Friday, January 6, 2017

ध्येयनिष्ठ होऊन परीक्षेची तयारी करावी
- भुपेन्द्र भारव्दाज
नांदेड दि. 6 :- स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विविध क्षेत्रानोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. यात यश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करुन परीक्षेची तयारी करावी , असे प्रतिपादन भारतीय रेल्वे सेवा अधिकारी भूपेन्द्र भारव्दाज यांनी केले.
डॉ. शंकरराव चव्हाण सभागृहामध्ये दरमहा  5 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालय सेतू समिती, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय नांदेड यांच्यावतीने उज्वल नांदेड मोहिमेअतंर्गत आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरामध्ये ते बोलत होते. यावेळी कंधार उपविभागीय अधिकारी डॉ. जित थोरबोले, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. अजितथोरबोले यांनी सी-सॅट या विषयावर विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन करताना प्रश्नाचे उत्तर सोडवताना केवळ प्रश्नामध्ये नमूद वाक्याचा विचार करता आपल्या आकलन शक्तीचा वापर करुन त्तर देणे फायदाचे ठरते असे सांगून नजीकच्या काळामध्ये होऊ घातलेल्या एसटीआय, पीएसआय त्यादी परीक्षेची तयारी कशी करावी याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
व्याखयात्यांना ग्रामगीता देऊन स्वागत केल्यानंतर जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांनी प्रास्ताविक व्याख्यात्यांचा परिचय करुन दिला. यावेळी विद्यार्थ्यांना सराव चाचणी प्रश्नपत्रिका संचाचे नि:शुल्क वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन ग्रंथपाल आरती कोकुलवार यांनी तर आभार सत्येंद्र आऊलवार यांनी मानले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी संजय कर्वे, अजय वटृमवार, कोंडिबा गाडेवाड, बाळू पावडे, रघुवीर, लक्ष्मण शेनवाड, विठ्ठ यनगुलवाड, सोपान यनगुलवाड आदीने सहकार्य केले.

0000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 1133 नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत  भाजपचे 5, शिवसेनेचे 3 तर राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 उमेदवार विजयी  नां...