ज्वारी,
बाजरी, मका, गहु यांच्या
शेतमाल
तारण कर्जाच्या मर्यादेत वाढ
नांदेड दि. 19 :- महाराष्ट्र राज्य
कृषि पणन मंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या शेतमाल तारण कर्ज योजनेअंतर्गत
ज्वारी, बाजरी, मका व गहु या शेतमालासाठी किमान आधारभूत किंमत अथवा प्रचलित बाजार
भाव यापैकी कमी असणाऱ्या किंमतीनुसार होणाऱ्या एकूण रक्कमेच्या 75 टक्के पर्यंतची
रक्कम तारण कर्ज देण्यास मान्यता देण्यात आली आहे. चालू हंगामात राज्यातील सर्व
बाजार समित्यांनी याची त्वरित अंमलबजावणी करावी. शेतमाल तारण कर्ज योजनेच्या इतर
अटी व शर्ती कायम राहतील असे कार्यकारी संचालक महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ
पुणे यांनी कळविले आहे.
महाराष्ट्र राज्य कृषि
पणन मंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या शेतमाल तारण कर्ज योजनेअंतर्गत ज्वारी,
बाजरी, मका व गहू या शेतमालासाठी प्रचलित बाजार भाव एकूण किंमतीच्या 50 टक्के
रक्कम किंवा प्रती क्विंटल 500 यापैकी कमी असणारी रक्कम तारण कर्ज देण्याची तरतुद
आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या 3 मार्च 2017 रोजी झालेल्या
सभेत चर्चा झाली. या चर्चेमध्ये तारण कर्ज योजनेच्या नियमात सध्या असणाऱ्या
तरतुदीनुसार ज्वारी, बाजरी, मका व गहू या शेतमालासाठी शेतकऱ्यांना अत्यंत कमी
रक्कम मिळत असल्याने हा शेतमाल तारण ठेवणे शेतकऱ्यास आर्थिकदृष्ट्या परवडत नाही.
त्यामुळे सदर तरतुद सुधारीत करणे आवश्यक झाले आहे. अशी चर्चा होऊन या सभेतील ठराव
क्र. 14 (8) नुसार ज्वारी, बाजरी, मका व गहू या शेतमालासाठी या योजनेत समाविष्ठ
असलेल्या इतर शेतमालाप्रमाणे किमान आधारभूत किंमत अथवा प्रचलित बाजार भाव यापैकी
कमी असणाऱ्या किंमतीनुसार होणाऱ्या एकूण रक्कमेच्या 75 टक्के पर्यंतची रक्कम तारण
कर्ज देण्यास ग्राह्य धरण्यात यावी, असा निर्णय घेण्यात आला आहे.
000000
No comments:
Post a Comment