Wednesday, April 19, 2017

नीट परीक्षेसाठी 35 केंद्र निश्चित;
पूर्व तयारीबाबत आढावा बैठक संपन्न
नांदेड दि. 19 :- केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाकडून (सीबीएसई) घेण्यात येणारी राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट) 2017 रविवार 7 मे 2017 रोजी घेण्यात येणार आहे. नांदेड केंद्रांतर्गत 35 परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. या परीक्षेच्या पूर्व तयारीबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न झाली. निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांनी या परीक्षेबाबत काटेकोर नियोजनाचे निर्देश दिले.
बैठकीस नीट परीक्षेचे नांदेडसाठीचे समन्वयक तथा होरायजन डिस्कव्हरी ॲकडमीचे प्राचार्य फनींद्र बोरा, तहसिलदार ज्योती पवार, नीटचे अधिकारी एसआय उस्ताद, होरायजन ॲकडमीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ए. के. सिरसाट, पोलीस निरीक्षक रघुनाथ कदम, शिक्षणाधिकारी डॉ. जे. एन. गोरे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक एच. आर. गुंटूरकर, एसटी महामंडळाचे वाहतूक नियंत्रक प्रमोद नेहूल, महावितरणचे बी. के. गुप्ता आदींची उपस्थिती होती.
नांदेड केंद्रांतर्गत या परीक्षेसाठी सुमारे 13 हजार 713 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. परीक्षेसाठी नीटकडून मुदखेडसह शहरात 35 परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. या परीक्षा केंद्रांची नावे पुढील प्रमाणे (कंसात विद्यार्थी संख्या )-  आंध्र समिती तेलगू हायस्कूल नांदेड (240), केंब्रीज विद्यालय (360), शासकीय तंत्रनिकेतन (240), ग्रामीण कॉलेज ॲड इंजिनिअरिंग (240), ग्रामीण तंत्रनिकेतन (480), गुजरार्थी हायस्कुल (420), ग्यान माता विद्या विहार (300), होरायजन डिस्कव्हरी ॲकडमी (393), इंदिरा गांधी महाविद्यालय (420), इंदिरा गांधी हायस्कुल (300), किड्स किंगडम् पब्लिक स्कूल (420), कुसूमताई हायस्कूल (240), महात्मा फुले हायस्कूल (540), मातोश्री प्रतिष्ठान स्कूल ऑफ इंजिनीअरींग (360), एमजीएम कॉलेज (480), नागार्जूना पब्लिक स्कूल (420), नारायणराव चव्हाण लॉ कॉलेज (600), एनएसबी कॉलेज (360), ऑक्सफोर्ड इंटरनॅशनल स्कूल (840), ऑक्सफोर्ड द ग्लोबल स्कूल (420), पिपल्स हायस्कूल (240), प्रतिभा निकेतन हायस्कूल (360), प्रतिभा निकेतन कॉलेज (360), राजर्षी शाहू विद्यालय आणि कॉलेज (360), एसएसएस कॉलेज ऑफ एज्युकेशन सहयोग कॅम्पस (240), सावित्रीबाई फुले हायस्कूल (240), सायन्स कॉलेज (360), शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालय (240), श्री शारदा भवन स्कूल (300), श्री शिवाजी माध्यमीक आणि उच्च माध्यमिक विद्यालय (240), एसएसएस इंदिरा इन्स्टीट्युट ऑफ टेक्नॉलॉजी-पॉलीटेक्नीक (420), विश्वभारती पॉलीटेक्नीक इन्स्टीट्युट (480), यशवंत महाविद्यालय-लातूर बोर्ड (780), यशवंत महाविद्यालय-एसआरटीएम (780) आणि मुदखेड केंद्रीय विद्यालय (240).
या बैठकीत परीक्षेसाठी आवश्यक आरोग्य पथके, परीक्षा केंद्रांवरील सोई-सुविधा, पिण्याचे पाणी,  तसेच या दिवशी परीक्षा कालावधीत अखंडीत वीज पुरवठा राहील यासाठीचे नियोजन, वाहतुकीसाठी पुरेशा शहर वाहतूक बस, याशिवाय परीक्षा साहित्यासाठीची अनुषंगीक वाहतूक व्यवस्था, परीक्षा केंद्रांवरील पुरेसा पोलीस बंदोबस्त याबाबत चर्चा झाली व नियोजनाबाबत निर्देश देण्यात आले. 

0000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...