Monday, August 28, 2023

विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देवून जात वैधता प्रमाणपत्राचे मुदतीत वितरण

 विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देवून

जात वैधता प्रमाणपत्राचे मुदतीत वितरण

नांदेड (जिमाका) दि. 28 :-  विविध व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राखीव प्रवर्गातून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता असते.  प्रवेश घेवू इच्छिणारे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नयेयासाठी जात पडताळणी समितीकडून त्यांनी सादर केलेल्या प्रस्तावांवर प्राधान्याने कार्यवाही करुन मुदतीच्या आत प्रमाणपत्र वितरीत केले. चालू शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये कार्यालयात एकूण 444 प्रस्ताव दाखल करण्यात आले होते. त्यापैकी 383 प्रस्तावामध्ये वैधतेचा निर्णय घेवून अर्जदारांना वैधता प्रमाणपत्र ऑनलाईन पध्दतीने निर्गमित केले आहेत, अशी माहिती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य अनिल शेंदारकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

यातील जाती दावा सिध्द  करुन शकलेल्या प्रकरणांमध्ये अवैध निर्णय घेऊन आदेश पारित करण्यात आले. ज्या प्रकरणामध्ये कागदपत्रे अपूर्ण आहेत अशा एकूण 16 प्रकरणामध्ये अर्जदार यांना त्यांनी दिलेल्या प्रस्तावामध्ये नमूद केलेल्या दूरध्वनी क्रमांकावर तसेच ईमेलद्वारे त्रुटी पुर्तता करणेबाबत कळविण्यात आले आहे.  काही त्रुटीयुक्त प्रकरणे पोलीस दक्षता पथक यांचेकडे शालेय  गृह चौकशी करीता वर्ग करण्यात आलेली आहेतत्याचबरोबर समितीने कागदपत्रे पुरावे अभावी त्रुटी आढळून आलेल्या प्रकरणांमध्ये अर्जदार यांना एसएमएस  ईमेलद्वारे कळवून देखील विहित मुदतीत त्रुटीची पुर्तता केलेली नाहीत अशी  एकूण 42 प्रकरणे समितीने तात्काळ निकाली काढून अर्जदार यांना न्हा नव्याने परिपूर्ण प्रस्ताव दाखल करण्यासाठी परत केली आहेत.

ज्या प्रकरणामध्ये कागदत्रे पुराव्याअभावी त्रुटी आढळून आलेल्या आहेतअशा प्रकरणांमध्ये अर्जदारांनी तात्काळ समिती कार्यालयात उपस्थित राहून त्रुटीची पुर्तता करावीज्या प्रकरणामध्ये विहित मुदतीत त्रुटीची पुर्तता  केलेली प्रकरणे निकाली काढून अर्जदारांना परत केलेली आहेतअशा प्रकरणांमध्ये देखील अर्जदारांनी तात्काळ परिपूर्ण कागदपत्रासह नव्याने ऑनलाईन अर्ज भरुन लवकर समितीकडे दाखल करावेत. या प्रकरणांमध्ये देखील मागासवर्गीय विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमापासून जात वैधता प्रमाणपत्रा अभावी वंचित राहू नयेत. यासाठी समितीस्तरावर प्राधान्याने तात्काळ कार्यवाही करुन जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येतील,  असे समितीचे अध्यक्ष सुनिल महेंद्रकरउपायुक्त तथा सदस्य अनिल शेंदारकर  संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव  बापू दासरी यांनी आवाहन केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...