Monday, June 4, 2018


मुदखेड, धर्माबाद कृ. . बा. समिती निवडणू
मतदार यादी 6 जून रोजी प्रसिद्ध होणार ;
 आक्षेप असल्यास नोंदविण्याचे आवाहन    
नांदेड दि. 4 :-  मुदखेड व धर्माबाद कृषि उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील प्रारुप मतदार यादी बुधवार 6 जून 2018 रोजी प्रसिध्द‍ करण्यात येणार आहे. या मतदार यादीत आक्षेप असल्यास शुक्रवार 15 जून 2018 पर्यंत कार्यालयीन वेळेत (सुट्टीचे दिवस वगळून)  जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी (कृउबास) यांचे कार्यालय सामान्य शाखा-1 येथे लेखी स्वरुपात स्विकारण्यात येणार आहेत. आक्षेप कालावधी संपल्यानंतर प्राप्त होणारे आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी (कृउबास) तथा जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण पुणे यांचे आदेशान्वये 31 डिसेंबर 2017 अखेर मुदत संपणाऱ्या मुदखेड व धर्माबाद कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रीया सुरु करण्यात आली असून आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. या निवडणुकीसाठी प्रारुप शेतकरी व हमाल / मापाडी व व्यापारी मतदारसंघाची यादी बुधवार 6 जून  रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नांदेड व संबंधीत कृषि उत्पन्न बाजार समितीच्या नोटीस बोर्डावर गणनिहाय प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्याचा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
धर्माबाद कृषि उत्पन्न बाजार समिती :- प्रारुप मतदार यादी बुधवार 6 जून 2018 सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी नांदेड, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नांदेड, कृषि उत्पन्न बाजार समिती धर्माबाद यांचे सुचना फलकावर प्रसिध्द करण्यात येणार आहे. प्रारुप मतदार यादीवर 6 ते 15 जून 2018 कार्यालयीन वेळेत (सुट्टीचे दिवस वगळून) जिल्हाधिकारी नांदेड यांचे कार्यालय, तीसरा मजला सामान्य शाखा एक येथे हरकती स्विकारण्यात येणार आहेत. प्राप्त हरकतीवर सुनावणी 18 जून 2018 सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी नांदेड यांचे कार्यालयात. आलेल्या हरकतीवर निर्णय 25 जून 2018 रोजी दुपारी 4 वा. जिल्हाधिकारी नांदेड यांचे कार्यालय देण्यात येणार आहे. अंतिम मतदार यादी 29 जून 2018 रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी नांदेड, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नांदेड, कृषि उत्पन्न बाजार समिती धर्माबाद यांचे सुचना फलकावर प्रसिध्द करण्यात येणार आहे.
मुदखेड कृषि उत्पन्न बाजार समिती :- प्रारुप मतदार यादी 6 जून 2018 सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी नांदेड, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नांदेड, कृषि उत्पन्न बाजार समिती मुदखेड यांचे सुचना फलकावर प्रसिध्द करण्यात येणार आहे. प्रारुप मतदार यादीवर हरकती 6 ते 15 जून 2018 या कालावधीत कार्यालयीन वेळेत (सुट्टीचे दिवस वगळून) जिल्हाधिकारी नांदेड यांचे कार्यालय, 3 रा मजला सामान्य शाखा - 1  येथे स्विकारण्यात येणार आहेत. प्राप्त हरकतीवर सुनावणी 22 जून 2018 रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी नांदेड यांचे कार्यालयात. आलेल्या हरकतीवर निर्णय देणे 25 जून 2018 रोजी दुपारी 4 वा. जिल्हाधिकारी नांदेड यांचे कार्यालयात. अंतिम मतदार यादी 29 जून 2018 रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी नांदेड, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नांदेड, कृषि उत्पन्न बाजार समिती मुदखेड यांचे सुचना फलकावर प्रसिध्द करण्यात येणार आहे. असे प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 1133 नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत  भाजपचे 5, शिवसेनेचे 3 तर राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 उमेदवार विजयी  नां...