Tuesday, October 3, 2023

 प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगामाअंतर्गत  

हदगाव व हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांना

अनुक्रमे 42 कोटी 36 लाख व 13 कोटी 89 लाख रुपये रक्कम वितरीत 

नांदेड (जिमाका) दि. 2 :- पिक विमा कंपनी  मार्फत प्राप्त माहिती नुसार हदगाव तालुक्यातील 82 हजार 488 व हिमायतनगर तालुक्यातील 44 हजार 57 शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2022 मध्ये पिक विमा उतरविला होता. त्यापैकी हंगामातील प्रतिकूल परिस्थिती (मिड सिझन अँडव्हर्सिटी) अंतर्गत 42 कोटी 36 लाख रुपये व 13 कोटी 89 लाख रुपये रक्कम अनुक्रमे हदगाव व हिमायतनगर तालुक्यातील सोयबीन, ख. ज्वारी, तूर आणि कापूस पिकाच्या विमाधारक सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. 

पिक विमा योजनेत स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणी पश्चात नुकसान या घटकाअंतर्गत प्राप्त जवळपास हदगाव तालुक्यातील 41 हजार 734 व 23 हजार 553 हिमायतनगर तालुक्यातील   पूर्वसूचनांचे पंचनामे करून अनुक्रमे 8 कोटी 58 लाख रुपये व 7 कोटी 2 लाख रुपये रक्कम हदगाव व हि.नगर तालुक्यातील शेतकऱ्यांना वाटप करण्यात आली आहे. अशाप्रकारे हदगाव व हि.नगर तालुक्यातील सन 2022-23 मध्ये विविध घटकाअंतर्गत अनुक्रमे एकूण 50 कोटी 94 लाख रुपये व 20 कोटी 90 लाख रुपये रक्कम वाटप करण्यात आलेली  आहे.  या व्यतिरिक्त 75 टक्के नुकसान भरपाई अशी कुठल्याही प्रकारची वेगळी तरतूद पिक विमा योजनेमध्ये नाही. याबाबत शेतकऱ्यांनी संभ्रम दूर करावा. समाजमाध्यमावरील संदेशानुसार अर्ज करू नयेत असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे. 

हदगाव व हिमायतननगर तालुक्यातील सर्व महसूल मंडळातील प्रत्येकी एका गावातील पिक विमा भरलेल्या व पिक विमा मिळालेल्या शेतकऱ्यांचा तपशील प्रातिनिधिक स्वरूपात एका आठवड्यात सादर करण्याच्या सूचना विमा कंपनीला दिल्या आहेत. त्यामुळे उपोषण कर्त्यानी उपोषणापासून परावृत्त व्हावे, अशी विनंती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केली आहे.

00000

No comments:

Post a Comment

    वृत्त क्र. 1136 जिल्हास्तरीय   युवा महोत्सवाच्या तारखेत बदल युवा महोत्सवाचे आयोजन 1 व 2 डिसेंबर 2024 नांदेड दि.   25   नोव्हेंबर  :-   ज...