Tuesday, August 18, 2020

 

वृत्त क्र. 774   

आयटीआय उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांसाठी

ऑनलाईन भरती मेळाव्याचे आयोजन

नांदेड (जिमाका) दि. 18 :- नांदेड जिल्हयातील व जिल्ह्याबाहेरील आयटीआय उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांसाठी विविध क्षेत्रामध्ये जसे औद्योगिक, महामंडळ, पॅरामेडीकल सेक्टरमध्ये शिकाऊ उमेदवारांची भरती करण्यासाठी गुरुवार 20 ऑगस्ट 2020 रोजी ऑनलाईन भरती मेळाव्याचे आयोजन सकाळी 11.30 ते दुपारी 12.30 यावेळेत करण्यात आला आहे.

 

मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सचना केंद्रद्वार औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड यांच्यावतीने 20 ऑगस्ट 2020 रोजी ऑनलाईन जॉब फेअर (भरती मेळावा) आयोजित करण्यात आला आहे. आयटीआय उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांनी Link for Google form https:/docs.google.com/forms/d/e/1FalpQLSegmDAM6YXO5ou1f_cRFIL4gyDBWM9Yj2pHQYWpz89tj5b6zQ/viewform?usp=sf_Link

Video Conference Link https://global.gotomeeting.com/join/779416021  या लिंकवर 20 ऑगस्ट रोजी गुगल  फॉर्म (google form) मध्ये नोंदणी करुन व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे भरती मेळावा ऑनलाईन जॉब फेअरसाठी सकाळी 11.30 ते दुपारी 12.30 यावेळेत आयोजित करण्यात आला आहे.

Access Code- 779-416-021 या लिंकवर उपस्थित  रहावे, असे आवाहन नांदेड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एम. बी. कुलकर्णी यांनी केले आहे.

00000

अटी व शर्तींच्या अधिन राहून

संगणक संस्था, एमकेसीएल केंद्र सुरु करण्यास मुभा

नांदेड (जिमाका) दि. 18 :- नांदेड जिल्ह्यातील सर्व शासनमान्य संगणक संस्था, केंद्र (एमकेसीएल) यांना अटी व शर्तीच्या अधिन राहून सुरु करण्यास जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी मुभा दिली आहे. या संस्था सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 ते सायं 7 वाजेपर्यंत व शनिवारी सकाळी 9 ते दुपारी 5 वाजेपर्यंत सुरु राहतील व प्रत्येक रविवारी संस्था पुर्णत: बंद राहतील.

 

इयत्ता दहावी, बारावी परीक्षांचे निकाल लागले असून शासनस्तरावर विविध पदांच्या भरती प्रक्रिया तसेच इच्छुक उमेदवारांना एमएससीआयटी उत्तीर्ण प्रमाणपत्राची आवश्यकता आहे. त्यासाठी अभ्यासक्रम पुर्ण करुन प्रमाणपत्र मिळविण्यासाठी विद्यार्थी, उमेदवारांनी विनंती अर्ज केले आहेत. शासनमान्यताप्राप्त संगणक संस्थांनी सर्व निकष पाळून संगणक संस्था / केंद्र (एमकेसीएल) सुरु करण्याची विनंती केली आहे.  

 

नांदेड जिल्ह्यातील सर्व शासनमान्य संगणक संस्था, केंद्र (एमकेसीएल) सुरु करण्यास मुभा देण्यात आली आहे. त्याअनुषंगाने पुढील दिलेल्या अटी व शर्तीच्या निर्देशाचे पालन करणे बंधनकारक राहिल.

 

·         कोवीड-19 अंतर्गत केंद्र, राज्य शासन यांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे पालन करणे बंधनकार राहील.

·         जिल्ह्यातील सर्व शासनमान्य एमकेसीएल केंद्र यांची तालुकानिहाय यादी संबंधीत तहसिलदार व उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सादर करावी.

·         कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सामजिक अंतर प्रत्येक व्यक्तींमध्ये कमीत कमी संपर्क येईल याची दक्षता घ्यावी.

·         कंटेनमेंट झोन मधील व्यक्तींना यामधुन वगळण्यात यावे तसेच नांदेड जिल्ह्यातील कंटेनमेंट झोनमध्ये ये-जा करण्यास सक्त मनाई राहील.

·         विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवही दररोज अद्यावत करावी. जेणेकरुन संशयित रुग्ण आढळल्यास कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे सोईचे होईल.

·         जिल्ह्यातील सर्व वरीलप्रमाणे संस्था सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 ते सायं 7 वाजेपर्यंत व शनिवारी या दिवशी सकाळी 9 ते दुपारी 5 वाजेपर्यंत सुरु राहतील व प्रत्येक रविवारी संस्था पुर्णत: बंद राहतील.

·         कोरोना कालावधीत ज्यावेळी जिल्हा / तालुका बंद ठेवण्याबाबत अथवा जमावबंदी करण्याबाबत किंवा लॉकडाउन घोषीत करण्यात येईल त्या कालावधीत संस्था बंद ठेवणे अनिवार्य राहिल.

·         प्रत्येक विद्यार्थ्यांचे हॉल प्रवेशाचेवेळी सॅनिटाईज करावे. साबणाने हात स्वच्छ धुण्याची व्यवस्था करावी तसेच शक्यतो प्रत्येक उमेदवाराने हॅन्डग्लोजचा वापर करावा.

·         विद्यार्थ्यांच्या तोंडाला मास्क लावणे अनिवार्य राहिल. त्याचप्रमाणे प्रवेशापुर्वी प्रत्येक विद्यार्थ्यांचे थर्मल स्क्रिनिंग करणे अनिवार्य राहिल.

·         दोन तुकड्यांमध्ये किमान अर्धा तास अवकाश ठेऊन प्रत्येकवेळी हॉल स्वच्छ व संगणक सॅनिटाईज करावेत.

·         कोवीड-19 साथरोग संबंधी सर्दी-खोकला, ताप, श्वसनसंस्थेशी संबंधीत लक्षणे असणाऱ्या विद्यार्थ्यांस प्रवेश देऊ नये.

·         शासन निर्धारीत शुल्कापेक्षा जास्त शुल्क विद्यार्थ्यांकडून घेण्यात येऊ नये. तसे आढळल्यास अथवा तक्रार प्राप्त झाल्यास नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल.

·         एकावेळेस हॉलमध्ये किमान 5 उमेदवार व एक अद्यापकाशिवाय इतरांना प्रवेश निषिब्ध करावा.

·         विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा दुरध्वनी क्रमांक घेऊन नेहमी संपर्क करावा तसेच जिल्हा प्रशासन, तालुका प्रशासन व आरोग्य विभागाचा संपर्क क्रमांक घेऊन दर्शनी भागात लावण्यात यावा. कोविड-19 विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाच्या दिलेल्या सर्व सुचना दर्शनी भागात लावाव्यात व त्या सुचनांचे पालन होईल यादृष्टिने कार्यवाही करावी.

·         प्रत्येक विषयांसाठी एमकेसीएल केंद्रात स्वतंत्र बैठक व्यवस्था असावी.

·         विद्यार्थ्यांच्या कुटुंबात अथवा निवासस्थान परिसरात कोवीड-19 चा रुग्ण नसल्याची खात्री करावी.

·         प्रत्येक संस्थाचालकाने व सर्व विद्यार्थ्यांसहित सर्वांनी आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करणे बंधनकारक राहिल.

·         प्रत्येक उमेदवारांचे आरोग्य कार्ड तयार करुन शारिरीक तापमान, सर्दी-खोकला यांच्या दैनंदीन नोंदी घेण्यात याव्यात.

·         कोविड-19 शी संबंधित वेळोवेळी निर्गमीत होणारे शासन परिपत्रक, आदेश, निर्णय व जिल्हादंडाधिकारी कार्यालयाचे पत्र व आदेशाचे पालन करण्यास कसूर केल्याचे निर्दशनास आल्यास संबंधित संस्थेस जबाबदार धरुन तात्काळ संस्था सील करण्यात येईल. त्याबाबत नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल. 

 

तसेच कोविड-19 च्या अनुषंगाने निर्गमीत केलेल्या सूचना व निर्देशाचे जो कोणी पालन करणार नाही अशा व्यक्ती, संस्था अथवा समुह हे साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि भारतीय दंड संहिता 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व कारवाई करण्यात येईल.

 

या आदेशाची अंमलबजावणी करीत असतांना सद्हेतूने केलेल्या कृत्यासाठी कोणत्याही अधिकारी, कर्मचारी यांचेवर विरुद्ध कुठल्याही प्रकारची कायदेशिर कारवाई अथवा खटला दाखल करता येणार नाही, असेही जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आदेशात स्पष्ट केले आहे. 

00000


84 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

 138 बाधितांची भर तर चार जणांचा मृत्यू   

नांदेड (जिमाका) दि. 18 :- मंगळवार, 18 ऑगस्ट 2020 रोजी सायं. 5.30  वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 84 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 138 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 46 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 92 बाधित आले.

 

आजच्या एकुण 802 अहवालापैकी  627 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 4 हजार 325 एवढी झाली असून यातील 2 हजार 561 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 1 हजार 580 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 182 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे.   

 

सोमवार, 17 ऑगस्ट रोजी देगलूर तालुक्यातील हाणेगाव येथील 55 वर्षाच्या एका पुरुषाचा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे उपचारादरम्यान मृत्य झाला.

            सोमवार, 18 ऑगस्ट रोजी कंधार तालुक्यातील नवघरवाडी येथील 68 वर्षाचा एक पुरुष , नांदेड तालुक्यातील सुगाव खुर्द येथील 65 वर्षाचा एक पुरुष , नायगाव तालुक्यातील कहाळा येथील 65 एक पुरुषाचा उपाचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत व्यक्तींची संख्या 153 एवढी झाली आहे.  

  

आज बरे झालेल्या 84 कोरोना बाधितांमध्ये शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णूपूरी नांदेड येथील 6, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथील 8,  हदगाव कोविड केअर सेंटर 12, माहूर कोविड सेंटर 2, किनवट कोविड सेंटर 3 , हिमायतनगर कोविड सेंटर 1, मुदखेड कोविड सेंटर 1, मुखेड कोविड सेंटर 2 , पंजाब भवन कोविड सेंटर 14, देगलूर कोविड केअर सेंटर 30, धर्माबाद कोविड सेंटर 5 एकूण 84 कोरोना बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.  

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपाक्षेत्र 13, अर्धापूर तालुक्यात 1, देगलूर तालुक्यात 2, मुखेड तालुक्यात 17, माहूर तालुक्यात 1, धर्माबाद तालुक्यात 1 , यवतमाळ 1, लातूर 1, नांदेड ग्रामीण 1, भोकर तालुक्यात 2, कंधार तालुक्यात 4, नायगाव  तालुक्यात 3, किनवट तालुक्यात 1, परभणी 1, हिंगोली 4 असे एकुण 46 बाधित आढळले.

 

तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 24, हदगाव तालुक्यात 6, मुखेड तालुक्यात 30, नायगाव तालुक्यात 5, किनवट तालुक्यात 1, बिलोली तालुक्यात 2, आदिलाबाद 1 , भोकर तालुक्यात 2, कंधार तालुक्यात 3, उमरी तालुक्यात 17, धर्माबाद तालुक्यात6, परभणी 1, हिंगोली 1 असे एकुण 92 बाधित आढळले.

 

जिल्ह्यात 1 हजार 580 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 196, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 684, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 41, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 27, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 33, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 111,  देगलूर कोविड केअर सेंटर येथे 65, लोहा कोविड केअर सेंटर येथे 41, हदगाव कोविड केअर सेंटर 14, भोकर कोविड केअर सेंटर 25,  कंधार कोविड केअर सेंटर येथे 1, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 92, किनवट कोविड केअर सेंटर येथे 14, अर्धापूर कोविड केअर सेंटर येथे 8, मुदखेड कोविड केअर सेटर 25,  माहूर कोविड केअर सेंटर येथे 7, आयुर्वेदिक शासकिय रुग्णालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 18, बारड कोविड केअर सेंटर 1, उमरी कोविड केअर सेंटर 25, खाजगी रुग्णालयात 137 बाधित, औरंगाबाद येथे संदर्भित 5, निजामाबाद येथे 1, हैदराबाद येथे 1 बाधित संदर्भित झाले आहेत.  

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

सर्वेक्षण- 1 लाख 50 हजार 627,

घेतलेले स्वॅब- 30 हजार 566,

निगेटिव्ह स्वॅब- 24 हजार 563,

आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 138,

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 4 हजार 325,

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-20,

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 2,

एकूण मृत्यू संख्या- 153,

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 2 हजार 561,

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 1 हजार 580,

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 104, 

आज रोजी गंभीर प्रकृती असलेले बाधित- 182.

 

प्रलंबित स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेले अहवाल उद्या सायंकाळ पर्यंत प्राप्त होतील. कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.   

00000

 


 तरच या धार्मिक उत्सवात

सर्वांचे आरोग्य राहिल सुरक्षित !

-         जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

नांदेड (जिमाका) दि. 18 :- पुढील पंधरा दिवस विविध सण, उत्सव यांच्यादृष्टिने जितके महत्वाचे आहेत तेवढ्याच प्रमाणात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी हे दिवस सर्वांच्या अधिक जबाबदारीचे आहेत, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले. गणेशोत्सव व मोहरन सण 2020 च्या अनुषंगाने‍ जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक आज नियोजन भवन येथे त्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस आमदार मोहन हंबर्डे, आमदार राजेश पवार, जिल्हा पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर, महानगरपालिका आयुक्त डॉ. सुनिल लहाने, शांतता समितीचे सन्माननिय सदस्य, गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

 

इतर जिल्ह्याच्या तुलनेत नांदेड जिल्ह्यात कोरोनाबाबतची स्थिती चांगली असून जिल्हा प्रशासनाने हे आव्हान योग्यरितीने हाताळले आहे. प्रशासनावर कोरोना व्यवस्थापनेचा असलेला ताण लक्षात घेऊन सर्वांनी सहकार्याची भुमिका ठेवत आपआपल्या स्तरावरुन नियमांचे पालन करण्यासाठी तत्पर असले पाहिजे, असे आवाहन आमदार राजेश पवार यांनी केले.

 

कोरोनाचा आजार हा खूप मोठा साथरोग आहे. अशा या कठीण काळात आपला स्वभाव कितीही उत्सवप्रिय असला तरी प्रत्येकाने संयमी राहणे हेच महत्वाचे असल्याचे प्रतिपादन आमदार मोहन हंबर्डे यांनी केले. महाराष्ट्रातील जनतेने पंढरपुरची वारी, दिंड्या रद्द करुन प्रशासनाला सहकार्य केले. मुस्लिम बांधवांनीही ईद सारखे सण घरीच साजरे करुन प्रशासनाला सहकार्य केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीही दलित बांधवांनी राज्य घटनेचे वाचन करीत घरीच साजरी केली. यापुढेही विविध सण उत्सव नांदेड जिल्हावासी मोठ्या संयमाने व कर्तव्य भावनेने साजरे करुन राज्यात आपला आदर्श निर्माण करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.     

 

आपण साजरे करत असलेले उत्सव हे गर्दीला आमंत्रण देणारे आहेत तर आजच्या काळात गर्दीही मृत्यूला आमंत्रण देणारी आहे. कोविड-19 हा केवळ साथीचा आजार नाही हे आता सर्वांच्या लक्षात आले आहे. आपण या साथीच्या आजारात महत्वाच्या टप्प्यावर आलो असून येत्या सप्टेंबर पर्यंत सर्वांनी अधिक सुरक्षितता घेतली पाहिजे, असे जागतिक आरोग्य संघटनेने आवाहन केले आहे. या सर्व गोष्टींचा विचार करुन आपला नांदेड जिल्हा या धार्मिक उत्सवाच्या काळात अधिक सजगता व सुरक्षितता बाळगुन धार्मिक एकात्मतेचा नवा पॅटर्न निर्माण करेल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी व्यक्त केला. हॅपी क्लबच्या सदस्यांनी नांदेडमध्ये जी मानवतेची सेवा केली आहे त्याचा गौरवही त्यांनी केला.  

 

23 एप्रिल रोजी जिल्ह्यात कोरोनाची पहिली केस समोर आली. त्यानंतर नांदेडची स्थिती बिघडू नये यासाठी शासनाने जवळपास 90 आदेश काढले. आपण सर्व नागरिकांनी या आदेशाचे पालन केल्यामुळेच इतर जिल्ह्याच्या तुलनेत कोरोना प्रादुर्भावाचा जास्त उद्रेक होऊ दिला नाही, असे जिल्हा पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर यांनी सांगितले. आजवरच्या काळात मोठ्या प्रमाणात मजुरांचे झालेले स्थलांतर, सुमारे 4 हजार शिख भाविकांचे सुखरुप घरी पोहचणे, बाहेर जिल्ह्यातून बाधित होऊन आलेल्या लोकांना क्वॉरंटाईन करणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रमजान आदी काळात नांदेड जिल्हावासियांनी जी समंजस भुमिका निभावली याचे कौतुकही त्यांनी केले. येणाऱ्या गणेश उत्सवात व मोहरम ताजियामध्ये हाच संयम नांदेडकर दाखवतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 

सार्वजनिक गणेशोत्सवांना 4 फुटांपेक्षा उंच मुर्ती बसविता येणार नाही. घरच्यासाठी दोन फुटांपेक्षा उंच मुर्ती असता कामा नये. शिवाय सार्वजनिक गणेशोत्सवात आरती व इतर कार्यक्रमांसाठी चार व्यक्तींपेक्षा अधिक व्यक्ती असता कामा नये. ध्वनीप्रदुषणाबाबत मा. उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश पाळण्यासमवेत कोणताही देखावा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांना करता येणार नाही. याशिवाय सॅनिटायजर, मास्क आदी सुरक्षिततेचे उपाय हे सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांना बंधनकारक आहेत. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर घेतलेल्या या नियमांचे कोणी उल्लंघन केल्यास संबंधितांविरुद्ध आम्हाला कायदाचा बडगा उचलण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही हेही जिल्हा पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर यांनी स्पष्ट केले.

 

यावेळी शांतता समितीच्या विविध पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

00000


जिल्हा सामान्य रुग्णालय नांदेड येथे कंत्राटी पद्धतीने खालील नमूद पदांकरिता अर्जाची मागणी.

 





महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...