी ठेवलेले आहेत. तर काही
शेतकऱ्यांचे पीक शेतात उभे आहे. मागील दोन-तीन दिवसात झालेल्या पावसामुळे ज्या
शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे व ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा
उतरविला आहे. त्यांनी विम्यासाठी पुढील प्रक्रिया करणे आवश्यक आहे. अधिसूचित
केलेल्या पीक व क्षेत्रातील शेतात पिकाच्या कापणीपासून 14 दिवसांच्या आत गारपीट,
चक्रीवादळ, अतिवृष्टी, ढगफुटी व अवकाळी पाऊस यामुळे झालेल्या नुकसानीचे वैयक्तिक
स्तरावरुन केलेले पंचनामे नुकसानीस ग्राह्य धरता येतात. यासाठी शेतकऱ्यांनी असे
कोणाबाबत घडले असल्यास 72 तासाच्या आत याबाबत सूचना विमा कंपनीस किंवा महसूल /
कृषि विभागास देणे बंधनकारक आहे. यामध्ये नुकसान कळवितांना सर्वेनंबर व
नुकसानग्रस्त तपशील कळविणे हे बंधनकारक आहे. प्राप्त झालेल्या सुचनेवर संयुक्त
समिती शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या क्षेत्राची पाहणी करेल. या पाहणी पथकात विमा
कंपनी प्रतिनिधी, कृषी अधिकारी व संबंधित शेतकरी यांचा समावेश असेल.
ज्या
शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांनी जवळच्या माहिती असलेल्या व्यक्तीकडून
गुगल प्ले-स्टोअरवरील क्रॉप ईन्शुरन्स हे ॲप डाऊनलोड करुन घ्यावे. त्यानंतर आपल्या
नुकसानीची माहिती त्यात द्यावी. ज्या शेतकऱ्यांना हे शक्य नसेल त्यांनी 18001035490
या टोल फ्री क्रमांकावर किंवा agri.support@iffcotokio.co.in या ई-मेलवर अथवा कृषि व महसुल विभागास याबाबत
माहिती कळवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
0000
No comments:
Post a Comment