Tuesday, October 3, 2023

 महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेता

विजय वडेट्टीवार यांचा नांदेड दौरा

                                                                                                          

नांदेड, (जिमाका) दि. 3 :- महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.

 

बुधवार 4 ऑक्टोंबर 2023 रोजी मुंबई येथून खाजगी विमानाने सकाळी 10.30 वा. नांदेड विमानतळावर आगमन. सकाळी 10.45 वा. नांदेड विमानतळावरून डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय नांदेडकडे प्रयाण. सकाळी 11.15 वा. डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे आगमन व अधिकाऱ्यांसमवेत चर्चा. दुपारी 12.15 वा. शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण. दुपारी 12.35 वा. शासकीय विश्रामगृह येथे आगमन. दुपारी 1 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे पत्रकार परिषद. दुपारी 1.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून नांदेड विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 1.40 वा. नांदेड विमानतळावर आगमन. दुपारी 2 वा. खाजगी विमानाने छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील.

0000  

 प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगामाअंतर्गत  

हदगाव व हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांना

अनुक्रमे 42 कोटी 36 लाख व 13 कोटी 89 लाख रुपये रक्कम वितरीत 

नांदेड (जिमाका) दि. 2 :- पिक विमा कंपनी  मार्फत प्राप्त माहिती नुसार हदगाव तालुक्यातील 82 हजार 488 व हिमायतनगर तालुक्यातील 44 हजार 57 शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2022 मध्ये पिक विमा उतरविला होता. त्यापैकी हंगामातील प्रतिकूल परिस्थिती (मिड सिझन अँडव्हर्सिटी) अंतर्गत 42 कोटी 36 लाख रुपये व 13 कोटी 89 लाख रुपये रक्कम अनुक्रमे हदगाव व हिमायतनगर तालुक्यातील सोयबीन, ख. ज्वारी, तूर आणि कापूस पिकाच्या विमाधारक सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. 

पिक विमा योजनेत स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणी पश्चात नुकसान या घटकाअंतर्गत प्राप्त जवळपास हदगाव तालुक्यातील 41 हजार 734 व 23 हजार 553 हिमायतनगर तालुक्यातील   पूर्वसूचनांचे पंचनामे करून अनुक्रमे 8 कोटी 58 लाख रुपये व 7 कोटी 2 लाख रुपये रक्कम हदगाव व हि.नगर तालुक्यातील शेतकऱ्यांना वाटप करण्यात आली आहे. अशाप्रकारे हदगाव व हि.नगर तालुक्यातील सन 2022-23 मध्ये विविध घटकाअंतर्गत अनुक्रमे एकूण 50 कोटी 94 लाख रुपये व 20 कोटी 90 लाख रुपये रक्कम वाटप करण्यात आलेली  आहे.  या व्यतिरिक्त 75 टक्के नुकसान भरपाई अशी कुठल्याही प्रकारची वेगळी तरतूद पिक विमा योजनेमध्ये नाही. याबाबत शेतकऱ्यांनी संभ्रम दूर करावा. समाजमाध्यमावरील संदेशानुसार अर्ज करू नयेत असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे. 

हदगाव व हिमायतननगर तालुक्यातील सर्व महसूल मंडळातील प्रत्येकी एका गावातील पिक विमा भरलेल्या व पिक विमा मिळालेल्या शेतकऱ्यांचा तपशील प्रातिनिधिक स्वरूपात एका आठवड्यात सादर करण्याच्या सूचना विमा कंपनीला दिल्या आहेत. त्यामुळे उपोषण कर्त्यानी उपोषणापासून परावृत्त व्हावे, अशी विनंती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केली आहे.

00000

  वृत्त 

महाराष्ट्र विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेता

अंबादास दानवे यांचा नांदेड दौरा                                                                                                            

नांदेड, (जिमाका) दि. 3 :- महाराष्ट्र विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेता अंबादास दानवे हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.   

बुधवार 4 ऑक्टोंबर 2023 रोजी हैद्राबाद येथून मोटारीने सकाळी 3.40 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व मुक्काम. सकाळी 7 वा. मोटारीने डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेडकडे प्रयाण. सकाळी 7.30 वा. डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय नांदेड येथे आगमन व भेट. सकाळी 9 वा. पत्रकार परिषद स्थळ- डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड. सकाळी 10 वा. मोटारीने हैद्राबादकडे प्रयाण करतील.

0000  

 वृत्त

 

पालकमंत्री गिरीश महाजन व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

यांची नांदेड येथील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास तातडीने भेट देऊन पाहणी

 

·    सुधारणेसाठी काही कमी पडू दिले जाणार नाही

-         पालकमंत्री गिरीश महाजन    

·    वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त पदे तात्काळ भरले जातील

-         वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ  

                                                                                                           

नांदेड, (जिमाका) दि. 3 :- डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे गंभीर आजारी असलेली बालके दगावल्याची घटना अत्यंत दुर्देवी आहे. याची तात्काळ गंभीर दखल घेऊन राज्याचे ग्राम विकास व पंचायत राज, पर्यटन मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना सोबत घेऊन आज भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. नांदेड येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल असलेल्या गंभीर आजारी रुग्णांची पाहणी करून त्यांनी वस्तुस्थिती समजून घेतली. याचबरोबर वरिष्ठ पातळीवर आढावा बैठक घेऊन निर्देश दिले.

 

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालयाच्या इमारतीत वरिष्ठ पातळीवर बैठकीत त्यांनी आढावा घेतला. या बैठकीस राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार राजेश पवार, आमदार शामसुंदर शिंदे, आमदार मोहनअण्णा हंबर्डे, वैद्यकीय विभागाचे सचिव दिनेश वाघमारे, वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, सहसंचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, अधिष्ठाता डॉ. एस. आर. वाकोडे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.  

 

रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक पातळीवर मंजूर असलेली वर्ग 4 ची सुमारे 60 कर्मचारी तातडीने भरण्याचे निर्देश वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री गिरीश महाजन यांनी बैठकीत दिले. याचबरोबर वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी वर्ग 3 ची सुमारे 130 कर्मचारी भरण्याची प्रक्रिया शासन स्तरावर झाली असून ती 1 महिन्यात नियुक्त करण्याच्या सूचना आयुक्त राजीव निवतकर यांना मंत्री महोदयांनी दिल्या. वर्ग-1 व वर्ग-2 ची पदे राज्यसेवा आयोगाच्या मार्फत तात्काळ भरण्याबाबत तातडीने प्रक्रिया करण्याचेही त्यांनी सांगितले. औषधासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असे मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. या रुग्णालयातील अस्वच्छता व अल्प कर्मचारी, व्यवस्थापन याचे समर्थन करता येणार नाही. यात सुधारणा करण्यासाठी काहीही कमी पडू देणार नाही, अशी नि:संदिग्ध ग्वाही त्यांनी दिली. खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी या महाविद्यालयातील व रुग्णालयातील दुरावस्था, जिल्ह्यातील रुग्णांची होणारी गैरसोय याकडे मंत्री महोदयांचे लक्ष वेधले.

 

वेळप्रसंगी जिल्हा नियोजन विकास आरखड्यातील काही निधी हा औषध खरेदीसाठी वळविला जावा, अशी सूचना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी या बैठकीत केली.

 

आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार राजेश पवार, आमदार शामसुंदर शिंदे, आमदार मोहनअण्णा हंबर्डे यांनी बैठकीत विविध सूचना केल्या.

 

दिनांक 30 सप्टेंबर ते 1 ऑक्टोंबरच्या कालावधीत एकुण 24 अंतीगंभीर असलेल्या रुग्णांचा मृत्यू झाला. यात 12 ही नवजात शिशू होते. यातील 9 रुग्ण हे खासगी रुग्णालयातून संदर्भीत झालेली होती. पूर्ण दिवस होण्या अगोदर जन्मलेल्या या बालकांचे वजन न भरल्याने जन्मताच त्यांची स्थिती अत्यंत चिंताजनक असल्याची वस्तुस्थिती महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. वाकोडे यांनी बैठकीत दिली. इतर 12 रुग्ण हे वयोवृद्ध होते. त्यांचा वयोगट 70 ते 80 वर्षे होता. यात 4 वयोवृद्ध हृदय विकार, 2 वृद्ध विविध अवयव निकामी झाल्याने तर 1 वयोवृद्ध विषबाधा व उर्वरीत अपघात मृत्यू असल्याची त्यांनी माहिती दिली.

00000

छाया :- सदा वडजे, नांदेड












ज्येष्ठांचा आदर हाच त्यांच्या आनंददायी जीवनाचा मार्ग - मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल

 ज्येष्ठांचा आदर हाच त्यांच्या आनंददायी जीवनाचा मार्ग

-         मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल

नांदेड (जिमाका) दि. 3 :-  ज्येष्ठांचा सन्मान करणे ही आपल्या संस्कृतीची मोठी देण आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्या पाल्यांच्या जडण-घडणीसाठी अनेक कष्टही आनंदाने पार पाडत असतात. याची कृतज्ञतेनी जाणीव ठेवून मुलांनी पालकांना, घरातील ज्येष्ठांचा सन्मान व सेवा सुविधा देण्यावर भर दिला पाहिजे. त्यांना देण्यात येणाऱ्या सेवा व आदरातच त्यांच्या आनंददायी जीवन जगण्याचा मार्ग असल्याचे, प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी केले.

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे कर्तव्याचे देणे या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव व न्यायाधीश दलजीत कौर जज, सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, समाज कल्याण अधिकारी बापु दासरी, मानसोपचार तज्ञ डॉ. नंदकुमार मुलमुले, संधी निकेतन शिक्षण संस्थेचे निवृत्ती वडगांवकर, अर्थक्रांती, राष्ट्रीय आर्थिक साक्षरता मंचाचे विजय देशमुख, मराठवाडा प्रा. विभाग फेस्कामचे अध्यक्ष अशोक तेरकर व ज्येष्ठ नागरिकांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती.  

ज्येष्ठांची काळजी, निगा यासाठी कुटूंबासोबतच शासनही कटिबध्द आहे. शासनाच्या प्रत्येक विभागाच्या वतीने ज्येष्ठांना देण्यात येणाऱ्या सेवा-सुविधाबाबत शासनाचा निर्णय आहे. तसेच त्यांना सन्मानाने जगण्यासाठी अनेक सक्षम कायदे शासनाने केलेले आहेत. ज्येष्ठ नागरिकांनी आपले जीवन सुसह्य करण्यासाठी वेळ प्रसंगी कायद्याचा आधार घेवून निर्भयपणे जीवन जगावे असे मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी सांगितले. तसेच ज्येष्ठ नागरिक अधिनियम 2011 च्या कायद्याचे महत्व उपस्थित नागरिकांना सांगितले. परंतु समाजाने सामाजिक भावनेची जाण ठेवून या कायद्याची अंमलबजावणी करण्याची वेळ येवू नये असेही त्यांनी यावेळी सांगितले.

जीवन जगत असताना ज्येष्ठांनी आपल्या जगण्यातला आनंद शोधला पाहिजे. गरज असेल तरच पाल्यांच्या आयुष्यात लक्ष द्यावे. अन्यथा आपण आपले छंद जोपासण्यावर भर देवून आपले आयुष्य आनंदी जगण्यावर भर दिला पाहिजे. ज्येष्ठ नागरिकांचे कर्तव्य, कामे करण्यासाठी मी त्यांच्या मुलांप्रमाणे सदैव तत्पर असल्याचे मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी सांगितले.

ज्येष्ठांना सन्मानजनक वागणूक देणे हे आपले कर्तव्य

-         न्या. दलजीत कौर जज

घरातील प्रत्येक समस्या सोडविण्यासाठी ज्येष्ठांचे मार्गदर्शन अधिक मोलाचे असते. त्यांच्या फार काही अपेक्षा नसतात. त्यांना आवश्यक असणाऱ्या आरोग्याच्या मुलभूत सुविधा देण्यावर पाल्यांनी भर देवून त्यांना सन्मानाने जगता यावे यासाठी सकारात्मक रहावे, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तथा न्यायाधीश दलजीतकौर जज यांनी केले. आपल्याला मोठे करताना आई-वडील त्यांचे सर्व कर्तव्य निस्वार्थ भावनेने पार पाडत असतात. आता आपण त्यांच्या जीवनाच्या संध्याकाळी आनंदी जीवन जगण्यासाठी आपली जबाबदारी पार पाडून आपल्या कर्तव्याची पूर्ती करणे यावर भर दिला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

आयुष्य हे सुखाच्या शोधाची वाट असून सुखाच्या व्याख्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आहेत. यश, सुख, आनंद, समाधान या संकल्पनावर आधारित मानवाचे आयुष्य असते यांचे विस्तृत भाष्य मानसोपचार डॉ. नंदकुमार मुलमुले यांनी केले. तसेच निरपेक्ष भावनेने इतरासाठी काही करणे यात आनंदाची अर्थपूर्णता असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. प्रत्येक माणसात क्षमाशीलता असली पाहिजे त्यामुळे अनेक समस्या सुटतात. तसेच विपरीत परिस्थितीत संयम ठेवून जीवनावर प्रेम केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.  सुखाच्या शोध या विषयावर बोलतांना त्यांनी अनेक अनुभव सांगितले.

कुटूंबियांसोबत जगताना काही समस्या निर्माण झाल्या तर अनेक कायदे आहेत पण त्यात समाधान नाही. कायद्यापेक्षा प्रेमाने समजावण्यावर भर द्यावा. आपल्या पाल्यांना शिक्षण देतांना आपण आपली संस्कृती विसरत आहोत. मुल घडविणारी शिक्षण पध्दती आपण स्विकारली पाहिजे. त्यामुळे अनेक समस्या आपोआप संपतील असे  संधीनिकेतन संस्थेचे सचिव निवृत्ती वडगावकर यांनी सांगितले. ज्येष्ठ नागरिकांना प्रसन्न व प्रतिष्ठेची जीवनसंध्या होण्यासाठी उच्च दर्जाच्या सेवा-सुविधा देणे हे समाजाचे, शासनाचे कर्तव्य असल्याचे अर्थक्रांती राष्ट्रीय आर्थिक साक्षरता मंचचे विजय देशमुख यांनी सांगितले.

समाज कल्याण कार्यालय, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, फेस्काम मराठवाडा प्रादेशिक विभाग नांदेड यांच्यावतीने आयोजित कर्तव्याचे देणे या कार्यक्रमात ॲड . मनिषा गायकवाड यांनी जेष्ठ नागरिकांसाठी असलेले कायदे याबाबतची माहिती दिली.  प्रास्ताविक सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी तर सुत्र संचालन समाज कल्याण अधिकारी बापु दासरी यांनी केले.

00000  

छाया :- सदा वडजे, नांदेड








 मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)

3 ऑक्टोबर, 2023

 

नांदेड येथील घटनेची मुख्यमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल

 

चौकशीअंती दोषींवर कारवाई करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

मुंबई, दि. 03 : नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात झालेल्या घटनेची शासनाने गंभीर दखल घेतली असून या घटनेची चौकशी करुन त्यात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

 

मंत्रालय येथे आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, याबाबतीत प्राथमिक माहिती घेतली असता लक्षात आलं की, रुग्णालयात औषधांची कमतरता नव्हती. रुग्णालयात पुरेशी औषधं होती. तिथे पुरेसे डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांची उपलब्धता आहे. यानंतरही अशा प्रकारची घटना घडल्याने ही गंभीर बाब आहे. त्यामुळे नांदेड येथे झालेल्या मृत्यूंची चौकशी होईल. यात कोणी दोषी आढळला तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. 

 

राज्य सरकारने ही घटना अतिशय गांभीर्याने घेतली आहे. त्यामुळेच मंत्री, सचिव आणि अधिकाऱ्यांना रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. आता याप्रकरणी चौकशी होईल आणि पुढील कारवाई केली जाईल. 

00000

दि. 2 ऑक्टोंबर 2023

 डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय

महाविद्यालय व रुग्णालयात अतिगंभीर 24 रुग्णांचा मृत्यू

 

·         रुग्णालयात अत्यावश्यक औषधांचा साठा उपलब्ध

·         रुग्णांच्या सेवेसाठी डॉक्टरांची संपूर्ण टीम तत्पर

·         दाखल होतानाच रुग्णांची स्थिती होती  चिंताजनक 

 

नांदेड (जिमाका) दि. 2 :- नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात  30 सप्टेंबर ते ऑक्टोबर 2023 या कालावधीत 24 रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये 12 प्रौढ रुग्ण (पुरुष, 7 महिला) व 12 नवजात शिशु रुग्ण होते.

 

प्रौढ रुग्णामध्ये हृदयविकार, 1 विषबाधा, 1 जठरव्याधी, 2 किडनी व्याधी, 1 प्रसूती गुंतागुंत, 3 अपघात व इतर आजार याप्रमाणे व  बालकांपैकी अंतिम अवस्थेत खाजगीतून संदर्भित झाले होते.

 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अत्यावश्यक औषध साठा उपलब्ध आहे. जिल्हा नियोजन माध्यमातून या आर्थिक वर्षासाठी 12 कोटी रुपये निधी देण्यात आला असून अजून कोटी रुपये मंजूर झाला आहे असे जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्यावतीने कळविण्यात आलेले आहे.

 

गेल्या दोन दिवसात अत्यवस्थ रुग्ण विशेषत: अंतिम अवस्थेतील रुग्ण जिल्ह्यातून व बाहेरून जास्त प्रमाणात आले आहेत. डॉक्टर व स्टाफ लक्ष ठेऊन आहेत. अनेक वर्षांपासून हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चांगल्या प्रकारे सेवा देत आहेत. दाखल असलेल्या इतर रुग्णांना आवश्यक तो औषधोपचार केला जात आहे असे डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयविष्णुपूरीचे वैद्यकीय अधिक्षक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे माहिती दिली.

00000

दि. 2 ऑक्टोंबर 2023

 समाज कल्याण कार्यालयात

राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांची जयंती साजरी

·         समाज कल्याण कार्यालय परिसरात स्वच्छता मोहीम संपन्न

नांदेड (जिमाका) दि. 2 :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, नांदेड यांचे वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बाहादुर शास्त्री यांची जयंती प्रतिमा पुजन व पुष्पहार अर्पण करुन साजरी करण्यात आली.  राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री  यांच्या जयंती निमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन मधील सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली . या कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरेसमाज कल्याण अधिकारी बापू दासरी, सहाय्यक लेखाधिकारी डी.वाय. पतंगे व कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.  

00000




दि. 2 ऑक्टोंबर 2023

 ऐतिहासिक गड-किल्ल्यांच्या स्वच्छतेसाठी लोकचळवळ व्हावी

 

 -   जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी आर.बी.गणवीर

 

·         किल्ला स्वच्छता मोहिमेत 200 प्रशिक्षणार्थीनी घेतला सहभाग

 

नांदेड (जिमाका) दि. 2 :- गड-किल्ले जोपासने व त्यांची निगा राखणे ही आपली संस्कृती असून हा अमूल्य वारसा  जोपासण्यावर भर देणे आवश्यक आहे. युवा पिढीने हा वारसा जतन करण्यासाठी सामाजिक जाणीवेतून सहभाग घ्यावा व या स्वच्छता  मोहीमेला  लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त व्हावेअसे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी आर. बी. गणवीर यांनी सांगितले.

 

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षानिमित्त नंदगिरी किल्ला स्वच्छता मोहीमेच्या आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी सूरज गुरवऔद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सुर्यवंशीनेहरू युवा केंद्राच्या चंदा रावळकरउपप्राचार्य व्ही.डी. कंदेलवाड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्रशिक्षणार्थी यांची उपस्थिती होती.

 

कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता विभागाच्या माध्यमातून आज राज्यात गड-किल्ल्याची स्वच्छता करण्यात आली. त्याअनुषंगाने आज आयटीआय नांदेड यांच्या वतीने नांदेड येथील नंदगिरी किल्ल्याची व परिसराची स्वच्छता करण्यात आली. यात नांदेड आयटीआयच्या जवळपास 200 प्रशिक्षणार्थीनी सहभाग घेतला. यापुढेही अशा स्वच्छता मोहिम आयोजित करण्यावर भर देण्यात येईल असे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी आर.बी.गणवीर यांनी सांगितले.

 

ऐतिहासिक स्थळे जपण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा असून याशिवाय ही  मोहिम अपूर्ण आहे.  सामाजिक जाणीवेतून आपण हा ऐतिहासिक वारसा जपला पाहिजे. यासाठी प्रत्येकांच्या मनात जागरुकता निर्माण होणे गरजेचे असल्याचे मत  पोलीस उपविभागीय अधिकारी सुरज गुरव यांनी व्यक्त केले. गड-किल्ले आज आपण जतन केले तरच आपण पुढील पिढीपर्यत हा वारसा अधिक सक्षमपणे पोहचवण्यात यशस्वी होवू असेही त्यांनी सांगितले.

 

विद्यार्थ्यांनी यात घेतलेला उत्स्फूर्त सहभाग ही कौतुकास्पद बाब असल्याचे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सुर्यवंशी यांनी सांगितले.

 

या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेवून स्वच्छता केली याबाबत आम्हाला अत्यंत आनंद झाला असून आत्मिक समाधान मिळाले असल्याचे पुनम केंद्रे या विद्यार्थ्यानीने यावेळी सांगितले.

 

00000











दि. 1 ऑक्टोंबर 2023

पोलीस विभागाच्या पुढाकारातून

युवकांच्या साथीने नंदगिरी किल्ला व परिसर झाला स्वच्छ

 

·         एक तारीख एक तास’ मोहिमेला अभूतपूर्व प्रतिसाद

 

नांदेड (जिमाका) दि. 1 :- स्वच्छता ही सेवा असून जिल्ह्यातील ऐतिहासिकधार्मिक वारसा असलेल्या स्थळांच्या स्वच्छतेसाठी आपण आपली जबाबदारीकर्तव्य समजून पुढे आले पाहिजे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले.       

 

महात्मा गांधी जयंती निमित्त शासनाने स्वच्छता ही सेवा’ आणि एक तारीख एक तास’ मिशनला अनुसरुन आज पोलीस विभागाच्या पुढाकारातून 300 युवकांच्या साथीने नंदगिरी किल्ला व परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

 

यावेळी अपर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, पोलीस उपविभागीय अधिकारी सुरज गुरवजिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवारएकनाथ पाटील अकॅडमीचे युवककिल्लेदारपत्रकारआदींची मोठया प्रमाणात उपस्थिती होती.  

 

उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज गुरव यांच्या पुढाकारातून मागील अनेक दिवसापासून नंदगिरी किल्ला स्वच्छ करण्याची मोहीम सुरु असून यात युवकांनी दिलेले योगदान कौतूकास्पद असल्याचे गौरोद्गार जिल्हा पोलीस श्रीकृष्ण कोकाटे यांनी काढले. 

 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षानिमित्त राज्यातील गड-किल्ल्यांची  स्वच्छता करण्याचे आवाहन राज्य शासनाने केले आहे. त्यानुसार मागील काही महिन्यांपासून पोलीस विभागाच्या पुढाकारातून नंदगिरी किल्ला व परिसराची स्वच्छता मोहिम सुरु आहे. आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हाती घेतलेल्या स्वच्छता मोहिमेचे महत्व त्यांनी विशद केले. 

 

उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज गुरव यांनी नंदगिरी किल्ला स्वच्छता मोहिमेची माहिती दिली. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी मनोगत व्यक्त केले. 

 

स्वच्छता ही सेवाएक तारीख एक तास मिशनला अनुसरुन नांदेड जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो. यावर्षी स्वच्छ भारत दिवसाच्या अनुषंगाने 15 सप्टेंबर ते ऑक्टोबर हा कालावधीस्वच्छता ही सेवा उपक्रमस्वच्छ भारत मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे.

00000








  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...