Tuesday, November 14, 2017

श्री खंडेरायाच्या माळेगाव यात्रेसाठी
काटेकोर सुनियोजन करा
- अशोक शिनगारे
नांदेड, दि. 14 :- श्रीक्षेत्र माळेगाव येथील श्री खंडेरायाची यात्रा 16 ते 20 डिसेंबर 2017 कालावधीत भरणार आहे. या यात्रेत कृषि-प्रदर्शन, पशू-प्रदर्शन यांच्यासह कुस्ती स्पर्धेसह विविध कार्यक्रम होणार आहेत. त्यासाठी नेमके आणि यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी सुविधा मिळाव्यात यासाठी सुनियोजन करा, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांनी आज येथे दिले. यात्रेच्या पुर्वतयारीसाठी जिल्हा स्तरीय नियोजनाच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शांताबाई पवार जवळगावकर होत्या. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात बैठक संपन्न झाली.  
बैठकीस आमदार प्रताप पाटील चिखलीकर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष समाधान जाधव, शिक्षण व आरोग्य समिती सभापती माधव मिसाळे, समाज कल्याण सभापती श्रीमती शिला निखाते, कृषि व पशुसंवर्धन समिती सभापती दत्तात्रय रेड्डी, महिला व बालविकास समितीचे सभापती श्रीमती मधुमतीताई देशमुख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नईमोदिन कुरेशी, पदाधिकारी, विविध विभागाचे अधिकारी आदींची उपस्थिती होती.
 बैठकीत पाणी पुरवठा, पोलीस बंदोबस्त, पशुसंवर्धन, कृषि, बांधकाम, शिक्षण आरोग्य, महावितरण, आदी विभागांच्या जबाबदाऱ्या व सहभागाबाबत पुर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. पशू प्रदर्शन यावर्षीही भव्य आणि सुनियोजितपणे होईल यासाठी नियोजित करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शिनगारे म्हणाले की, यात्रेसाठी समन्वयाने आणि वेळेत नियोजन करा. प्रत्येक विभागाला सोपविलेले काम आणि त्याची अमंलबजावणी चोखपणे करा, या यात्रेची परंपरा फार मोठी आहे. दक्षिण भारतातील महत्त्वाची यात्रा आहे. त्यामुळे या यात्रेद्वारे पशू-प्राण्यांचे प्रदर्शन आणि त्यांच्या जाती-प्रजातींचे जतन करण्याचे काम होते. त्यामुळे या सर्व घटकांचा विचार करून नियोजन करा. विशेषतः आरोग्य सुविधा आणि स्वच्छतेविषयी दक्ष रहण्याचे निर्देश त्यांनी दिले.
आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी वीज व्यवस्था, अग्निशमन दलाच्या वाहनांची व्यवस्था आणि पोलीस बंदोबस्ताबाबतचा आढावा घेण्यात आला.  आरोग्य विभागाकडून चोवीत तास तीन पाळ्यांमध्ये वैद्यकीय पथकांची नियुक्ती तसेच पुरेसा औषधसाठा, तीन रुग्णवाहिका, 108 रुग्णवाहिका उपलब्ध राहतील असे नियोजन करण्यात आले आहे.
बैठकीत माळेगाव ग्रामपंचायतीचे सदस्यांसह जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य आदींसह उपस्थिती नागरिकांनाही चर्चेत भाग घेतला व सूचना केल्या.              

0000000
नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा
अर्जासाठी 25 नोव्हेंबरची मुदत
अर्ज ऑनलाईन, ऑफलाईन पद्धतीने करता येणार   
नांदेड दि. 14 :- शंकरनगर येथील जवाहर नवोदय विद्यालयातील सन 2018 साठी इयत्ता 6 वी प्रवेशाचे अर्ज ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने शनिवार 25 नोव्हेंबर 2017 पर्यंत जमा करता येतील. संबंधीत मुख्यापक, शिक्षक व पालकांनी जास्तीतजास्त विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज त्वरीत जमा करावे, असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य हरिवरा प्रसाद यांनी केले आहे.
जिल्ह्यातील तालुकानिहाय अधिकृत सेतु केंद्राच्या माध्यमातून ऑनलाइन प्रवेश अर्ज करता येतील. तसेच संबंधीत शाळा मुख्याध्यापकांनी शाळेतील ऑफलाइन प्रवेश अर्ज जवाहर नवोदय विद्यालय शंकरनगर येथे ऑनलाईन करण्यासाठी त्वरीत जमा करावेत. प्रवेशासाठी अर्ज www.jnvnanded.com, या विद्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.  ही प्रवेश परीक्षा 10 फेब्रुवारी 2017 रोजी जिल्ह्यात घेण्यात येणार आहे, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे.  
000000




 ग्रंथोत्सवा शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा
नांदेड दि. 14 :- शालेय विद्यार्थ्यांचा ग्रंथोत्सवामध्ये सहभाग असावा यासाठी माध्यमिक स्तरावरील शालेय विद्यार्थ्यांसाठी "मानवी जीवनात ग्रंथाचे महत्व" या विषयावर 2 हजार शब्दमर्यादेत निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धकांनी निबंध शनिवार 18 नोव्हेंबर 2017 पर्यंत स्पर्धेचे संयोजक वसंतनगर येथील राजर्षी शाहू विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ. सुरेश सावंत यांचेकडे पाठवावेत. या स्पर्धेमध्ये जास्तीतजास्त स्पर्धकांनी भाग घ्यावा, असे आवाहन ग्रंथोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.
नांदेड जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्यावतीने "नांदेड ग्रंथोत्सव 2017" चे आयोजन 22 23 नोव्हेबर 2017 रोजी करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवामध्ये ग्रंथप्रदर्शन, ग्रंथविक्री इतर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र, ग्रंथ रोख रक्कम देण्यात येणार आहे. यामध्ये प्रथम विजेत्यांना 500 रुपये, द्वितीय 400 रुपये, तृतीय 300 रुपये दोन उत्तेजनार्थक विजेत्यांना प्रत्येकी 200 रुपयाचे बक्षिस देण्यात येईल, अशी माहिती  ग्रंथोत्सव समन्वय समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांनी दिली.   

000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...