Wednesday, April 19, 2017

आंबेडकर चौक ते धनेगाव चौक रस्ता
 20 मे पर्यंत वाहतुकीस बंद राहणार
नांदेड, दि. 20 :- राष्‍ट्रीय महामार्ग क्र. 361 वरील आंबेडकर चौक ते धनेगांव चौक या दरम्‍यानचा रस्‍ता बांधकाम करण्‍यासाठी शुक्रवार 21 एप्रिल 2017 सकाळी 6 वाजेपासून ते शनिवार 20 मे 2017 रात्री बारा वाजेपर्यत सर्व प्रकारच्‍या वाहनास बंद राहणार आहे. याकाळात पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
       या मार्गावरील रहदारीच्‍या विनियमनासाठी व सुव्‍यवस्‍था राखण्‍यासाठी कार्यकारी अभियंता, राष्‍ट्रीय महामार्ग विभाग नांदेड यांनी राष्‍ट्रीय महामार्ग क्र. 361 वरील आंबेडकर चौक ते धनेगांव चौक या रस्‍त्‍यांचे बांधकाम करण्‍यासाठी वाहनास प्रतिबंध करणे आवश्‍यक असल्‍याचे निर्दशनास आणून दिले आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी  मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार प्राप्त अधिकारान्वये राष्‍ट्रीय महामार्ग क्र. 361 वरील आंबेडकर चौक ते धनेगांव चौक या दरम्‍यान रस्‍ता बांधकाम करताना वाहतूक सुरळीत रहावी, नागरीकांची गैरसोय होऊ नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण हो नये म्हणून शुक्रवार 21 एप्रिल 2017 सकाळी सहा वाजेपासून ते शनिवार 20 मे 2017 रात्री बारा वाजेपर्यत सर्व प्रकारच्‍या वाहनास बंद राहण्याचे अधिसूचित करण्यात येत आहे. या कालावधीत राष्‍ट्रीय महामार्ग क्र.361 वरील वाहतूक शिवाजी चौक (धनेगांव) चंदासिंग कॉर्नर ढवळे चौक दुध डेअरी चौक वसरणी आंबेडकर चौक या दुहेरी मार्गाने वाहतूक वळविण्‍यात येत आहे. या बदलाबाबत पोलीस विभागाने वाहतुकीचे नियमन व नियंत्रण करण्याचे आदेशित करण्यात येत आहे. या आदेशाचे उल्‍लंघन केल्यास, तो कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही या आदेशात म्हटले आहे. 

000000
नीट परीक्षेसाठी 35 केंद्र निश्चित;
पूर्व तयारीबाबत आढावा बैठक संपन्न
नांदेड दि. 19 :- केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाकडून (सीबीएसई) घेण्यात येणारी राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट) 2017 रविवार 7 मे 2017 रोजी घेण्यात येणार आहे. नांदेड केंद्रांतर्गत 35 परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. या परीक्षेच्या पूर्व तयारीबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न झाली. निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांनी या परीक्षेबाबत काटेकोर नियोजनाचे निर्देश दिले.
बैठकीस नीट परीक्षेचे नांदेडसाठीचे समन्वयक तथा होरायजन डिस्कव्हरी ॲकडमीचे प्राचार्य फनींद्र बोरा, तहसिलदार ज्योती पवार, नीटचे अधिकारी एसआय उस्ताद, होरायजन ॲकडमीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ए. के. सिरसाट, पोलीस निरीक्षक रघुनाथ कदम, शिक्षणाधिकारी डॉ. जे. एन. गोरे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक एच. आर. गुंटूरकर, एसटी महामंडळाचे वाहतूक नियंत्रक प्रमोद नेहूल, महावितरणचे बी. के. गुप्ता आदींची उपस्थिती होती.
नांदेड केंद्रांतर्गत या परीक्षेसाठी सुमारे 13 हजार 713 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. परीक्षेसाठी नीटकडून मुदखेडसह शहरात 35 परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. या परीक्षा केंद्रांची नावे पुढील प्रमाणे (कंसात विद्यार्थी संख्या )-  आंध्र समिती तेलगू हायस्कूल नांदेड (240), केंब्रीज विद्यालय (360), शासकीय तंत्रनिकेतन (240), ग्रामीण कॉलेज ॲड इंजिनिअरिंग (240), ग्रामीण तंत्रनिकेतन (480), गुजरार्थी हायस्कुल (420), ग्यान माता विद्या विहार (300), होरायजन डिस्कव्हरी ॲकडमी (393), इंदिरा गांधी महाविद्यालय (420), इंदिरा गांधी हायस्कुल (300), किड्स किंगडम् पब्लिक स्कूल (420), कुसूमताई हायस्कूल (240), महात्मा फुले हायस्कूल (540), मातोश्री प्रतिष्ठान स्कूल ऑफ इंजिनीअरींग (360), एमजीएम कॉलेज (480), नागार्जूना पब्लिक स्कूल (420), नारायणराव चव्हाण लॉ कॉलेज (600), एनएसबी कॉलेज (360), ऑक्सफोर्ड इंटरनॅशनल स्कूल (840), ऑक्सफोर्ड द ग्लोबल स्कूल (420), पिपल्स हायस्कूल (240), प्रतिभा निकेतन हायस्कूल (360), प्रतिभा निकेतन कॉलेज (360), राजर्षी शाहू विद्यालय आणि कॉलेज (360), एसएसएस कॉलेज ऑफ एज्युकेशन सहयोग कॅम्पस (240), सावित्रीबाई फुले हायस्कूल (240), सायन्स कॉलेज (360), शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालय (240), श्री शारदा भवन स्कूल (300), श्री शिवाजी माध्यमीक आणि उच्च माध्यमिक विद्यालय (240), एसएसएस इंदिरा इन्स्टीट्युट ऑफ टेक्नॉलॉजी-पॉलीटेक्नीक (420), विश्वभारती पॉलीटेक्नीक इन्स्टीट्युट (480), यशवंत महाविद्यालय-लातूर बोर्ड (780), यशवंत महाविद्यालय-एसआरटीएम (780) आणि मुदखेड केंद्रीय विद्यालय (240).
या बैठकीत परीक्षेसाठी आवश्यक आरोग्य पथके, परीक्षा केंद्रांवरील सोई-सुविधा, पिण्याचे पाणी,  तसेच या दिवशी परीक्षा कालावधीत अखंडीत वीज पुरवठा राहील यासाठीचे नियोजन, वाहतुकीसाठी पुरेशा शहर वाहतूक बस, याशिवाय परीक्षा साहित्यासाठीची अनुषंगीक वाहतूक व्यवस्था, परीक्षा केंद्रांवरील पुरेसा पोलीस बंदोबस्त याबाबत चर्चा झाली व नियोजनाबाबत निर्देश देण्यात आले. 

0000000
पालकमंत्री अर्जुन खोतकर यांचा आज दौरा
नांदेड दि. 19 :-  राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्सव्यवसाय व वस्त्राद्योग राज्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर हे गुरुवार 20 एप्रिल 2017 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
गुरुवार 20 एप्रिल 2017 रोजी देवगिरी एक्सप्रेसने सकाळी 8.30 वा. नांदेड येथे आगमन व शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण करतील. शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. दुपारी 2.30 वा. जिल्हा नियोजन समिती (डिपीडीसी) बैठक तसेच दुपारी 4 वा. जिल्हास्तरीय खरीप 2017 हंगाम पूर्वतयारीची बैठक पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली होतील. स्थळ- डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवनातील मुख्य सभागृह. त्यानंतर सोईनुसार नांदेड येथून मोटारीने जालनाकडे प्रयाण करतील.

000000
ज्वारी, बाजरी, मका, गहु यांच्या
शेतमाल तारण कर्जाच्या मर्यादेत वाढ
नांदेड दि. 19 :-  महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या शेतमाल तारण कर्ज योजनेअंतर्गत ज्वारी, बाजरी, मका व गहु या शेतमालासाठी किमान आधारभूत किंमत अथवा प्रचलित बाजार भाव यापैकी कमी असणाऱ्या किंमतीनुसार होणाऱ्या एकूण रक्कमेच्या 75 टक्के पर्यंतची रक्कम तारण कर्ज देण्यास मान्यता देण्यात आली आहे. चालू हंगामात राज्यातील सर्व बाजार समित्यांनी याची त्वरित अंमलबजावणी करावी. शेतमाल तारण कर्ज योजनेच्या इतर अटी व शर्ती कायम राहतील असे कार्यकारी संचालक महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ पुणे यांनी कळविले आहे.
महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या शेतमाल तारण कर्ज योजनेअंतर्गत ज्वारी, बाजरी, मका व गहू या शेतमालासाठी प्रचलित बाजार भाव एकूण किंमतीच्या 50 टक्के रक्कम किंवा प्रती क्विंटल 500 यापैकी कमी असणारी रक्कम तारण कर्ज देण्याची तरतुद आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या 3 मार्च 2017 रोजी झालेल्या सभेत चर्चा झाली. या चर्चेमध्ये तारण कर्ज योजनेच्या नियमात सध्या असणाऱ्या तरतुदीनुसार ज्वारी, बाजरी, मका व गहू या शेतमालासाठी शेतकऱ्यांना अत्यंत कमी रक्कम मिळत असल्याने हा शेतमाल तारण ठेवणे शेतकऱ्यास आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. त्यामुळे सदर तरतुद सुधारीत करणे आवश्यक झाले आहे. अशी चर्चा होऊन या सभेतील ठराव क्र. 14 (8) नुसार ज्वारी, बाजरी, मका व गहू या शेतमालासाठी या योजनेत समाविष्ठ असलेल्या इतर शेतमालाप्रमाणे किमान आधारभूत किंमत अथवा प्रचलित बाजार भाव यापैकी कमी असणाऱ्या किंमतीनुसार होणाऱ्या एकूण रक्कमेच्या 75 टक्के पर्यंतची रक्कम तारण कर्ज देण्यास ग्राह्य धरण्यात यावी, असा निर्णय घेण्यात आला आहे.

000000
नांदेड तहसिलमध्ये समृध्‍द महाराष्‍ट्र जनकल्‍याण कार्यशाळा संपन्न  
नांदेड दि. 19 :-  हात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे नांदेड तालकास्‍तरीय सर्व यंत्रणा, तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालक्‍यातील सर्व सरपंच, मंडळ अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, अव्‍वल कारकून, एपीओ, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक, ऑपरेटर यांची शासनाच्‍या समृध्‍द महाराष्‍ट्र जनकल्‍याण योजनेच्‍या अनुषंगाने कार्यशाळा नुकतीच घेण्‍यात आली. यावेळी समृध्‍द महाराष्‍ट्र जनकल्‍याण योजनेच्‍या 11 कलमी कार्यक्रमाबाबत चर्चा करण्‍यात आली. त्‍यामध्‍ये कामाचा आढावा घेऊन ती कामे ग्रामस्‍तरावर कशाप्रकारे सुरु करता येतील जास्‍तीतजास्‍त कामे कसे घेण्‍यात येतील याबाबत मार्गदर्शन करण्‍यात आले. त्‍याकरीता चर्चासत्र घेण्‍यात आले.
ग्रामस्‍तरावर काम करणारे सरपंच, कर्मचारी यांच्‍या अडचणी जाणून घेण्‍यात आल्‍या. त्‍यावर संबंधीत विभागाच्‍या अधिकाऱ्यांमार्फत मार्गदर्शन केले. कार्यशाळेमुळे शासनाच्‍या समृध्‍द महाराष्‍ट्र जनकल्‍याण योजनेची कामे मोठ्या प्रमाणात होण्‍यास मदत मिळाली आहे. तालुक्‍यात जलसंधारणाची कामे होऊन पाण्‍याच्‍या पातळीमध्‍ये वाढ होण्‍यासही मदत होणार आहे. यावेळी नांदेडचे तहसिलदार, गटविकास अधिकारी, कृषी मंडळ अधिकारी व एपीओ (रोहयो) यांनी मार्गदर्शन केले.

000000
आस्थापनांना कर्मचाऱ्यांच्या माहितीचे
प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन
नांदेड दि. 19 - एप्रिल 2017 या महिन्याचे मासिक वेतन देयक दाखल करताना सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांना तसेच खाजगी आस्थापनांनी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांच्याकडे आपल्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांची माहिती बाबतचे मार्च 2017 अखेरचे ई-आर-1 विवरणपत्र ऑनलाईन भरुन दिल्याचे ऑनलाईनचे प्रमाणपत्र देयकासोबत जोडणे आवश्यक आहे. त्याशिवाय वेतन देयके स्विकारले जाणार नाहीत, याची संबंधीतांनी नोंद घ्यावी.
सर्व कार्यालयांना जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र  कार्यालयामार्फत युजर आयडी व पासवर्ड यापुर्वीच काळविण्यात आले आहेत. तसेच सर्व कार्यालयांनी आपले ई-मेल आयडी व फोननंबर, पत्ता टाकून आपली प्रोफाईल अपडेट करावी, असे सहायक संचालक जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांनी कळविले आहे.

00000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...