Monday, August 23, 2021

 

दहावी, बारावी पुरवणी परीक्षेचे साहित्य बुधवारी संकलन केंद्रावर स्वीकारणार   

नांदेड (जिमाका) दि. 23 :- लातूर विभागीय मंडळांतर्गत इयत्ता दहावी व बारावीच्या सन 2021 मध्ये घेण्यात  येणाऱ्या पुरवणी परीक्षेचे अर्ज ऑनलाईन भरले आहेत त्या विद्यार्थ्यांचे प्रि-लिस्ट, विद्यार्थ्यांच्या याद्या एक्सल सिटमध्ये व आरटीजीएस केलेल्या चलनाची प्रत आदी साहित्य बुधवार 25 ऑगस्ट रोजी पिपल्स हायस्कूल नांदेड या संकलन केंद्रावर सकाळी 11 ते दुपारी 1 व दुपारी 2 ते सायं. 5 यावेळेत मंडळाच्या प्रतिनिधी मार्फत स्विकारणार आहेत. नांदेड जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक व प्राचार्यांनी आपल्या प्रतिनिधीकडे वरीलप्रमाणे सर्व साहित्य देऊन संकलन केंद्रावर जमा करावीत, असे आवाहन लातूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव यांनी केले.

0000

 

मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचा नांदेड दौरा 

नांदेड (जिमाका) दि. 23 :- राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, खार जमिनी विकास, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचा नांदेड दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल. 

मंगळवार 24 ऑगस्ट रोजी मुंबई येथून श्री गुरु गोबिंदसिंघजी विमानतळ नांदेड येथे सकाळी 9.30 वा. आगमन. सकाळी 10 वा. डॉ. शंकरराव चव्हाण स्मृती संग्रहालयास भेट.  सकाळी 11 वा. व्यर्थ व हो बलिदान ! चलो बचाए संविधा व स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार समारंभ कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1 वा. भक्ती लॉन्स नांदेड येथे राखीव. दुपारी 2 वाजेपर्यंत नांदेड, लातूर, परभणी व हिंगोली जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीस उपस्थिती. सायं. 5 वा. शासकिय विश्रामगृह नांदेड येथे पत्रकार परिषद. सायं. 6.30 वा. विशेष विमानाने नांदेड येथून मुंबईकडे प्रयाण करतील.

0000

 

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष नाना पटोले यांचा नांदेड दौरा 

नांदेड (जिमाका) दि. 23 :- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष नाना पटोले हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल. 

मंगळवार 24 ऑगस्ट रोजी मुंबई येथून खाजगी विमानाने सकाळी 9.30 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन. सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत शंकरराव चव्हाण संग्रहालयास भेट. सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत व्यर्थ ना हो बलीदान ! चलो बचाए संविधान व स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार समारंभ कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ कुसूम सभागृह नांदेड. दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंत भक्ती लॉन्स नांदेड येथे राखीव. दुपारी 2 ते सांय 5 वाजेपर्यंत नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीस उपस्थिती स्थळ- भक्ती लॉन्स नांदेड. सायं 5 ते 5.30 वाजेपर्यंत शासकिय विश्रामगृह नांदेड येथे पत्रकार परिषद. सायं 6.30 वा. नांदेड येथून खाजगी विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.

00000  

 

शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांचा नांदेड दौरा   

नांदेड (जिमाका) दि. 23 :- राज्याचे शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड या नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहिल. 

मंगळवार 24 ऑगस्ट रोजी मुंबई येथून खाजगी विमानाने सकाळी 9.30 वा. श्री गुरु गोबिंदसिंघजी नांदेड विमानतळ येथे आगमन. सकाळी 10 ते 10.45 वाजेपर्यंत डॉ. शंकरराव चव्हाण संग्राहालयास भेट. सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत व्यर्थ ना हो बलीदान, चलो बचाए संविधान व स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार समारंभास उपस्थिती. स्थळ कुसूम सभागृह नांदेड. दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंत भक्ती लॉन नांदेड येथे राखीव. दुपारी 2 ते सायं. 5 वाजेपर्यंत नांदेड येथे नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली संघटनात्मक आढावा बैठक स्थळ भक्ती लॉन नांदेड. सायं. 5 ते 5.30 वाजेपर्यंत पत्रकार परिषद स्थळ शासकिय विश्रामगृह नांदेड. सायं. 6.30 वा. नांदेड येथून खासजगी विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.

00000

 

पालकमंत्री अशोक चव्हाण यांचा दौरा

नांदेड (जिमाका) दि. 23 :- राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल. मंगळवार 24 ऑगस्ट रोजी सायं. 6.30 वा. नांदेड येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.

00000

 

 जिल्ह्यातील 101 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण 

नांदेड (जिमाका) दि. 23 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 101 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. यात 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील व्यक्तींना कोव्हॅक्सीन व कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध करुन दिला आहे. मंगळवार 24 ऑगस्ट 2021 रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

मनपा क्षेत्रातील श्री गुरु गोबिंद सिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, रेल्वे हॉस्पिटल, पोर्णिमानगर, सांगवी, करबला, तरोडा, विनायकनगर या 17 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. याचबरोबर श्री गुरु गोबिंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, रेल्वे हॉस्पिटल, पोर्णिमानगर, सांगवी, करबला, तरोडा, विनायकनगर या 17 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. 

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय हदगाव, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा,माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 14 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस तर उपजिल्हा रुग्णालय देगलूर, गोकुंदा येथे 50 डोस उपलब्ध आहेत. तसेच उपजिल्हा रुग्णालय देगलूर,गोकुंदा,  हदगाव, मुखेड ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, मांडवी, लोहा,माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 15 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस तर ग्रामीण रुग्णालय कंधार येथे 50 डोस उपलब्ध आहेत. ग्रामीण भागात 68 प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस देण्यात आले आहेत. 

वरील सर्व लसीकरण केंद्रावर 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोविड-19 लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. यासाठी ऑनलाईन किंवा लसीकरण केंद्रावर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. 

जिल्ह्यात 22 ऑगस्ट 2021 पर्यंत एकुण 9 लाख 43 हजार 23 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. नांदेड जिल्ह्यात 23 ऑगस्टपर्यत कोविड लसींचा साठा खालीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 8 लाख 6 हजार 30 डोस, कोव्हॅक्सीनचे 2 लाख 58 हजार 40 डोस याप्रमाणे एकुण 10 लाख 64 हजार 70 डोस प्राप्त झाले आहेत. 

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्यांच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. जिल्ह्यातील सर्व कार्यक्षेत्रामध्ये कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस 18 ते 44 वयोगटासाठी व 45 वर्षावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस उपलब्ध राहील. यासाठी ऑनलाईन व ऑनस्पॉट नोंदणीची सुविधा उपलब्ध राहिल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले.

00000

 

 पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन  

नांदेड (जिमाका) दि. 23 :- जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी 23 ते 27 ऑगस्ट 2021 या कालावधीत पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात नामांकित कंपनीच्यावतीने बेरोजगार उमेदवारांना या मेळाव्यात रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी ऑनलाईन मुलाखती घेण्यात येणार आहेत. किमान शैक्षणिक पात्रता दहावी, बारावी व कोणत्याही शाखेची पदवी, आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या रोजगार मेळाव्यास ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. कंपनीचे प्रतिनिधी आपल्याशी ऑनलाईन (स्काईप, व्हॉटसॲप, फोन आदीद्वारे) संपर्क साधून आपली ऑनलाईन मुलाखत घेतील. अधिक माहितीसाठी रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचा दुरध्वनी क्रमांक 02462-251674 वर सपंर्क साधवा. 

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या WWW.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर रोजगार इच्छूक उमेदवारांना जॉब सिकर ऑप्शनमध्ये नाव नोंदणीची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. जॉब सिकर ऑप्शन या लिंकवर क्लिक करुन आपल्या युजरनेम व पासवर्डचा वापर करुन लॉगीन करावे. प्रोफाईल मधील पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा या लिंकवर क्लिक करावे. रोजगार मेळाव्याचा नांदेड जिल्हा निवडून फिल्टर या बटणावर क्लिक करावे. नांदेड जिल्हा पंडित दीनदयाल ऑनलाईन जॉब Fair 3 मेळावा असे दिसेल. त्यातील Action या पर्यायाखालील दोन बटणांपैकी पहिल्या बटणावर क्लिक केल्यास मेळाव्याची माहिती दिसेल. दुसऱ्या बटणावर क्लिक केल्यास मेळाव्यात उपलब्ध रिक्त पदे दिसतील व क्लिक केल्यानंतर एक संदेश येईल. हा संदेश काळजीपूर्वक वाचून I Agree बटणावर क्लिक करावे. रोजगार मेळाव्यात उपलब्ध असलेली पदे (पदाचे नाव, शैक्षणिक अहर्ता, आवश्यक कौशल्य, अनुभव, वयोमर्यादा, आरक्षण) दिसेल. शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव, कौशल्य यानुसार पदाची निवड करावी व अर्जाच्या बटणावर क्लिक करावे. त्यानंतर एक संदेश दिसेल हा संदेश काळजी पूर्वक वाचून ओके बटणावर क्लिक करावे. रोजगार मेळाव्यामध्ये आपला ऑनलाईन सहभाग नोंदविला जाईल अशा प्रकारचा संदेश दिसेल अशी माहिती रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी दिली.

00000

 नांदेड जिल्ह्यात 1 व्यक्ती कोरोना बाधित तर 5 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 23 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 228 अहवालापैकी 1 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे निरंक तर अँटिजेन तपासणीद्वारे 1 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 722 एवढी झाली असून यातील 88 हजार 23 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 38 रुग्ण उपचार घेत असून 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 661 एवढी आहे. आजच्या बाधितामध्ये अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड ग्रामीणमध्ये 1 बाधित आढळला. 

आज जिल्ह्यातील 5 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी 2, हिमायतनगर तालुक्यांतर्गत 1, मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृह विलगीकरण 2 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 38 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 10, देगलूर कोविड रुग्णालय 1, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 24, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 3 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 124, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 145 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 6 लाख 99 हजार 492

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 5 लाख 96 हजार 568

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 722

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 88 हजार 23

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 661

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.2 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-6

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-38

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-3

00000

 माजी सैनिकांकडून विशेष गौरव पुरस्कारासाठीचे अर्ज   

नांदेड (जिमाका) दि. 23 :- सैनिक कल्याण विभागाच्यावतीने माजी सैनिक विधवा व त्यांच्या पाल्यांसाठी असलेल्या विशेष गौरव पुरस्कारासाठी अर्ज 15 ऑक्टोंबर 2021 पर्यंत मागविण्यात आले आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळातील  पुरस्कार प्राप्त खेळाडू, साहित्य संगीत, गायन, वादन, नर्तन आदी क्षेत्रातील पुरस्कार विजेते, यशस्वी उद्योजकांचा पुरस्कार मिळविणारे, संगणक क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी करणारे तसेच देश / राज्याची प्रतिष्ठा वाढवतील अशा स्वरुपाचे लक्षणीय काम करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्य आदींना विशेष गौरव पुरस्कार आर्थिक स्वरुपात देण्यात येतो. राष्ट्रीय पातळीवर कामगिरीसाठी 10 हजार व आंतरराष्ट्रीय पातळीसाठी 25 हजारचा पुरस्कार, शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देण्याची तरतुद माजी सैनिकांसाठी असलेल्या कल्याणकारी निधीमध्ये आहे. 

इयत्ता दहावी, बारावीमध्ये 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून विभागात पहिल्या पाच मुलांमधून येणाऱ्या पाल्यांसाठी पदवी, पदव्युत्तरमध्ये विद्यापीठात सर्वप्रथम येणाऱ्या माजी सैनिक, विधवा यांच्या पाल्याना एक रक्कमी गौरव पुरस्कार 10 हजार रुपयांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व पात्र माजी सैनिकांनी या पुरस्कारासाठी अर्ज करावेत. याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड येथे  संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा  सैनिक कल्याण अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

000000

 महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा नांदेड दौरा 

नांदेड (जिमाका) दि. 23 :- राज्याचे महसुल मंत्री बाळासाहेब थोरात हे दि. 24 ऑगस्ट रोजी नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल. मंगळवार सकाळी 9.30 वाजता मुंबई येथून नांदेड विमानतळ येथे आगमन. सकाळी 10 ते 10.45 वाजेपर्यत डॉ. शंकरराव चव्हाण स्मृति संग्रहालयास भेट. सकाळी 11 ते 1 वाजेपर्यत कुसुम सभागृह नांदेड येथील व्यर्थ न हो बलिदान! चलो बचाए संविधान व स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार समारंभ कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1 ते 2 वाजेपर्यत भक्ती लॉन्स येथे राखीव. दुपारी 2 ते 5 वाजेपर्यत नांदेड, लातूर, परभणी व हिंगोली जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीस उपस्थिती. स्थळ: भक्ती लॉन्स, नांदेड. सायं.5 ते 5.30 पत्रकार परिषद. स्थळ: शासकीय विश्रामगृह नांदेड. सायं. 6 वाजता शासकीय विश्रामगृह नांदेड येथून विमानतळाकडे प्रयाण. सायं. 6.15 वाजता नांदेड विमानतळ येथे आगमन व राखीव. 6.30 वाजता नांदेड विमानतळ येथून खाजगी विमानाने मुंबईकडे प्रयाण.

0000

वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांचा नांदेड दौरा 

नांदेड (जिमाका) दि. 23 :- राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्ये मंत्री अमित देशमुख हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल. मंगळवार सकाळी 9.30 वाजता मुंबई येथून नांदेड विमानतळ येथे आगमन. सकाळी 10 ते 10.45 वाजेपर्यत डॉ. शंकरराव चव्हाण स्मृति संग्रहालयास भेट. सकाळी 11 वाजता कुसुम सभागृह नांदेड येथील व्यर्थ न हो बलिदान! चलो बचाए संविधान व स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार समारंभ कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1 ते 2 वाजेपर्यत राखीव (स्थळ- भक्ती लॉन्स, नांदेड). दुपारी 2 ते 5 वाजेपर्यत नांदेड, लातूर, परभणी व हिंगोली जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीस उपस्थिती. स्थळ: भक्ती लॉन्स, नांदेड. सायं.5 ते 5.30 पत्रकार परिषद. स्थळ : शासकीय विश्रामगृह नांदेड सायं. 6 वाजता शासकीय विश्रामगृह नांदेड येथून विमानतळाकडे प्रयाण. सायं. 6.15 वाजता नांदेड विमानतळ येथे आगमन व राखीव. 6.30 वाजता नांदेड विमानतळ येथून खाजगी विमानाने मुंबईकडे प्रयाण.

0000


 

वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय व बंदरे विभागाचे मंत्री अस्लम शेख यांचा नांदेड दौरा 

नांदेड (जिमाका) दि. 23 :- राज्याचे वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री अस्लम शेख हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल. मंगळवार 24 ऑगस्ट 2021 रोजी मुंबई येथून विमानाने सकाळी  9.30 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन. सकाळी 10 ते 10.45 दरम्यान डॉ. शंकरराव चव्हाण स्मृती संग्रहालयास भेट. कुसुम सभागृह नांदेड 11 ते 1 वाजेपर्यत व्यर्थ न हो बलिदान चलो बचाए संविधान व स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार समारंभ कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1 ते 2 वाजेपर्यत भक्ती लॉस नांदेड येथे राखीव. दुपारी 2 ते 5 वाजेपर्यत नांदेड, लातूर, परभणी व हिंगोली जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीस उपस्थिती. स्थळ- भक्ती लॉन्स नांदेड . सायं. 5 ते 5.30 वाजेपर्यत पत्रकार परिषद स्थळ: शासकीय विश्रामगृह नांदेड, सायं. 6.30 वाजता नांदेड येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण.

000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...