Monday, June 4, 2018

सुधारीत वृत्त क्र. 433


हिशोब पत्रके सादर न करणाऱ्या
संस्थांची तीसरी यादी प्रसिद्ध ;
विश्वस्तांना खुलासा सादर करण्याचे आवाहन
नांदेड दि. 4 :- संस्था नोंदणी क्र. एफ 9 हजार 568 ते एफ 14 हजार पर्यंतच्या संस्थेनी संस्था स्थापन केल्यापासून हिशोब पत्रके दाखल केली नाहीत, त्या संस्थेची नोंदणी रद्द करण्यासाठी तिसरी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. संबंधीत संस्थेच्या विश्वस्तांनी प्रसिद्ध केलेल्या यादीचे निरीक्षण करुन संस्थेची नोंदणी का रद्द करण्यात येऊ नये, याबाबत खुलासा दिलेल्या तालुकाच्या दिवशी व कार्यालयातील न्याय कक्षात प्रत्यक्ष उपस्थित राहून अथवा वकिलामार्फत सकाळी 11 वा. सादर करावा, असे आवाहन धर्मादाय उपआयुक्त सौ. प्रणिता श्रीनीवार यांनी केले आहे.
संस्थेची यादी कार्यालयाच्या नोटीस बोर्ड व संकेतस्थळावर प्रकाशीत केली आहे. संस्था नोंदणी रद्द करण्याची मोहिम तीनही न्याय शाखेत 9 जुलै 2018 पर्यंत राबविण्यात येणार आहे. संबंधितांनी सुनावणीच्यावेळी सबळ पुराव्यासह आपले म्हणणे मांडण्यासाठी उपस्थित रहावे. अन्यथा गैरहजर राहिल्यास आपले काहीही म्हणणे नाही, असे गृहित धरुन आपली संस्था नोंदणी रद्द करण्यासंबंधी नियमानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे, असेही प्रसिद्ध पत्रकात नमूद केले आहे.
0000000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...