Monday, August 28, 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नांदेड विमानतळावर आगमन व परभणीकडे प्रस्थान

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार

यांचे नांदेड विमानतळावर आगमन व परभणीकडे प्रस्थान

 

नांदेड (जिमाका) दि. 27 :- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नांदेड विमानतळावर आगमन झाले. यावेळी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, खासदार हेमंत पाटील, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार श्यामसुंदर शिंदे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर आदी मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले.

 

परभणी येथील नियोजित ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विमानतळावरून हेलिकॉप्टरने परभणी कडे प्रयाण केले.

00000

 

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...