Monday, August 28, 2023

अंगणवाडी मदतनीस (मानधनी) भरती यादीबाबत आक्षेप असल्यास 11 सप्टेंबरपर्यंत कळविण्याचे आवाहन

 अंगणवाडी मदतनीस (मानधनी) भरती यादीबाबत

आक्षेप असल्यास 11 सप्टेंबरपर्यंत कळविण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 28 :- बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा नांदेड या कार्यालयातील अंगणवाडी मदतनीसांचे रिक्त पदे सरळ नियुक्तीने भरण्यात येत आहेत. पात्र नगरपरिषद/नगरपंचायत/नगरपालिका अंतर्गत स्थानिक रहिवासी असलेल्या महिला उमेदवारांकडून 10 जुलै 2023 पर्यत विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात आले होते.

त्या अनुषंगाने पात्र अपात्र उमेदवारांची यादी http//nanded.gov.in या संकेतस्थळावर तसेच संबंधित नगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायत यांचे नोटीस बोर्डावर 28 ऑगस्ट 2023 रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. तरी प्रसिध्द यादीबाबत काही आक्षेप असल्यास 11 सप्टेंबर 2023 पर्यत बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा नांदेड कार्यालयात लेखी पुराव्यासह अर्ज सादर करावेतअसे आवाहन बाल विकास प्रकल्प अधिकारी व्हि.एस. बोराटे यांनी केले आहे.

00000

औद्योगिक प्रशिक्षण संस्था लोहा येथील पदभरतीला तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती

 औद्योगिक प्रशिक्षण संस्था लोहा येथील

पदभरतीला तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती


नांदेड (जिमाका) दि. 28 :- औद्योगिक प्रशिक्षण संस्था लोहा येथे विविध पदासाठी तासिका तत्वावर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पद भरतीचे आयोजन करण्यात आले होते.

संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबई यांच्या सूचनेनुसार ही तासिका तत्वावरील पदभरती निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पुढील आदेशापर्यत स्थगित करण्यात आली आहे. संबंधित उमेदवारांनी यांची नोंद घ्यावी, असे आवाहन लोहा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांनी केले आहे.

0000    

विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देवून जात वैधता प्रमाणपत्राचे मुदतीत वितरण

 विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देवून

जात वैधता प्रमाणपत्राचे मुदतीत वितरण

नांदेड (जिमाका) दि. 28 :-  विविध व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राखीव प्रवर्गातून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता असते.  प्रवेश घेवू इच्छिणारे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नयेयासाठी जात पडताळणी समितीकडून त्यांनी सादर केलेल्या प्रस्तावांवर प्राधान्याने कार्यवाही करुन मुदतीच्या आत प्रमाणपत्र वितरीत केले. चालू शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये कार्यालयात एकूण 444 प्रस्ताव दाखल करण्यात आले होते. त्यापैकी 383 प्रस्तावामध्ये वैधतेचा निर्णय घेवून अर्जदारांना वैधता प्रमाणपत्र ऑनलाईन पध्दतीने निर्गमित केले आहेत, अशी माहिती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य अनिल शेंदारकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

यातील जाती दावा सिध्द  करुन शकलेल्या प्रकरणांमध्ये अवैध निर्णय घेऊन आदेश पारित करण्यात आले. ज्या प्रकरणामध्ये कागदपत्रे अपूर्ण आहेत अशा एकूण 16 प्रकरणामध्ये अर्जदार यांना त्यांनी दिलेल्या प्रस्तावामध्ये नमूद केलेल्या दूरध्वनी क्रमांकावर तसेच ईमेलद्वारे त्रुटी पुर्तता करणेबाबत कळविण्यात आले आहे.  काही त्रुटीयुक्त प्रकरणे पोलीस दक्षता पथक यांचेकडे शालेय  गृह चौकशी करीता वर्ग करण्यात आलेली आहेतत्याचबरोबर समितीने कागदपत्रे पुरावे अभावी त्रुटी आढळून आलेल्या प्रकरणांमध्ये अर्जदार यांना एसएमएस  ईमेलद्वारे कळवून देखील विहित मुदतीत त्रुटीची पुर्तता केलेली नाहीत अशी  एकूण 42 प्रकरणे समितीने तात्काळ निकाली काढून अर्जदार यांना न्हा नव्याने परिपूर्ण प्रस्ताव दाखल करण्यासाठी परत केली आहेत.

ज्या प्रकरणामध्ये कागदत्रे पुराव्याअभावी त्रुटी आढळून आलेल्या आहेतअशा प्रकरणांमध्ये अर्जदारांनी तात्काळ समिती कार्यालयात उपस्थित राहून त्रुटीची पुर्तता करावीज्या प्रकरणामध्ये विहित मुदतीत त्रुटीची पुर्तता  केलेली प्रकरणे निकाली काढून अर्जदारांना परत केलेली आहेतअशा प्रकरणांमध्ये देखील अर्जदारांनी तात्काळ परिपूर्ण कागदपत्रासह नव्याने ऑनलाईन अर्ज भरुन लवकर समितीकडे दाखल करावेत. या प्रकरणांमध्ये देखील मागासवर्गीय विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमापासून जात वैधता प्रमाणपत्रा अभावी वंचित राहू नयेत. यासाठी समितीस्तरावर प्राधान्याने तात्काळ कार्यवाही करुन जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येतील,  असे समितीचे अध्यक्ष सुनिल महेंद्रकरउपायुक्त तथा सदस्य अनिल शेंदारकर  संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव  बापू दासरी यांनी आवाहन केले आहे.

00000

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नांदेड विमानतळावर आगमन व परभणीकडे प्रस्थान

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार

यांचे नांदेड विमानतळावर आगमन व परभणीकडे प्रस्थान

 

नांदेड (जिमाका) दि. 27 :- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नांदेड विमानतळावर आगमन झाले. यावेळी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकरखासदार हेमंत पाटीलआमदार राम पाटील रातोळीकरआमदार बालाजी कल्याणकरआमदार श्यामसुंदर शिंदेजिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटेमनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडेअप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर आदी मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले.

 

परभणी येथील नियोजित शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विमानतळावरून हेलिकॉप्टरने परभणी कडे प्रयाण केले.

00000

 

उप मुख्यमंत्री अजित पवार यांचा नांदेड दौरा कार्यक्रम

 उप मुख्यमंत्री अजित पवार यांचा नांदेड दौरा कार्यक्रम    

नांदेड (जिमाका) दि. 26 :- महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

  

रविवार 27 ऑगस्ट 2023 रोजी बारामती  येथून विमानाने सकाळी 10.25 वाजता नांदेड विमानतळ येथे आगमन. सकाळी 10.40 वाजता हेलिकॉप्टरने पोलीस परेड मैदान हेलिपॅड परभणीकडे प्रयाण (मा. मुख्यमंत्री). पोलीस परेड हेलिपॅड परभणी येथून हेलिकॉप्टरने दुपारी 2.45 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व राखीव. दुपारी 3.15 वाजता हेलिकॉप्टरने पोलीस मुख्यालय हेलिपॅड बीडकडे प्रयाण करतील.

00000

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नांदेड दौरा कार्यक्रम

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नांदेड दौरा कार्यक्रम    

नांदेड (जिमाका) दि. 26 :- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

  

रविवार 27 ऑगस्ट 2023 रोजी मुंबई विमानतळ येथून शासकीय विमानाने सकाळी 10.35 वाजता नांदेड विमानतळ येथे आगमन व हेलिकॉप्टरने पोलीस परेड हेलिपॅड परभणीकडे ते प्रयाण करतील. पोलीस परेड हेलिपॅड परभणी येथून हेलिकॉप्टरने दुपारी 2.45 वा. नांदेड विमानतळ येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आगमन व शासकीय विमानाने मुंबईकडे ते प्रयाण करतील.

उमरी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्पनिदेशकांच्या आयोजित मुलाखतीना स्थगिती

 उमरी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील

शिल्पनिदेशकांच्या आयोजित मुलाखतीना स्थगिती

 

नांदेड (जिमाका) दि. 26 :- औद्योगिक प्रशिक्षण संस्था उमरी येथे अत्यंत तात्पुरत्या स्वरुपात तासिका तत्वावर शिल्प निदेशकांची पदे भरण्यासाठी 28 ऑगस्ट रोजी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. सदरील पदभरती मुलाखत प्रक्रीया पुढील आदेशापर्यत स्थगीत करण्यात आली आहे, असे उमरी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000 

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...