Friday, August 15, 2025
वृत्त क्रमांक 862
जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक संपन्न
नांदेड, दि. 15 ऑगस्ट :- कृषी, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्यावतीने निर्देशानुसार जिल्ह्यातील जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक नुकतीच सोमवार 11 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे घेण्यात आली. या बैठकीस विविध बँकेचे प्रतिनिधी तसेच शासकीय अधिकारी उपस्थित होते.
बैठकी दरम्यान जनसमर्थ किसान क्रेडिट कार्ड पोर्टलचा प्रभावी
वापर कसा करावा याबाबत पीपीटी सादरीकरणाद्वारे
सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित सदस्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना समाधानकारक
उत्तरे देण्यात आली. बैठकीत चालू महिन्यात 1 हजार नवीन शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड कर्ज मंजूर करण्याचे उद्दिष्ट निश्चित
करण्यात आले. यासोबतच, केसीसी KCC नूतनीकरण संदर्भात चर्चा करण्यात
आली. तसेच सॅच्युरेशन विषयावर सविस्तर चर्चा व विचारमंथन करण्यात
आले. किसान क्रेडिट कार्ड पोर्टल अंतर्गत सर्व बँकांनी जास्तीत
जास्त कर्ज प्रकरणे करून आपले उद्दिष्ट पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हा अग्रणी व्यवस्थापक बी. जी. सोनकांबळे यांनी यावेळी केले.
0000
वृत्त क्रमांक 861
समस्याग्रस्त
व पीडित महिलांसाठी
18 ऑगस्ट रोजी महिला लोकशाही दिन
नांदेड, दि. 15 ऑगस्ट :- समस्याग्रस्त व पिडीत महिलांसाठी सोमवार 18 ऑगस्ट 2025 रोजी महिला लोकशाही दिन आयोजित केला आहे. या लोकशाही दिनात समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी आपले अर्ज विहित नमुन्यात सादर करावे, असे आवाहन जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी नांदेड व सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
दर महिन्याच्या
तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन घेण्यात येतो. सोमवार 18 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली
महसूल प्रबोधनी प्रशिक्षण केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर
नांदेड येथे महिला लोकशाही दिन होणार आहे. संबंधीत समितीचे सदस्य व शासन निर्णयात नमूद
संबंधित विभागाचे अधिकारी यांनी उपस्थित रहावे, असेही आवाहन सदस्य
सचिव तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000
वृत्त क्रमांक 857
नांदेड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध : पालकमंत्री अतुल सावे
भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ संपन्न
· मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानात सहभाग नोंदविण्याचे आवाहन
· शासन सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी
· शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
नांदेड दि. 15 ऑगस्ट :- केंद्र व राज्य शासनाच्यावतीने समाजातील सर्व घटकांसाठी विविध लोकाभिमुख योजना राबविण्यात येत आहेत. यात प्राधान्याने शेतकरी, सामान्यांच्या हिताच्या योजना राबविण्यावर भर देण्यात येत आहे. सर्वच क्षेत्रात नांदेड जिल्ह्याची वाटचाल प्रगतीशिल असून, जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी शासन सदैव कटिबध्द असल्याचे प्रतिपादन राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे केले. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात बलिदान दिलेल्या सर्वांचे स्मरण करुन त्यांनी यावेळी भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.
भारताच्या 79 वा स्वातंत्र्य दिन समारंभानिमित्त नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रागंणात आज पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. या समारंभास आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंदराव पाटील बोंढारकर, नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांच्यासह लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक त्यांचे वारसदार, माजी सैनिक, विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती, विभाग प्रमुख, नागरिक, विद्यार्थी यांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती.
देशात हर घर तिरंगा हा उपक्रम देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. या उपक्रमात नांदेडकरांनी उर्त्स्फूतपणे सहभाग घेतला. याबद्दल पालकमंत्री यांनी सर्वांचे आभार मानले. जिल्ह्यात पावसाची स्थिती चांगली असून पीक परिस्थिती समाधानकारक आहे. शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची अडचण भासणार नाही याची दक्षता शासनाच्यावतीने घेतली जात असल्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यात लेंडी प्रकल्पामुळे 15 हजार हे. क्षेत्र सिंचनाखाली येणार असून या कामाच्या घळभरणीचे काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पासाठी भूसंपादन केलेल्या 19 गावांतील शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यात रोजगारासोबत उद्योग उभारणीला बळ दिले जात असून युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यावर भर देण्यात येत असल्याची माहिती अतुल सावे यांनी दिली.
जिल्ह्यात विविध विकास कामे प्रगतीपथावर असून विष्णुपूरी येथील ब्रीजचे काम व नवीन न्यायालयाच्या इमारतीचे कामही अंतिम टप्प्यात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यात 112 प्रस्तावित सौर ऊर्जा उपकेंद्रापैकी 70 ठिकाणी 1 हजार 150 एकर जमीन महावितरणला प्रदान करण्यात आली आहे. यासाठी जमिनीची उपलब्धता खूप कमी कालावधी जिल्हा प्रशासनाने केली. त्यामुळे पालकमंत्री अतुल सावे यांनी त्यांचे अभिनंदन केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून प्रामुख्याने काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना त्यांच्या कामगिरीनुसार प्रोत्साहन व कार्यक्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात जास्तीत जास्त प्रमाणात सहभाग नोंदवावा असे आवाहन पालकमंत्री अतुल सावे यांनी केले.
ध्वजारोहणानंतर सलामी देण्यात आली. सलामी पथक कमांडर पोलीस निरीक्षक विजयकुमार धोंडगे यांनी सलामी पथकाचे नेतृत्व केले. पोलीस दलाच्या सलामीनंतर राष्ट्रगीत, राज्यगीत नंतर पालकमंत्री अतुल सावे यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, त्यांचे कुटूंबिय यांची विचारपूस केली. वीरमाता, वीरभगीनी यांच्यासह या विशेष कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांना भेटून शुभेच्छा दिल्या. स्वातंत्र्य सैनिकांचे वारस आदीची उपस्थिती होती.
राष्ट्रपती पदक व विशेष सेवा बजावलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार
पोलीस उपनिरीक्षक धोंडीबा माधवराव भुत्ते यांना राष्ट्रपती पदक घोषित झाल्याबाबत पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. तर पोलीस उपनिरीक्षक संकेत सवराते, शिवराज लोखंडे, महाजन राजेश्वर मैसनवार, शंकर धनाजीराव मोरे, अभिजीत गणेशराव तुतुरवाड, खंडु चांदु दर्शने यांना विशेष सेवेबाबत सत्कार करण्यात आला.
अवयवदान केलेल्या कुटूंबियाचा सत्कार
श्रीमती चंद्रकला प्रल्हाद रावळकर, श्रीमती भाग्यश्री संतोष मोरे, श्रीमती सोनाली भुजंग मस्के, श्रीमती लक्ष्मीबाई दादाराव पवळे, श्रीमती शोभा सूर्यकांत साधू, श्रीमती प्रिया अभिजीत ढोके, श्रीमती अरुणा विठ्ठल भुरके यांचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी पूर्व प्राथमिक राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षा, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा, सीबीएससी गुणवंत विद्यार्थ्यांस पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
00000वृत्त क्रमांक 860
शेतकऱ्यांनी वेळीच करा सोयाबीन पिकावरील विषाणूजन्य मोझॅक (केवडा) रोगाचे व्यवस्थापन
-जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत
नांदेड दि. 15 ऑगस्ट :-गेल्या काही वर्षात सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक तसेच काही ठिकाणी हिरवा मोझॅक म्हणजेच केवडा रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. पिवळा मोझॅक या रोगाचा जास्त प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात उत्पन्नात घट येऊन आर्थिक नुकसान झाले होते. पिवळा मोझॅक हा रोग मुंगबीन यलो मोझॅक वायरस (MYMV) या विषाणुंमुळे होतो तर हिरवा मोझॅक हा सोयाबीन मोझॅक वायरस (SMV) या विषाणूमुळे होतो. कडधान्य आणि तणे ही या रोगाची पर्यायी यजमान पिके आहेत. यावर्षीच्या हंगामात बऱ्याच ठिकाणी सोयाबीनच्या शेतामध्ये काही झाडे अचानक विशिष्ट प्रकारे पिवळी पडलेली दिसून येत आहेत, ही पिवळी पडलेली झाडे म्हणजेच पिवळा मोझॅक (केवडा) या विषाणूजन्य रोगाने प्रादुर्भावग्रस्त झालेली झाडे आहेत. तसेच काही ठिकाणी हिरवा मोझॅक या रोगाचा प्रादुर्भाव ही झालेला दिसून येतो आहे. या विषाणूजन्य रोगामुळे सोयाबीनमध्ये 15 ते 75 टक्के पर्यंत उत्पादनात घट येऊ शकते.
रोगाची लक्षणे
हिरवा मोझॅक:- यामध्ये झाडाची पाने ही जाडसर,आखूड तसेच कडक होतात व खालच्या बाजूने सुरकुतलेली किंवा मुरगळलेली असतात. पाने साधारण पानांपेक्षा जास्त गर्द हिरव्या रंगाची दिसतात. प्रादुर्भावामुळे झाडाची वाढ खुंटते. हा विषाणू बियाणे व पानातील रसामार्फत पसरतो आणि हा प्रसार मुख्यतः मावा या रसशोषक किडीद्वारे केला जातो.
पिवळा मोझॅक:- सोयाबीनच्या पानाच्या मुख्य शिरीपाशी विखुरलेल्या अवस्थेत पिवळ्या रंगाचे चट्टे अथवा अनियमित पट्टे दिसतात त्यानंतर पाने जसे जसे परिपक्व होत जातात तसे तसे त्यावर गंजलेले तांबूस रंगाचे चट्टे दिसतात काही वेळा जास्त प्रादुर्भाव असल्यास पाने अरुंद होतात व मुरगळतात.लहान अवस्थेत प्रादुर्भाव झाल्यास पूर्ण झाड पिवळे पडते. हा विषाणू पानातील रसामार्फत पसरतो आणि हा प्रसार मुख्यतः पांढऱ्या माशी या रसशोषक किडीद्वारे केला जातो.
नुकसानीचा प्रकार
दोन्ही प्रकारच्या मोझॅकमुळे झाडाच्या अन्न निर्मिती प्रक्रियेमध्ये बाधा होऊन अशा प्रादुर्भावग्रस्त झाडांना कालांतराने फुले आणि शेंगा कमी लागतात किंवा त्यातील दाण्यांचा आकार लहान राहतो किंवा संपूर्ण शेंगा दाणे विरहीत राहून पोचट होतात आणि पर्यायाने उत्पन्नात मोठी घट येते. तसेच दाण्यांमधील तेलाचे प्रमाण घटते तर प्रथिनांच्या प्रमाणात वाढ होते. त्यामुळे वेळीच या रोगाला ओळखून तसेच मावा व पांढऱ्या माशीचे नियंत्रण करून या रोगाचे व्यवस्थापन करावे.
सोयाबीनवरील मावा,पांढरी माशी आणि मोझॅक विषाणूचे एकात्मिक व्यवस्थापन खालील प्रमाणे करावे-
काही सोयाबीन पिकाचे वाण या रोगास लवकर आणि जास्त प्रमाणात बळी पडतात. त्यामुळे या रोगास बळी पडणाऱ्या वाणाची लागवड न करता आपल्या भागात विद्यापीठाद्वारे शिफारस केलेल्या सोयाबीन वाणांचीच लागवड करावी. पेरणीस निरोगी बियाण्याचाच वापर करावा. लागवडीनंतर वेळोवेळी पिकाचे कीड व रोगांसाठी निरीक्षण आणि सर्वेक्षण करावे जेणेकरून रोगाला वेळीच ओळखून लवकरात लवकर उपाययोजना केल्यास फायदा होईल.
मोझॅक(केवडा) झालेली प्रादुर्भावग्रस्त पाने, झाडे दिसून येताच ती वेळोवेळी तात्काळ समूळ काढून बांधावर न फेकता जाळून अथवा जमिनीत पुरून नष्ट करावीत जेणेकरून निरोगी झाडांवर होणारा किडीचा व रोगांचा प्रसार कमी करणे शक्य होईल.
रोगाच्या प्रसारास कारणीभूत असलेल्या मावा व पांढऱ्या माशीच्या व्यवस्थापनासाठी पिकावर रोगाची लक्षणे दिसताच किंवा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून असिटामीप्रिड 25% + बायफेफेंथ्रिन 25 % डब्ल्युजी @ 250 ग्रॅम किंवा डायफेनथ्यूरॉन 47.80 % एससी @ 500 मिली किंवा फ्लोनीकामिड 50.00 % डब्ल्युजी @ 200 ग्रॅम यापैकी एका कीटकनाशकाची 500 लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारणी करावी. पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पिकामध्ये प्रति एकरी 10 पिवळे चिकट सापळे लावावेत.फवारणीसाठी कीटकनाशकाची व पाण्याची शिफारस केलेली मात्राच वापरावी. नत्रयुक्त खताचा अतिरिक्त वापर टाळून शिफारसीनुसारच करावा. मूग,उडीद यासारख्या पर्यायी खाद्य वनस्पतीवरून पिवळा मोझॅक रोगाचा प्रसार होण्यापासून रोखण्यासाठी अशा पिकावरील पांढरी माशीचे व्यवस्थापन करावे. कमीत कमी पहिले 45 दिवस पीक तणमुक्त ठेवावे. पावसाचा ताण पडल्यास पिकास संरक्षित पाणी द्यावे.
बिगर हंगामी सोयाबीनची लागवड शक्यतो टाळावी जेणेकरून किडीच्या जीवनक्रमात खंड पडतो आणि पुढील हंगामात पर्यायाने किडींचा प्रादुर्भाव कमी राहतो. मावा व पांढऱ्या माशीच्या व्यवस्थापनासाठी आवश्यकता वाटल्यास दहा दिवसानंतर परत एकदा कीटकनाशकांची फवारणी करावी. वरील कीटकनाशका सोबत कुठल्याही प्रकारचे इतर कीटकनाशके, बुरशीनाशके, विद्राव्य खते, सूक्ष्म मूलद्रव्ये अथवा रसायने मिसळू नये. मिसळून फवारणी केल्यास पिकाला अपाय होऊ शकतो तसेच कीडनाशकांचा अपेक्षित परिणामही दिसून येत नाही त्यामुळे ती आवश्यकतेनुसार वेगळी वेगळी फवारावी. तसेच लागोपाठ एकच एक कीटकनाशक वांरवार फवारू नये.
फवारणी करिता दुषित पाणी न वापरता स्वच्छ पाणी वापरावे आणि पाण्याचे प्रमाण शिफारसितच वापरावे, कमी पाणी वापरल्यास फवारणीचे अपेक्षित परिणाम दिसून येत नाही. किडनाशके फवारणी करताना योग्य ती संरक्षक विषयी काळजी घ्यावी. अधिक माहितीसाठी संपर्क करा कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी 02452-229000 / व्हाटस्अप हेल्पलाईन-8329432097.
0000
वृत्त क्रमांक 859
गुणवत्तेसोबतच सुरक्षित शहर म्हणून नांदेडचा लौकिक - पालकमंत्री अतुल सावे
महिला व मुलीच्या सुरक्षिततेसाठी ॲपचे उदघाटन
पोलीस प्रशासनामार्फत नागरिकांच्या सुरक्षितेसाठी विविध उपक्रम
विद्यार्थ्यांनी शांतता व शिस्त पाळावी
नांदेड दि. 15 ऑगस्ट :- नांदेड शहर एक एज्युकेशन हब म्हणून ओळखले जात आहे. मराठवाड्यासह राज्यभरातून येथे शिक्षणासाठी विद्यार्थी येत आहेत. शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना शहरात सुरक्षित, निर्भय वातावरण मिळावे यासाठी पोलीस प्रशासनाच्यावतीने विविध उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून गुणवत्तेसोबत सुरक्षित शहर म्हणून नांदेडचा लौकिक निर्माण होईल, असा विश्वास पालकमंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केला.
आज कोनाळे कोचिंग क्लासेस येथे जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयानी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंदराव पाटील बोंढारकर, नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, कोचिंग क्लासेसचे आर.बी.जाधव, विद्यार्थी यांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती.
राज्यभरातून नीट, जेईई या शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी मोठया प्रमाणात विद्यार्थी नांदेड शहरात येत आहेत. विद्यार्थी, महिला व मुलींना शहरात सुरक्षीततेची भावना, निर्भय वातावरण देण्याची जबाबदारी सर्वाची असून यासाठी विद्यार्थ्यांनी पोलीस विभागाशी समन्वय ठेवून सहकार्य करावे. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील यासाठी काळजी घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री अतुल सावे यांनी केले. विद्यार्थी हे देशाचे भविष्य असून त्यांनी शांतता व शिस्त पाळली पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले. नागरिकांना आता पोलीस स्टेशनला न जाता असेल तेथून मोबाईवरुन तक्रार नोंदविता येणार आहे. तक्रार नोंदविण्यासाठी ९० ५० १०० १०० हा हेल्पलाईन क्रमांकाचे उदघाटन आज त्यांच्या हस्ते झाले.
नांदेड शहराची शैक्षणिक प्रगती झपाटयाने होत असून ५० हजारहून अधिक विद्यार्थी शहरात शिक्षणासाठी वास्तव्यास आहेत. नांदेडची शैक्षणिक गुणवत्ता कौतुकास्पद असून, गुणवत्तेसोबत शहराचे वातावरण निर्भय कसे राहील याचीही काळजी पोलीस विभागामार्फत घेतली जात आहे. यासाठी पोलीस विभाग कुठेही कमी पडणार नाही अशी ग्वाही नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी दिली.
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारीला आळा घालणे, शहराचे वातावरण सुरक्षित कसे राहील यासाठी टोल फ्री क्रमांक ११२ व स्ट्रीट सेफ्टी निर्भया रॅली ॲपचे उदघाटन आज पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर पोलीस विभागाच्यावतीने मान्यवरांच्या हस्ते भव्य स्ट्रीट सेफ्टी निर्भया रॅली काढण्यात आली.
शिक्षणासाठी नांदेडचे स्थान महत्वाचे असून येथील वातावरण निर्भय राहणे आवश्यक आहे. निर्भय वातावरणासाठी पोलीस व जिल्हा प्रशासन, विद्यार्थी यांच्या समन्वयातून आवश्यक त्या उपाययोजना करण्यावर भर देण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन नेहमी तत्पर आहे. नांदेड शहर हे सुरक्षित शहर असुन येथील वातावरण सुरक्षित असल्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र शासनाच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमात नागरिकांसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. नांदेड हे शैक्षणिक दृष्टया महत्वाचे शहर असून येथे नीट व आयआयटीच्या तयारीसाठी राज्यातून विद्यार्थी येत असतात. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांला नांदेड शहरात सुरक्षित वातावरण देणे हे पोलीसांचे कर्तव्य आहे. नांदेड शहर सुरक्षित शहर करण्याच्यादृष्टीने पोलीस विभाग विविध उपक्रम राबवित आहे. यासाठी विद्यार्थी, पालकांनी काहीही अडचणी आल्यास किंवा असुरक्षित वाटल्यास टोल फ्री क्रमांक किंवा ॲपद्वारे क्युआर कोड स्कॅन करुन पोलीसाशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी केले.
०००००
वृत्त क्रमांक 858
तंत्रज्ञानाच्या मदतीने जिल्हा परिषदेच्या पारदर्शक सेवा : पालकमंत्री अतुल सावे
* जिल्हा परिषद नांदेड डिजिटल मित्र पोर्टलचा शुभारंभ
* पोर्टलच्या माध्यमातून नागरिकांना जलद सेवा
* संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्काराचे वितरण
नांदेड दि. 15 ऑगस्ट :- नागरिकांना सुलभ, पारदर्शक आणि जलद सेवा प्राधान्याने देण्यासाठी नांदेड जिल्हा परिषदने “जिल्हा परिषद नांदेड डिजिटल मित्र पोर्टल” सेवा विकसित केली आहे. याचा मला मनस्वी आनंद होत आहे. नांदेड जिल्हा परिषदेने या व्हाट्सअॅप तंत्रज्ञानाच्या मदतीने नागरिकांना पारदर्शक सेवा उपलब्ध करुन दिल्या असल्याचे मत राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केले.
“जिल्हा परिषद नांदेड डिजिटल मित्र पोर्टल” या एकात्मिक माहिती पोर्टलचा शुभारंभ पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंदराव पाटील बोंढारकर, नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप माळोदे यांच्यासह पदाधिकारी, नागरिक, विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हा परिषद ही ग्रामीण विकासाचा कणा असून यापूर्वी नागरिकांसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. या माध्यमातून संपूर्ण राज्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे. केंद्र व राज्य शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या नेतृत्वाखाली सर्व अधिकारी-कर्मचारी प्रयत्नशील आहेत. ही सुविधा केवळ माहितीपुरती मर्यादीत नाही तर पारदर्शकता, वेळेची बचत आणि नागरिकांचा शासनावरील विश्वास वाढवणारी आहे. ग्रामीण भागातील लोकांना आता जिल्हा परिषद कार्यालयात वारंवार चकरा माराव्या लागणार नाहीत. नागरिकांना अधिक वेगवान व पारदर्शक सेवा मिळण्यासाठी या पोर्टलवरील ऑनलाईन सेवा नियमित अद्यावत ठेवण्याची सूचना पालकमंत्री अतुल सावे यांनी केली.
पोर्टलवरील सुविधा
डिजिटल युगात योजना आणि सुविधा थेट नागरिकांच्या मोबाईलवर पोहोचवण्याची गरज होती. हाच विचार पुढे नेऊन जिल्हा परिषद नांदेड डिजिटल मित्र हे पोर्टल विकसित केले आहे. या माध्यमातून कृषी, पशुसंवर्धन, घरकुल, समाज कल्याण, आरोग्य आदी सर्व विभागातील योजनांची माहिती एका क्लिकवर मिळेल. लाभार्थ्यांना ऑनलाईन फॉर्म भरता येतो. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या भेटीची वेळ पोर्टलवरून निश्चित करता येते. योजनांबाबत व्हिडिओ क्लिप सहज पाहता येतील. अर्जाची सद्यस्थिती 48 तासात ऑनलाईन तपासता येते.
डिजिटल मित्र पोर्टलमुळे नांदेड जिल्हा ग्रामीण विकासाच्या डिजिटल क्रांतीत अग्रणी राहील आणि हे पोर्टल इतर जिल्ह्यांसाठी देखील एक आदर्श ठरेल. या उपक्रमाच्या यशासाठी जिल्हा परिषदेतील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पालकमंत्री अतुल सावे यांनी अभिनंदन केले.
दुर्गम भागासह जिल्ह्यातील नागरिकांना सुलभ व जलद सेवा उपलब्ध करुन देण्याचा नांदेड जिल्हा परिषदेचा हा स्तुत्य उपक्रम आहे. या व्हाट्सअॅप सेवेद्वारे आपण शासकीय योजना, अर्जांची स्थिती आणि आवश्यक माहिती सहजपणे मिळवू शकता. घरी बसून एका क्लिकवर सेवा देण्याचा हा नांदेड जिल्हा परिषदेचा प्रयत्न असल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कालवी यांनी प्रास्ताविकात सांगितले. या सेवेचा गैरवापर झाल्यास, पूर्वसूचना न देता क्रमांक सेवा यादीतून वगळला जातो, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्काराचे वितरण
आज या सोहळ्यात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत सन 2023-24 मधील जिल्हास्तरीय पुरस्कारांचे वितरणही झाले. पुरस्कार मिळालेल्या सर्व सरपंच व ग्रामपंचायतीचे पालकमंत्री अतुल सावे यांनी अभिनंदन केले. आपली गावे स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे हीच खरी संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची प्रेरणा आहे. केंद्र आणि राज्य शासनाने राबविलेल्या हर घर तिरंगा-हर घर स्वच्छता उपक्रमात अनेक गावांनी उत्साहाने सहभाग घेतला आहे. यापुढेही आपली गावे स्वच्छ, सुंदर आणि शाश्वत ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन 2023-24 अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्रामपंचायत जिल्हास्तरीय पुरस्कारांचे वितरण पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आले. सन 2023-24 या वर्षासाठी घोषित झालेल्या पुरस्कारांत प्रथम क्रमांक भोकर तालुक्यातील नागापूर ग्रामपंचायतीने मिळवून 6 लाख रुपयांचा पुरस्कार पटकावला तर द्वितीय क्रमांक हिमायतनगर तालुक्यातील जवळगाव ग्रामपंचायतीने मिळवून 4 लाख रुपयांचा पुरस्कार मिळवला. तृतीय क्रमांक कंधार तालुक्यातील चिंचोली प.क. ग्रामपंचायतीला मिळून 3 लाख रुपयांचा पुरस्कार देण्यात आला.
याशिवाय विशेष पुरस्कारांतर्गत स्वर्गीय वसंतराव नाईक पुरस्कार (घनकचरा, सांडपाणी व मैलागाळ व्यवस्थापन) बिलोली तालुक्यातील पाचपिंपळी ग्रामपंचायतीला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार (पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापन) भोकर तालुक्यातील खरबी ग्रामपंचायतीला तर स्वर्गीय आबासाहेब खेडकर पुरस्कार (शौचालय व्यवस्थापन) अर्धापूर तालुक्यातील शेलगाव बु. ग्रामपंचायतीला देण्यात आला. या विशेष पुरस्कारास प्रत्येकी 50 हजार रुपये रोख रक्कम व प्रमाणपत्र देण्यात आले. शेवटी आभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) राजकुमार मुक्कावार यांनी मानले.
0000
वृत्त क्रमांक 857
नांदेड
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध : पालकमंत्री अतुल सावे
भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ संपन्न
·
मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज
अभियानात सहभाग नोंदविण्याचे आवाहन
·
शासन सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी
· शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
नांदेड दि. 15 ऑगस्ट :- केंद्र व राज्य शासनाच्यावतीने समाजातील सर्व घटकांसाठी विविध लोकाभिमुख योजना राबविण्यात येत आहेत. यात प्राधान्याने शेतकरी, सामान्यांच्या हिताच्या योजना राबविण्यावर भर देण्यात येत आहे. सर्वच क्षेत्रात नांदेड जिल्ह्याची वाटचाल प्रगतीशिल असून, जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी शासन सदैव कटिबध्द असल्याचे प्रतिपादन राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे केले. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात बलिदान दिलेल्या सर्वांचे स्मरण करुन त्यांनी यावेळी भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.
भारताच्या 79 वा स्वातंत्र्य दिन समारंभानिमित्त नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रागंणात आज पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. या समारंभास आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंदराव पाटील बोंढारकर, नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांच्यासह लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक त्यांचे वारसदार, माजी सैनिक, विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती, विभाग प्रमुख, नागरिक, विद्यार्थी यांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती.
देशात हर घर तिरंगा हा उपक्रम देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. या उपक्रमात नांदेडकरांनी उर्त्स्फूतपणे सहभाग घेतला. याबद्दल पालकमंत्री यांनी सर्वांचे आभार मानले. जिल्ह्यात पावसाची स्थिती चांगली असून पीक परिस्थिती समाधानकारक आहे. शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची अडचण भासणार नाही याची दक्षता शासनाच्यावतीने घेतली जात असल्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यात लेंडी प्रकल्पामुळे 15 हजार हे. क्षेत्र सिंचनाखाली येणार असून या कामाच्या घळभरणीचे काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पासाठी भूसंपादन केलेल्या 19 गावांतील शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यात रोजगारासोबत उद्योग उभारणीला बळ दिले जात असून युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यावर भर देण्यात येत असल्याची माहिती अतुल सावे यांनी दिली.
जिल्ह्यात विविध विकास कामे प्रगतीपथावर असून विष्णुपूरी येथील ब्रीजचे काम व नवीन न्यायालयाच्या इमारतीचे कामही अंतिम टप्प्यात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यात 112 प्रस्तावित सौर ऊर्जा उपकेंद्रापैकी 70 ठिकाणी 1 हजार 150 एकर जमीन महावितरणला प्रदान करण्यात आली आहे. यासाठी जमिनीची उपलब्धता खूप कमी कालावधी जिल्हा प्रशासनाने केली. त्यामुळे पालकमंत्री अतुल सावे यांनी त्यांचे अभिनंदन केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून प्रामुख्याने काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना त्यांच्या कामगिरीनुसार प्रोत्साहन व कार्यक्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात जास्तीत जास्त प्रमाणात सहभाग नोंदवावा असे आवाहन पालकमंत्री अतुल सावे यांनी केले.
ध्वजारोहणानंतर सलामी देण्यात आली. सलामी पथक कमांडर पोलीस निरीक्षक विजयकुमार धोंडगे यांनी सलामी पथकाचे नेतृत्व केले. पोलीस दलाच्या सलामीनंतर राष्ट्रगीत, राज्यगीत नंतर पालकमंत्री अतुल सावे यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, त्यांचे कुटूंबिय यांची विचारपूस केली. वीरमाता, वीरभगीनी यांच्यासह या विशेष कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांना भेटून शुभेच्छा दिल्या. स्वातंत्र्य सैनिकांचे वारस आदीची उपस्थिती होती.
राष्ट्रपती
पदक व विशेष सेवा बजावलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार
पोलीस उपनिरीक्षक धोंडीबा माधवराव भुत्ते यांना राष्ट्रपती पदक घोषित झाल्याबाबत पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. तर पोलीस उपनिरीक्षक संकेत सवराते, शिवराज लोखंडे, महाजन राजेश्वर मैसनवार, शंकर धनाजीराव मोरे, अभिजीत गणेशराव तुतुरवाड, खंडु चांदु दर्शने यांना विशेष सेवेबाबत सत्कार करण्यात आला.
अवयवदान
केलेल्या कुटूंबियाचा सत्कार
श्रीमती चंद्रकला प्रल्हाद रावळकर, श्रीमती भाग्यश्री संतोष मोरे, श्रीमती सोनाली भुजंग मस्के, श्रीमती लक्ष्मीबाई दादाराव पवळे, श्रीमती शोभा सूर्यकांत साधू, श्रीमती प्रिया अभिजीत ढोके, श्रीमती अरुणा विठ्ठल भुरके यांचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी
पूर्व प्राथमिक राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षा, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा,
सीबीएससी गुणवंत विद्यार्थ्यांस पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते
प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
00000
वृत्त क्रमांक 1277 जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध नांदेड (जिमाका) , दि . 5 :- जिल्हा माहिती कार्यालय , नांदे...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
वृत्त क्रमांक 974 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “ स्वस्थ नारी , सशक्त परिवार ” राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ “ स्वस्थ नारी , ...
-
वृत्त क्रमांक 975 हैद्राबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त जनक्रांती व हुतात्मा संतराम कांगठीकर वाचनालयात भव्य ग्रंथप्रदर्शन नांदेड, दि. 17 सप्...

.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)

.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)