Wednesday, April 19, 2017

नांदेड तहसिलमध्ये समृध्‍द महाराष्‍ट्र जनकल्‍याण कार्यशाळा संपन्न  
नांदेड दि. 19 :-  हात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे नांदेड तालकास्‍तरीय सर्व यंत्रणा, तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालक्‍यातील सर्व सरपंच, मंडळ अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, अव्‍वल कारकून, एपीओ, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक, ऑपरेटर यांची शासनाच्‍या समृध्‍द महाराष्‍ट्र जनकल्‍याण योजनेच्‍या अनुषंगाने कार्यशाळा नुकतीच घेण्‍यात आली. यावेळी समृध्‍द महाराष्‍ट्र जनकल्‍याण योजनेच्‍या 11 कलमी कार्यक्रमाबाबत चर्चा करण्‍यात आली. त्‍यामध्‍ये कामाचा आढावा घेऊन ती कामे ग्रामस्‍तरावर कशाप्रकारे सुरु करता येतील जास्‍तीतजास्‍त कामे कसे घेण्‍यात येतील याबाबत मार्गदर्शन करण्‍यात आले. त्‍याकरीता चर्चासत्र घेण्‍यात आले.
ग्रामस्‍तरावर काम करणारे सरपंच, कर्मचारी यांच्‍या अडचणी जाणून घेण्‍यात आल्‍या. त्‍यावर संबंधीत विभागाच्‍या अधिकाऱ्यांमार्फत मार्गदर्शन केले. कार्यशाळेमुळे शासनाच्‍या समृध्‍द महाराष्‍ट्र जनकल्‍याण योजनेची कामे मोठ्या प्रमाणात होण्‍यास मदत मिळाली आहे. तालुक्‍यात जलसंधारणाची कामे होऊन पाण्‍याच्‍या पातळीमध्‍ये वाढ होण्‍यासही मदत होणार आहे. यावेळी नांदेडचे तहसिलदार, गटविकास अधिकारी, कृषी मंडळ अधिकारी व एपीओ (रोहयो) यांनी मार्गदर्शन केले.

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...