Saturday, February 11, 2017

दहावी परीक्षेचे साहित्याचे सोमवारी वितरण
नांदेड, दि. 11  :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या लातूर विभागीय मंडळांतर्गत सर्व मान्यता प्राप्त शाळा प्रमुखानी माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2017 परीक्षेची प्रवेशपत्र, प्रात्यक्षिक साहित्य, कलचाचणी सी.डी. व इतर साहित्य सोमवार 13 फेब्रुवारी 2017 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 तसेच दुपारी 2 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत नेहमीच्या वितरण केंद्रावर वाटप करण्यात येणार आहेत. सर्व शाळांच्या प्रतिनिधींनी प्रवेशपत्र व इतर साहित्य आपल्या जिल्हा वितरण केंद्रावरुन स्विकारावे असे लातूर विभागीय मंडळाचे सचिव यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे कळविले आहे.

000000
जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू
नांदेड, दि. 11  :- जिल्ह्यात गुरुवार 23 फेब्रुवारी 2017  रोजी मध्यरात्रीपर्यत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
आगामी काळातील सण, निवडणुका, उत्सव, उच्च माध्यमिक व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा आणि इतर सार्वजनिक कार्यक्रम, विविध प्रकारची संभाव्य आंदोलनाची शक्यता या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था कायम रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात गुरुवार 9 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी 2017 रोजीच्‍या मध्यरात्रीपर्यत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमूद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

000000
ऑनलाईन वाहन नोंदणीसाठी
    परिवहन कार्यालयाचे आवाहन
नांदेड दि. 11 :- प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड येथे 13 जानेवारी 2017 पासून वाहन नोंदणीसाठी वाहन 4.0 या नवीन प्रणालीद्वारे ऑनलाईन सुविधा सुरु करण्यात आली आहे. ज्या वाहनधारकांनी नोंदणीसाठी 13 जानेवारी 2017 पुर्वी वाहन सादर केले होते परंतू काही त्रुटीमुळे त्यांचे नोंदणी झालेली नाही त्यांनी सदर त्रुटीची पूर्तता करुन घ्यावी.

तसेच ज्या वाहन मालकांनी वाहनाच्या विविध सेवांसाठी कागदपत्रे कार्यालयात सादर केले आहे परंतू या नवीन प्रणालीमुळे कामकाज प्रलंबित आहे त्यांनी सुद्धा संबंधीत काम विहित शुल्क अथवा वाढीव शुल्काचा भरणा करुन कार्यालयाशी संपर्क साधावा व प्रलंबित कामे पूर्ण करुन घ्यावीत. संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.   
जिल्हा कोषागार कार्यालयाकडून
 सोमवारी कार्यशाळेचे आयोजन  
नांदेड दि. 11 :- राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना व भविष्य निर्वाह निधी (जीपीएफ) संगणकीयकरणाबाबत कार्यशाळेचे आयोजन जिल्हा कोषागार कार्यालयाच्यावतीने सोमवार 13 फेब्रुवारी 2017 रोजी सकाळी 11 ते 2 यावेळेत बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे करण्यात आले आहे. या प्रशिक्षणास जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी मनोज गग्गड यांनी केले आहे.
या कार्यशाळेत राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने ऑनलाईन प्रक्रिया, मोबाईल ॲप डाऊनलोड प्रोसेसे, रिसेट आयपीन आदी बाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच भविष्य निर्वाह निधीच्या संगणकीयकरणाच्या अनुषंगाने अनुसरावयाच्या कार्यपद्धतीबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे.

000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...