Friday, January 6, 2017

ध्येयनिष्ठ होऊन परीक्षेची तयारी करावी
- भुपेन्द्र भारव्दाज
नांदेड दि. 6 :- स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विविध क्षेत्रानोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. यात यश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करुन परीक्षेची तयारी करावी , असे प्रतिपादन भारतीय रेल्वे सेवा अधिकारी भूपेन्द्र भारव्दाज यांनी केले.
डॉ. शंकरराव चव्हाण सभागृहामध्ये दरमहा  5 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालय सेतू समिती, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय नांदेड यांच्यावतीने उज्वल नांदेड मोहिमेअतंर्गत आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरामध्ये ते बोलत होते. यावेळी कंधार उपविभागीय अधिकारी डॉ. जित थोरबोले, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. अजितथोरबोले यांनी सी-सॅट या विषयावर विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन करताना प्रश्नाचे उत्तर सोडवताना केवळ प्रश्नामध्ये नमूद वाक्याचा विचार करता आपल्या आकलन शक्तीचा वापर करुन त्तर देणे फायदाचे ठरते असे सांगून नजीकच्या काळामध्ये होऊ घातलेल्या एसटीआय, पीएसआय त्यादी परीक्षेची तयारी कशी करावी याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
व्याखयात्यांना ग्रामगीता देऊन स्वागत केल्यानंतर जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांनी प्रास्ताविक व्याख्यात्यांचा परिचय करुन दिला. यावेळी विद्यार्थ्यांना सराव चाचणी प्रश्नपत्रिका संचाचे नि:शुल्क वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन ग्रंथपाल आरती कोकुलवार यांनी तर आभार सत्येंद्र आऊलवार यांनी मानले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी संजय कर्वे, अजय वटृमवार, कोंडिबा गाडेवाड, बाळू पावडे, रघुवीर, लक्ष्मण शेनवाड, विठ्ठ यनगुलवाड, सोपान यनगुलवाड आदीने सहकार्य केले.

0000000

कृपया सोबतच्या दोन्ही वृत्तास आपल्या लोकप्रिय दैनिकातून प्रसिद्धी दयावी ही विनंती.

 8 जानेवारीला आरोग्य विभागाची लेखी परीक्षा
वेळापत्रक जाहीर,ऑनलाईन प्रवेशपत्र काढण्याचे उमेदवारांना आवाहन

नांदेड , दि. 6 :- उपसंचालक आरोग्य सेवा  लातूर मंडळ अंतर्गत लातूर, उस्मानाबाद, बीड आणि नांदेड जिल्हयातील गट क संवर्गातील तांत्रिक व अतांत्रिक रिक्त पदे भरण्यासाठी लेखी परिक्षेचे आयोजन दिनांक 8 जानेवारी 2017 रोजी करण्यात आले आहे.
  परीक्षेचे वेळापत्रक आरोग्य विभागाच्या http://arogya.maharashtra.gov.in या तसेच महाऑनलाईनच्या  http://maharecruitment.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच परिक्षेचे प्रवेशपत्र (HALL TICKET) http://maharecruitment.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. उमेदवारांनी त्यांच्याकडील Login id Password यांचा वापर करुन  प्रवेश पत्रिका Download करावी त्याची प्रिंट सोबत आणावी. प्रवेशपत्र  टपालाने  पाठविण्यात येणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी. याबाबत अधिक माहितीसाठी मे. महाऑनलाईन लि. या संस्थेच्या सहायक केंद्रास 022-61316403 या दूरध्वनीवर संपर्क साधावा. परिक्षा केंद्रावर यासंदर्भातील कोणतीही तक्रार ऍकूण घेतली जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे डॉ. व्ही.एम कुलकर्णी, उपसंचालक आरोग्य सेवा लातूर मंडळ , लातूर यानी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

00000000
राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार- 2016 साठी
 प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन
नांदेड , दि. 6 : राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, सोशल मीडिया आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लिखाणासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2016 ते 31 डिसेंबर, 2016 पर्यंतच्या कालावधीत प्रसिध्द झालेल्या लेखनाच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिनांक 31 जानेवारी, 2017 असा आहे.
स्पर्धकांनी जिल्हा माहिती कार्यालयाकडून, तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय (तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय,मुंबई-32) येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in किंवा  www.maharashtra.gov.in तसेच www.mahanews.gov.inया संकेतस्थळांवरही उपलब्ध आहेत.  
राज्यस्तरीय पुरस्कारांची माहिती पुढीलप्रमाणे  बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी), अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी), बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी), मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार(उर्दू), यशवंतराव चव्हाण पुरस्कार - शासकीय गट (मराठी) (मा. व ज.), पु. ल. देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार, तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार, केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट (मा.व ज.), सोशल मीडिया पुरस्कार, स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (सर्व पुरस्कार प्रत्येकी 51 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
विभागीय पुरस्कारांची माहिती पुढीलप्रमाणे  अनंतराव भालेराव पुरस्कार (औरंगाबाद विभाग) (लातूरसह), आचार्य अत्रे पुरस्कार (मुंबई विभाग), नानासाहेब परूळेकर पुरस्कार (पुणे विभाग), शि. म. परांजपे पुरस्कार (कोकण विभाग), ग. गो. जाधव पुरस्कार (कोल्हापूर विभाग), लोकनायक बापूजी अणे पुरस्कार (अमरावती विभाग), ग. त्र्यं. माडखोलकर पुरस्कार (नागपूर विभाग) (सर्व पुरस्कार प्रत्येकी 51हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) तर दादासाहेब पोतनीस पुरस्कार (नाशिक विभाग) (51 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र तसेच याव्यतिरिक्त रुपये 10 हजार दै. गावकरीने पुरस्कृत केले आहेत.) या स्पर्धेत राज्यातील पत्रकारांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

********
 पीक विम्यासाठी 10 जानेवारी अंतिम मुदत

नांदेड , दि. 6 :- राष्ट्रीय पीक विमा योजना 2016-17 रब्बी गहु(बा),गहु(जि),ज्वारी(बा), ज्वारी (जि) हरभरा, करडई, सुर्यफुल रब्बी कांदा या पीकासाठी विमा प्रस्ताव बॅंकेत भरण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2016  होती. तथापि शेतक-यांना मोठ्या प्रमाणावर या योजनेचा लाभ व्हावा या हेतूने महाराष्ट्र शासनाने मुदत वाढ केली असुन आता अंतिम मुदत दिनांक 10 जानेवारी 2017  अशी करण्यात आली आहे.तसेच उन्हाळी भात उन्हाळी भुईमुग या पिकासाठी विमा प्रस्ताव बॅंकेत भरण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2017 आहे. तरी शेतक-यांनी या मुदतवाढीचा लाभ घ्यावा असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकानव्ये केले आहे.
   
पत्रकारितेसमोरच्या आव्हानांवर मात करण्यासाठी
तत्वनिष्ठा, प्रामाणिकपणा यातूनच बळ मिळेल
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना दर्पणदिन निमित्त अभिवादन
नांदेड, दि. 6:-  पत्रकारितेसमोर आव्हाने येतच असतात. पण या आव्हांनावर मात करण्यासाठी तत्वनिष्ठा आणि प्रामाणिकपणा याद्वारेच पत्रकारांना बळ मिळेल, असा सूर आज येथे व्यक्त झाला. निमित्त होते, दर्पण दिनानिमित्त आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालय नांदेड आणि महात्मा गांधी मिशन संचलित वृत्तपत्र विद्या माध्यमशास्त्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमाचे. अध्यक्षस्थानी महात्मा गांधी मिशन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कमलकिशोर कदम होते.
एमजीएम शिक्षण संकुलातील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार देवदत्त तुंगार, पोलीस उपअधीक्षक अशोक बनकर, ज्येष्ठ पत्रकार सु. मा. कुलकर्णी, गोविंद मुंडकर, जिल्हा माहिती अधिकारी दिलीप गवळी, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॅा. गीता लाटकर, महाविद्यालयाचे ग्रंथपाल गोविंद हंबर्डे, वृत्तपत्र विद्या माध्यमशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॅा.गणेश जोशी, माहिती अधिकारी निशिकांत तोडकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमास विविध माध्यमांचे प्रतिनिधी, महाविद्यालयातील पत्रकारितेचे विद्यार्थी उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात श्री. कदम यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची तत्त्वनिष्ठा ते देशातील अलिकडच्या काळापर्यंतच्या तत्त्वनिष्ठ आणि ध्येयवादी पत्रकारितेच्या गौरवपुर्ण वाटचालीचा उल्लेख केला. तत्त्वनिष्ठा, सत्य तीच बातमी आणि बातमीत सत्य असायलाच हवे या धारणेबाबत श्री. कदम यांनी भाष्य केले.
ज्येष्ठ पत्रकार श्री. कुलकर्णी यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात सदैव विद्यार्थ्याच्या भुमिकेत राहण्याने, ज्ञानार्जनाची आस बाळगावी लागते. पत्रकारितेत टिकण्यासाठी नेहमीच शिकण्याची भुमिका ठेवावी लागते, असे सांगितले. पोलीस उपअधीक्षक श्री. बनकर यांनी पत्रकारितेतील नवे प्रवाह आणि माध्यम क्षेत्रासमोर टाकलेली आव्हानांवर प्रकाश टाकला. पत्रकारिता आणि प्रशासनादरम्यानच्या विश्वासार्हतेतून लोकाभिमुख सेवा देता येते, यावर त्यांनी भर दिला. ज्येष्ठ पत्रकार प्रा. तुंगार यांनी दर्पणकार आचार्य जांभेकर यांचे जीवन वृत्त उलगडून दाखविले, तसेच वृत्त लेखन आणि वृत्तपत्रांसाठीच्या लेखनातील वैविध्य यावर मार्गदर्शन केले. मराठी भाषेचे सौंदर्य आणि व्याकरणाचे महत्त्व प्रा. तुंगार यानी विशद केले. जिल्हा माहिती अधिकारी श्री. गवळी आणि पत्रकार मुंडकर यांचीही समयोचित भाषणे झाली.

सुरवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन तसेच दिपप्रज्वलन करण्यात आले. महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी प्रकाशित केलेल्या स्पंदन भित्तीपत्रिकेचेही मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. प्राचार्य डॅा. जोशी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राध्यापकवृंद आदींचीही उपस्थिती होती. पत्रकार भारत दाढेल यांनी सुत्रसंचालन केले. प्रा. पी. डी. सेलूकर, प्रा. सतिश वाघरे, प्रा. राज गायकवाड यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. छाया नाग्रतवार यांनी आभार मानले.
0000000
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना
माहिती कार्यालयात अभिवादन
नांदेड, दि. 6 - जिल्हा माहिती कार्यालय नांदेड येथे दर्पण दिनानिमित्त दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यात आले. जिल्हा माहिती अधिकारी दिलीप गवळी यांच्या हस्ते कार्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी श्री. गवळी यांनी विविध माध्यमातील प्रतिनिधी, पत्रकार यांना दर्पण दिन आणि पत्रकार दिनाच्या शुभेच्छाही दिल्या.

यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे लातूर विभागाचे सचिव तथा सामनाचे प्रतिनिधी विजय जोशी, माहिती अधिकारी निशिकांत तोडकर यांनीही आचार्य जांभेकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. याप्रसंगी छायाचित्रकार विजय होकर्णे यांच्यासह अलका पाटील, काशिनाथ आरेवार, महमंद यूसूफ, प्रवीण बिदरकर, बालनरसय्या अंगली, चंद्रकांत आराध्ये आदींची उपस्थिती होती.

000000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...