ग्रंथोत्सवात शालेय
विद्यार्थ्यांसाठी निबंध
स्पर्धा
नांदेड
दि. 14 :- शालेय विद्यार्थ्यांचा
ग्रंथोत्सवामध्ये सहभाग असावा यासाठी
माध्यमिक स्तरावरील शालेय विद्यार्थ्यांसाठी "मानवी जीवनात
ग्रंथाचे महत्व" या
विषयावर 2 हजार शब्दमर्यादेत निबंध स्पर्धेचे आयोजन
करण्यात आले आहे. स्पर्धकांनी
निबंध शनिवार 18 नोव्हेंबर 2017 पर्यंत स्पर्धेचे
संयोजक वसंतनगर येथील राजर्षी शाहू
विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ. सुरेश
सावंत यांचेकडे पाठवावेत. या स्पर्धेमध्ये
जास्तीतजास्त स्पर्धकांनी भाग
घ्यावा, असे आवाहन
ग्रंथोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष
तथा जिल्हाधिकारी अरुण
डोंगरे यांनी केले
आहे.
नांदेड जिल्हा
ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्यावतीने "नांदेड ग्रंथोत्सव 2017"
चे आयोजन 22 व 23 नोव्हेंबर
2017 रोजी करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवामध्ये ग्रंथप्रदर्शन, ग्रंथविक्री व इतर
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र, ग्रंथ
व रोख रक्कम देण्यात येणार
आहे. यामध्ये प्रथम विजेत्यांना 500 रुपये, द्वितीय 400 रुपये, तृतीय 300 रुपये व दोन उत्तेजनार्थक
विजेत्यांना प्रत्येकी 200 रुपयाचे बक्षिस देण्यात येईल, अशी माहिती ग्रंथोत्सव
समन्वय समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा ग्रंथालय अधिकारी
सुनील हुसे यांनी
दिली.
000000
No comments:
Post a Comment