Monday, May 9, 2022

 उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचा नांदेड दौरा  

नांदेड, (जिमाका) दि. 9 :- राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे  दिनांक 10 मे 2022 रोजी नांदेड दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल. 

मंगळवार 10 मे 2022 रोजी मुंबई येथून विमानाने श्री गुरु गोबिंदसिंघजी विमानतळ नांदेड येथे दुपारी 12.15 वा. आगमन. शंभर खाटांच्या जिल्हा रुग्णालयाच्या भूमिपूजन कार्यक्रम स्थळाकडे प्रयाण. दुपारी 12.30 वा. राज्याचे पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल, राजशिष्टाचार मंत्री अदित्य ठाकरे यांच्या समवेत भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- उपजिल्हा रुग्णालय वाडी (बु) नांदेड. दुपारी 1.40 वा. डी-एसटीपी प्रकल्पास भेट व पाहणी. स्थळ- विसावा गार्डन नांदेड. दुपारी 2 वा. नांदेड येथून मोटारीने परभणीकडे प्रयाण करतील. परभणी येथून रात्री 8.20 वा. श्री गुरू गोबिंदसिंघजी विमानतळ नांदेड येथे आगमन व राखीव. रात्री 8.30 वा. मंत्री अदित्य ठाकरे यांच्या समवेत विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.

00000   

 नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक-2022

नगरपरिषदांच्या प्रारुप प्रभाग रचनेवर आक्षेप, हरकती,

सूचना असल्यास 14 मे पर्यत सादर कराव्यात

-       -  जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर 

नांदेड (जिमाका) दि. 9 :-  जिल्ह्यातील कंधार, मुखेड, देगलूर, बिलोली, कुंडलवाडी, धर्माबाद, उमरी, भोकर, मुदखेड व हदगाव नगरपरिषदांच्या प्रारुप प्रभाग रचनेवर ज्या कोणत्याही व्यक्तींचे आक्षेप / हरकती / सूचना असल्यास त्यांनी कारणासह संबंधित नगरपरिषदांच्या मुख्याधिकारी यांच्या कार्यालयात मंगळवार 10 मे ते शनिवार 14 मे 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यत लेखी सादर कराव्यात. शनिवार 14 मे रोजी दुपारी 3 वाजेनंतर आलेले आक्षेप / हरकती / सूचना विचारात घेतली जाणार नाहीत. याची सर्व संबंधितानी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

राज्य निवडणूक आयोगाच्या 6 मे 2022 रोजीच्या पत्रान्वये माहे मे 2020 ते मार्च 2022 मध्ये मुदत संपलेल्या नांदेड जिल्ह्यातील कंधार, मुखेड, देगलूर, बिलोली, कुंडलवाडी, धर्माबाद, उमरी, भोकर, मुदखेड व हदगाव या नगरपरिषदांच्या सदस्य पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सुधारीत प्रभाग रचना कार्यक्रम-2022 जाहीर केला आहे. 

या कार्यक्रमानुसार नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेली संबंधित नगरपरिषदेची प्रारुप प्रभाग रचना, प्रभागदर्शक नकाशे (महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 10 नुसार) रहिवाशांच्या माहितीसाठी संबंधित नगरपरिषद कार्यालयात उपलब्ध आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावरही प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

00000

 पर्यटन मंत्री अदित्य ठाकरे यांचा नांदेड दौरा 

नांदेड, (जिमाका) दि. 9 :- राज्याचे पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल, राजशिष्टाचार मंत्री अदित्य ठाकरे हे दिनांक 10 मे 2022 रोजी नांदेड दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल. 

मंगळवार 10 मे 2022 रोजी मुंबई येथून खाजगी विमानाने श्री गुरु गोबिंदसिंघजी विमानतळ नांदेड येथे दुपारी 12.15 वा. आगमन. शंभर खाटांच्या जिल्हा रुग्णालयाच्या भूमिपूजन कार्यक्रम स्थळाकडे प्रयाण. दुपारी 12.30 वा. भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1.40 वा. डीएसटीपी प्रकल्पास भेट व पाहणी. दुपारी 2 वा. मोटारीने परभणीकडे प्रयाण करतील. परभणी येथून रात्री 8.20 वा. श्री गुरू गोबिंदसिंघजी विमानतळ नांदेड येथे आगमन व राखीव. रात्री 8.30 वा. खाजगी विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.

00000   

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...