Saturday, June 22, 2019


सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या
प्रशासक पॅनलसाठी अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड दि 22 :- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 चे कलम 77, 78, 78अ अन्वये जिल्ह्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थावर नेमण्यात येणाऱ्या प्राधिकृत अधिकारी (प्रशासक) यांचे पॅनलबाबत अर्ज मागविण्यात येत आहेत.  
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 77, 78, 78,) अन्वये जिल्ह्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थावर नेमण्यात येणाऱ्या प्राधिकृत अधिकारी (प्रशासक) यांचे पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी व सहकार व लेखा पदविका (जी. डी. सी. ॲण्ड ए)/ उच्चतम सहकार पदविका (एच.डी. सी.) धारक, चाटर्ड अकाऊटंट (सी. .)/इन्सिटटयूट ऑफ वर्कस अकाऊटंट (आय. सी. डब्ल्यू. .)/ कंपनी सेक्रेटरी (सी. एस.), सहकार खात्यातील प्रशासन / लेखापरीक्षण विभागातील अधिकारी/कर्मचारी, नागरी/कर्मचारी सहकारी बँकेमध्ये व्यवस्थापक यांचेकडून मागविण्यात येत आहेत, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नांदेड यांनी केले आहे.
अर्जाचे विहीत नमुने विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, लातूर विभाग लातूर, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, लातूर / उस्मानाबाद / बीड / नांदेड व लातूर विभागातील सर्व तालुका उपनिबंधक/सहायक निबंधक, सहकारी संस्था या कार्यालयात दिनांक 27 जून, 2019 ते 31 ऑगस्ट, 2019 या कालावधीत कार्यालयीन वेळेत मिळू शकतील. याबाबतची जाहीर सूचना या कार्यालयाचे नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे, असेही आवाहन करण्यात आले आहे.  
00000


  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...