Monday, January 4, 2021

 

योग विद्या धाम नांदेड शाखेच्या दिनदर्शिकेचे

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते विमोचन 

नांदेड (जिमाका) दि. 4 :- भारतीय योग विद्या धाम नांदेड यांच्यावतीने सन 2021 दिनदर्शिकचे विमोचन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात आज करण्यात आले. याप्रसंगी नायब तहसिलदार सुनिल माचेवाड तसेच भारतीय योग विद्याधामचे पदाधिकारी सचिव एम. डी. नल्लावार, अध्यक्ष एन. डी. पोलारकर, उपाध्यक्ष रमेश केंद्र यांची उपस्थिती होती.

 

योगविद्या धाम नांदेड शाखेच्यावतीने कोरोना लॉकडाऊन काळात व्यापक प्रमाणात आरोग्याबाबत जनजागृती व योगप्रसाराला चालना दिली. त्यांनी जनतेच्या मनात निर्माण केलेला विश्वासाचा गौरव जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी यावेळी केला.

प्रत्येक वर्षी सेवाभाववृत्तीने दिनदर्शिका प्रकाशीत होत असते. तसेच योग वर्ग दररोज शहरात घेतले जातात. कामगार कल्याण केंद्र नांदेड येथे मुख्य कार्यालय असून याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

000000

 

32 कोरोना बाधितांची भर तर

28 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

नांदेड (जिमाका) दि. 4 :- सोमवार 4 जानेवारी 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 32 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 25 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 7 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 28 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.  

आजच्या 624 अहवालापैकी 585 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 21 हजार 598 एवढी झाली असून यातील 20 हजार 494 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 328 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 12 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 575 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.     

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 3, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 11, भोकर तालुक्यांतर्गत 1, कंधार तालुक्यांतर्गत 1, देगलूर कोविड रुग्णालय 2, किनवट कोविड रुग्णालय 1, माहूर तालुक्यांतर्गत 4, खाजगी रुग्णालय 5 असे एकूण 28 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.88 टक्के आहे.   

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 18, अर्धापूर तालुक्यात 2, माहूर 2, नांदेड ग्रामीण 1, देगलूर 2 असे एकुण 25 बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 1, किनवट तालुक्यात 1, कंधार 1, मुखेड 4 असे एकुण 7 बाधित आढळले.   

जिल्ह्यात 328 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 12, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 20, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे 15, मुखेड कोविड रुग्णालय 18, हदगाव कोविड रुग्णालय 1, देगलूर कोविड रुग्णालय 18, किनवट कोविड रुग्णालय 1, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 159, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 46, हैद्राबाद येथे संदर्भीत 3, खाजगी रुग्णालय 35 आहेत.   

सोमवार 4 जानेवारी 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 176, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 67 एवढी आहे.   

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 85 हजार 106

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 59 हजार 416

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 21 हजार 598

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 20 हजार 494

एकुण मृत्यू संख्या-575

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.88 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-03

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-03

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-395

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-328

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-12.           

000000

 

जिल्हा उद्योग केंद्राच्या

सल्लागार व इतर सभांचे 5 जानेवारीला आयोजन

नांदेड (जिमाका) दि. 4 :- जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयाच्या विविध सभा यात जिल्हा उद्योग मित्र समिती सभा जिल्हा सल्लागार समिती सभा, स्थानिक लोकांना रोजगारात प्राधान्य जिल्हास्तरीय समिती सभा व आजार उद्योग पुनर्जिवन जिल्हास्तरीय समिती सभा मंगळवार 5 जानेवारी 2020 रोजी जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली हॉटेल मंजु पॅलेस टेस्कोम एमआयडीसी पॅलेस टेस्कोमच्या समोर नांदेड येथे सकाळी 11 वा. आयोजित करण्यात आली आहे. संबंधितांनी या सभांना उपस्थित रहावे, असे आवाहन महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र नांदेड यांनी केले आहे.

000000

 

जिल्हा उद्योग केंद्राच्या

सल्लागार व इतर सभांचे 5 जानेवारीला आयोजन

नांदेड (जिमाका) दि. 4 :- जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयाच्या विविध सभा यात जिल्हा उद्योग मित्र समिती सभा जिल्हा सल्लागार समिती सभा, स्थानिक लोकांना रोजगारात प्राधान्य जिल्हास्तरीय समिती सभा व आजार उद्योग पुनर्जिवन जिल्हास्तरीय समिती सभा मंगळवार 5 जानेवारी 2020 रोजी जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली हॉटेल मंजु पॅलेस टेस्कोम एमआयडीसी पॅलेस टेस्कोमच्या समोर नांदेड येथे सकाळी 11 वा. आयोजित करण्यात आली आहे. संबंधितांनी या सभांना उपस्थित रहावे, असे आवाहन महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र नांदेड यांनी केले आहे.

000000

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...