Saturday, June 2, 2018


एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत
घटकांसाठी 20 जून पर्यंत अर्ज करण्याची मुदत
नांदेड दि. 2 :- एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत समाविष्ट प्रकल्प आधारित व विना प्रकल्प आधारित या दोन्ही घटकांसाठी बुधवार 20 जुन 2018 पर्यंत शेतकऱ्यांनी ऑनलाईन www.hortnet.gov.in या संकेतस्थळावर अर्ज नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.
या योजनेत लाभार्थ्यांनी  नोंदणी करताना पासपोर्ट साईज फोटो, 7 / 12 उतारा, 8 अ उतारा, बँक पासबुकाची प्रथम पृष्ठाची छायांकित प्रत, आधार कार्ड, अनुसुचीत जाती / जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांचे संवर्ग प्रमाणपत्राची छायांकित प्रत व हमीपत्र अपलोड करणे आवश्यक आहे. घटकनिहाय अर्जाचा व हमीपत्राचा नमूना संकेतस्थळावर Application form & Hamipatra या सदराखाली हॉर्टनेटच्या महाराष्ट्र राज्याच्या Home Page वर उपलब्धआहे. योजनेसंदर्भात अधिक माहितीसाठी नजीकच्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
सन 2018-19 मध्ये राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत एकात्मिक पॅक हाऊस, शितखोली, पुर्वशीतकरणगृह, शीतगृह, एकात्म्कि शीतसाखळी, रेफर व्हॅन, रायपनिंग चेंबर, एकात्मिक पुर्व शितकरणगृह व शितखोली (सोलार पॉवरसह), प्राथमिक प्रक्रिया केंद्र, कांदाचाळ उभारणी, मधुमक्षिक पालन-बी-ब्रिडरकडुन मधुमक्षिका वसाहतीचे उत्पादन करणे, मधुमक्षिका वसाहत व संचवाटप या प्रकल्प आधारित व फुलपिके, मसालापिके - हळद (रोपवाटीका), आळींबी उत्पादनप्रकल्प, सामुहीक शेततळे, शेततळे अस्तरीकरण, संरक्षित शेती-हरीतगृह, शेडनेट हाऊस, हरीतगृहातील उच्च प्रतीची भाजीपाला लागवड, हरीतगृहातील उच्च प्रतीची फुल पिके लागवड व प्लास्टीक मल्चींग, ट्रॅक्टर 20 अश्वशक्तीपर्यंत, पीकसंरक्षन उपकरणे मॅन्युअल स्प्रेअर-अ.नॅपसॅक / फुट स्प्रेअर व पॉवर नॅपसॅक स्प्रेअर / पॉवर ऑपरेटेड तैवान स्प्रेअर (क्षमता 8-12 लिटर) या विना प्रकल्प आधारित घटकांचा समावेश आहे. या घटकाचा लाभ घेण्यासाठी Hortnet प्रणालीमध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच एक शेतकरी एक किंवा अधिक घटकांची निवड करु शकतो. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत समाविष्ट घटकांसाठी शेतकऱ्यांकडून अर्ज स्विकारण्याकरिता राज्यात सन 2017 पासून Hortnet ही संगणकीय प्रणाली कार्यान्वित आहे. असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
000000



तंबाखू सेवनापासून दूर रहावे
- अप्पर जिल्हाधिकारी पाटील
नांदेड, दि. 2 :- नागरिकांनी तंबाखूच्या सेवनापासून दूर राहावे. त्यासाठी समाजात तंबाखूच्या दुष्परिणामाबाबत जनजागृती करावी, अशी सुचना अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली. तंबाखू दुष्परिणामाबाबत चर्चा करण्यासाठी जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठकीत अप्पर जिल्हाधिकारी श्री. पाटील यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. 
जागतिक तंबाखू विरोध दिन हा 31 मे रोजी पाळला जातो. यावर्षी जागतिक आरोग्य संघटनेने या दिवसासाठी तंबाखू आणि हृदयरोग ही संकल्पना दिली आहे. जिल्हास्तरावर तंबाखू विरोध दिवस व सप्ताह 31 मे ते 6 जून या कालावधीत साजरा करण्यात येत आहे. बैठकीत कोट्पा कायदा 2003 अंतर्गत करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. यावेळी पोलीस उपअधीक्षक विश्वेश्वर नांदेडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विठ्ठल मेकाने, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एच. आर. गुंटूरकर, डॉ. दीपक हजारी, डॉ. अर्चना तिवारी, इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
000000


पशुसंवर्धन मंत्री
महादेव जानकर यांचा दौरा
नांदेड, दि. 2 :- राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्सव्यवसाय मंत्री महादेव जानकर हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
रविवार 3 जून 2018 रोजी परळी येथून शासकीय वाहनाने दुपारी 3 वा. कंधार येथे आगमन व राखीव. दुपारी 3.30 वा. कंधार येथून शासकीय वाहनाने नांदेडकडे प्रयाण. दुपारी 4.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. सायं. 5.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून नांदेड रेल्वेस्थानकाकडे प्रयाण.च सायं. 6 वा. नांदेड रेल्वेस्थानक येथे आगमन व देवगिरी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील.
00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...