तंबाखू सेवनापासून दूर रहावे
- अप्पर जिल्हाधिकारी पाटील
- अप्पर जिल्हाधिकारी पाटील
नांदेड, दि. 2 :- नागरिकांनी
तंबाखूच्या सेवनापासून दूर राहावे. त्यासाठी समाजात तंबाखूच्या दुष्परिणामाबाबत
जनजागृती करावी, अशी सुचना अप्पर जिल्हाधिकारी संतोष
पाटील यांनी दिली. तंबाखू दुष्परिणामाबाबत चर्चा करण्यासाठी जिल्हास्तरीय समन्वय
समितीची बैठकीत अप्पर जिल्हाधिकारी श्री. पाटील यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
त्यावेळी ते बोलत होते.
जागतिक तंबाखू
विरोध दिन हा 31 मे रोजी पाळला जातो. यावर्षी
जागतिक आरोग्य संघटनेने या दिवसासाठी “तंबाखू आणि हृदयरोग” ही संकल्पना दिली आहे.
जिल्हास्तरावर तंबाखू विरोध दिवस व सप्ताह 31 मे ते 6
जून या कालावधीत साजरा करण्यात येत आहे. बैठकीत कोट्पा कायदा 2003
अंतर्गत करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. यावेळी
पोलीस उपअधीक्षक विश्वेश्वर नांदेडकर, जिल्हा आरोग्य
अधिकारी डॉ. विठ्ठल मेकाने, अतिरिक्त जिल्हा शल्य
चिकित्सक डॉ. एच. आर. गुंटूरकर, डॉ. दीपक हजारी, डॉ. अर्चना तिवारी, इतर विभागाचे अधिकारी
उपस्थित होते.
000000
No comments:
Post a Comment