Saturday, June 2, 2018


एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत
घटकांसाठी 20 जून पर्यंत अर्ज करण्याची मुदत
नांदेड दि. 2 :- एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत समाविष्ट प्रकल्प आधारित व विना प्रकल्प आधारित या दोन्ही घटकांसाठी बुधवार 20 जुन 2018 पर्यंत शेतकऱ्यांनी ऑनलाईन www.hortnet.gov.in या संकेतस्थळावर अर्ज नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.
या योजनेत लाभार्थ्यांनी  नोंदणी करताना पासपोर्ट साईज फोटो, 7 / 12 उतारा, 8 अ उतारा, बँक पासबुकाची प्रथम पृष्ठाची छायांकित प्रत, आधार कार्ड, अनुसुचीत जाती / जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांचे संवर्ग प्रमाणपत्राची छायांकित प्रत व हमीपत्र अपलोड करणे आवश्यक आहे. घटकनिहाय अर्जाचा व हमीपत्राचा नमूना संकेतस्थळावर Application form & Hamipatra या सदराखाली हॉर्टनेटच्या महाराष्ट्र राज्याच्या Home Page वर उपलब्धआहे. योजनेसंदर्भात अधिक माहितीसाठी नजीकच्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
सन 2018-19 मध्ये राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत एकात्मिक पॅक हाऊस, शितखोली, पुर्वशीतकरणगृह, शीतगृह, एकात्म्कि शीतसाखळी, रेफर व्हॅन, रायपनिंग चेंबर, एकात्मिक पुर्व शितकरणगृह व शितखोली (सोलार पॉवरसह), प्राथमिक प्रक्रिया केंद्र, कांदाचाळ उभारणी, मधुमक्षिक पालन-बी-ब्रिडरकडुन मधुमक्षिका वसाहतीचे उत्पादन करणे, मधुमक्षिका वसाहत व संचवाटप या प्रकल्प आधारित व फुलपिके, मसालापिके - हळद (रोपवाटीका), आळींबी उत्पादनप्रकल्प, सामुहीक शेततळे, शेततळे अस्तरीकरण, संरक्षित शेती-हरीतगृह, शेडनेट हाऊस, हरीतगृहातील उच्च प्रतीची भाजीपाला लागवड, हरीतगृहातील उच्च प्रतीची फुल पिके लागवड व प्लास्टीक मल्चींग, ट्रॅक्टर 20 अश्वशक्तीपर्यंत, पीकसंरक्षन उपकरणे मॅन्युअल स्प्रेअर-अ.नॅपसॅक / फुट स्प्रेअर व पॉवर नॅपसॅक स्प्रेअर / पॉवर ऑपरेटेड तैवान स्प्रेअर (क्षमता 8-12 लिटर) या विना प्रकल्प आधारित घटकांचा समावेश आहे. या घटकाचा लाभ घेण्यासाठी Hortnet प्रणालीमध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच एक शेतकरी एक किंवा अधिक घटकांची निवड करु शकतो. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत समाविष्ट घटकांसाठी शेतकऱ्यांकडून अर्ज स्विकारण्याकरिता राज्यात सन 2017 पासून Hortnet ही संगणकीय प्रणाली कार्यान्वित आहे. असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
000000


No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...