Thursday, February 22, 2024

 वृत्त क्रमांक 161

 

विभागीय नमो महारोजगार मेळावा

आणि करिअर मार्गदर्शन शिबिराचे आज होणार उद्घाटन

• आज ‘करिअर कट्टा’ आणि नारीशक्ती परिसंवाद व चर्चासत्र

• युवक-युवतींना करिअरच्या वाटा दाखविण्यासाठी विशेष उपक्रम

नांदेड, दि. 22 (जिमाका): राज्य शासनामार्फत लातूर येथे आयोजित करण्यात आलेल्या विभागस्तरीय नमो महारोजगार मेळावा आणि करिअर मार्गदर्शन शिबिराचे आज, 23 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 3 वाजता उद्घाटन होत आहे. लातूर शहरातील बार्शी रोडवरील शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन समोरील मैदानात आयोजित मेळाव्यात आज ‘करिअर कट्टा’ व नारीशक्ती परिसंवादाचा विशेष कार्यक्रम पार पडणार आहे. लातूर येथे होणाऱ्या विभागस्तरीय मेळाव्यात महिलांसाठी परिसंवाद आणि तरुणांसाठी करिअर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यामुळे या मेळाव्याचा लाभ मराठवाड्यातील अधिकाधिक युवक-युवतींनी घ्यावा, असे आवाहन राज्याचा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि लातूर जिल्हा प्रशासनाने केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आभासी पद्धतीने या मेळाव्याचे उद्घाटन होणार आहेत. तसेच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही आभासी पद्धतीने कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून उपस्थिती राहणार आहेत. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार, ग्रामविकास मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, कृषिमंत्री धनंजय मुंडे, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, कौशल्य व रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार सुधाकर शृंगारे, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यासह आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण, आमदार सुरेश धस, आमदार रमेश कराड, आमदार अमित देशमुख, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार बाबासाहेब पाटील, आमदार धीरज देशमुख, आमदार अभिमन्यू पवार यांची उपस्थिती राहणार आहे.

आज करिअर मार्गदर्शन शिबिरात....

करिअरच्या वाटा दाखविणारे दिनेश पवार यांचे मार्गदर्शन

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘करिअर कट्टा’ या उपक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा. दिनेश पवार हे करिअर विषयक नव्या संधींबाबत मार्गदर्शन करणार आहेत. ‘चला करिअरचा मार्ग धरू’, ‘युवक विश्व बदलण्याची शक्ती’ आदी विषयांवरील व्याख्याते, तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक अशी त्यांची ओळख आहे. दहावी, बारावीनंतर कोणकोणत्या क्षेत्रात करिअरच्या योग्य संधी आहेत, याबाबत दिनेश पवार यांचे हे मार्गदर्शन युवक-युवतींसाठी बहुमुल्य ठरणार आहे.

खास महिलांसाठी ‘नारीशक्ती परिसंवाद व चर्चासत्र’

करिअर मार्गदर्शन शिबिरामध्ये 23 फेब्रुवारी रोजी महिलांसाठी स्वतंत्र परिसंवाद व चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये वैद्यकीय, शिक्षण, व्यवसाय, उद्योग, प्रशासन यासारख्या विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामिगिरी करीत असलेल्या महिलांचा सहभाग राहणार आहे. या क्षेत्रामध्ये उपलब्ध असलेल्या रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी याविषयी याद्वारे मार्गदर्शन केले जाणार आहे. युवतींसाठी हा परिसंवाद अतिशय महत्वाचा असून त्यांच्या त्यांच्या भविष्यातील करिअरसाठी उपयुक्त ठरणार आहे.

‘करिअर कट्टा’चे उत्तम गायकवाड देणार रोजगार, स्वयंरोजगाराचे धडे

केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालय अंगीकृत कंपनी एजुकेशनल कंसल्टेंट्स इंडिया लिमिटेड अर्थात एडसिल कंपनीचे महाव्यवस्थापक असलेले उत्तम गायकवाड यांचे मार्गदर्शन या शिबिरामध्ये लाभणार आहे. रोजगाराच्या आणि स्वयंरोजगाराच्या संधीविषयी ते माहिती देणार आहेत.

मराठवाड्यातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी

विभागस्तरीय नमो महारोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे : ना. मंगल प्रभात लोढा

 लातूर येथे 23 व 24 फेब्रवारी 2024 रोजी होणाऱ्या विभागस्तरीय नमो महारोजगार मेळावा आणि करिअर मार्गदर्शन शिबिरात उद्योग, कृषीपूरक उद्योग, स्वयंरोजगार, कर, माहिती व तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) याविषयांतील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. तसेच 24 फेब्रुवारी 2024 रोजी भव्य नमो महारोजगार मेळावा होणार आहे. तरी https://nmrmlatur.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करून मराठवाड्यातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी विभागस्तरीय नमो महारोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन कौशल्य व रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले आहे.

00000

विशेष लेख

चला लातूरला ! नमो महारोजगार मेळाव्याला !!

चला लातूरला ! नमो महारोजगार मेळाव्याला !!

शासनाच्या रोजगार मेळाव्यातून काय मिळणार हा अनेक वेळा प्रश्न उपस्थित केला जातो. मात्र याचे उत्तर राज्य शासनाच्या या अभियानाला नागपूरमध्ये मिळालेल्या प्रतिसादात आहे. दोन दिवसांच्या मेळाव्यामध्ये 11 हजार सुशिक्षित बेरोजगारांना वेगवेगळ्या ठिकाणी नेमणूक देण्याची किमया नागपूरच्या नमो रोजगार मेळाव्याने केली आहे. त्यामुळे २३ व २४ फेब्रुवारीला लातूरला होणाऱ्या दोन दिवसीय मेळाव्याचे निमंत्रण प्रत्येक सुशिक्षित बेरोजगाराने स्वीकारणे आवश्यक आहे. रोजगार मेळाव्यात प्रत्येकाला नोकरी मिळणे शक्य नसते. प्रत्येकाला संधी मिळणेही शक्य नसते. मात्र या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यामागे शासनाचा वेगळा उद्देश आहे. संधी सोबतचसंधी कशा पद्धतीने मिळू शकतेतसेच ही संधी मिळवण्यासाठी काय करावे लागते याचे मार्गदर्शन थोडक्यात याचा वस्तुपाठ या ठिकाणी घातला जाणार आहे. त्यामुळे नुसत्या भेटीने देखील बरेच काही पदरात पडण्याची शक्यता आहे.

शासकीय नोकऱ्यांचा अभाव आणि सुशिक्षित बेरोजगारांची वाढती संख्या लक्षात घेता राज्य शासनाच्या कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता विभागाने आपल्या धोरणांमध्ये आमुलाग्र बदल केला आहे. नोकर भरतीची मर्यादा आहे. शासकीय नोकरीही मर्यादित स्वरूपात आहे. त्यामुळे खाजगी क्षेत्र आता या विभागाला खुणावू लागले आहे. राज्य शासनाने आपल्या नव्या धोरणात या बाबीचा देखील अंतर्भाव केला आहे.

नागपूरने रचला इतिहास

नागपूरमध्ये कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत राज्यस्तरीय नमो महारोजगार मेळावा व 10 डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यामध्ये बँकिंगलॉजिस्टिक्ससेल्समार्केटिंगइन्शुरन्समॅन्युफॅक्चरिंगहॉस्पिटलिटीकम्युनिकेशनअपारंपारिक ऊर्जाआरोग्य सेवा इत्यादी क्षेत्रातील एकूण 340 प्रतिष्ठित कंपन्यांनी सहभाग नोंदविला होता. त्यामुळेच 11 हजार युवकांना रोजगार उपलब्ध करण्याची किमया या ठिकाणी करता आली.

राज्य शासनाचा उद्देश

राज्य शासनाने अशा पद्धतीचे मेळावे आयोजित करण्यासाठी वाढीव निधी देखील मंजूर केला आहे. आता प्रतिमेळावा पाच कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. एका वर्षात सहा महारोजगार मेळावे आयोजित करण्याचे राज्य शासनाचे उद्दिष्ट आहे. सर्व महसूल विभागात प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण सहा नमो महारोजगार मेळावे आयोजित केले जाणार आहे. छत्रपती संभाजी नगर महसूल विभागात नागपूर नंतर आता लातूर येथे हा मेळावा होत आहे. शासनाने यासाठी सरळ सरळ दोन लाख उमेदवारांना वर्षभरात रोजगार उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट विभागाला दिले असून त्यासाठी महत्त्वाच्या कंपन्यांशी मोठ्या प्रमाणात संपर्क केला जात आहे. या कंपन्यामधल्या प्रत्येक जागा राज्य शासनामार्फत भरल्या जातील असा प्रयत्न शासन करत आहे. यासाठी मुख्यमंत्री सचिवालयामध्ये मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष उघडण्यात आला असून त्यामार्फत समन्वय साधला जात आहे.

नमो महारोजगार मेळाव्याचे कार्यक्रम

नमो महारोजगार मेळाव्याच्या मार्फत खालील कार्यक्रम प्रामुख्याने राबविण्यात येतात. याची अंमलबजावणी केली जाते. त्यामुळे युवकांनी या ठिकाणी पोहोचणे आवश्यक आहे. यामध्ये मुलाखत पूर्व व करियर मार्गदर्शन करणेयाकरिता तज्ञ मार्गदर्शकांमार्फत मार्गदर्शन केल्या जाते. रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सहाय्य करणेहा दुसरा उद्देश ठेवण्यात आला आहे. तिसरा जो उद्देश आहे तो उमेदवारांना कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नाविन्यता संबंधित विविध योजनांची माहिती देणेमार्गदर्शन करणेहा आहे चौथा प्रमुख उद्देश आहे. अल्प कालावधीच्या प्राथमिक प्रशिक्षण अभ्यासक्रमाबाबत मार्गदर्शन करणेज्या भागात ज्या उद्योग व्यवसायाला अधिक मागणी आहे. त्या पद्धतीच्या अभ्यासक्रमांना चालना देण्याचा व त्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करण्याचा शासनाचा आणखी एक उद्देश आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या लातूर येथील नमो महारोजगार मेळाव्याला जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या व्होकेशनल कोर्सेससाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

विभागस्तरावरील या मेळाव्यात सर्वाधिक उपस्थिती नांदेड जिल्ह्याची असावी अशी अपेक्षाही त्यांनी विद्यार्थ्यांकडून केली आहे. या संदर्भातील वेगवेगळ्या सूचना समाज माध्यमातून दिल्या जात आहे यासाठी ऑनलाइन पद्धतीने स्वतःची नोंद करणे आवश्यक आहे. उमेदवारांनी याबाबत जागरूक असावेअसे आवाहनही त्यांनी केले असून मोठ्या संख्येने स्वतःची नोंद करण्याबाबत आग्रह धरला आहे. या ठिकाणी होणाऱ्या विविध मार्गदर्शन सत्राचा लाभ घ्यावातसेच ज्यांनी स्टार्टअप योजना सुरू केल्या अशा यशकथांची मांडणी केलेले अनेक स्टॉल या ठिकाणी उपलब्ध असणार आहे. त्या स्टॉलला भेटी देऊन उद्योग व्यवसायामध्ये भरारी कशी घ्यावी याबाबतचे मार्गदर्शन या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगार युवकांनी ही संधी सोडू नये असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

 

प्रवीण टाके,

जिल्हा माहिती अधिकारी

नांदेड

0000  




वृत्त क्रमांक 160

 वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण

तपासणीच्या वेळेत 1 मार्चपासून बदल

नांदेड (जिमाका) दि. 22 :- नांदेड जिल्ह्यातील तापमानात वाढ होत असून उन्हाळ्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण तपासणीच्या वेळेत 1 मार्च 2024 पासून बदल करण्यात येत आहे. 1 मार्चपासून सकाळी 6 ते दुपारी 1  या वेळेत वाहनाची तपासणी करण्यात येणार आहे. तरी सर्व योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी अपॉईटमेंट घेतलेल्या वाहनचालक, मालक यांनी त्यांचे वाहन योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणाच्या तपासणीसाठी दिलेल्या वेळेत सादर करावेत, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.  

0000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...